साप्ताहिक राशी भविष्य २१ ते २७ नोव्हेंबर २०२१

weekly rashi bhavishya 21 to 27 november 2021 weekly horoscope in marathi साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

weekly rashi bhavishya 21 to 27 november 2021 weekly horoscope in marathi
साप्ताहिक राशी भविष्य २१ ते २७ नोव्हेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • साप्ताहिक राशी भविष्य २१ ते २७ नोव्हेंबर २०२१
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आठवडा?
  • काय आहे आपले भविष्य?

साप्ताहिक राशी भविष्य 21 to 27 November 2021 : हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope: या आठवड्याच्या सुरुवातीच्या दो दिवसांत तुमच्या योजनेचा विस्तार होईल. या आठवड्यात असे काही क्षण येतील की ज्यामुळे तुम्ही नाराज व्हाल आणि आत्मविश्वास गमवाल. आयुष्यात नेहमीच सकारात्मक विचार करा. व्यवसायात चांगले यश मिळेल. मंगळवारी गूळ दान करा. शुक्रवारपासून धनलाभ होण्याची शक्यता आहे. या आठवड्याचा शुभ रंग - लाल.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope: नोकरी करणाऱ्या व्यक्ती या आठवड्यात आपल्या कामात प्रगती करतील. या आठवड्यात व्यवसायाच्या संबंधित मोठे व्यवहार होण्याची शक्यता आहे. श्रीगणेशाची पूजा करा. या आठवड्यात मंगळवार ते शुक्रवार हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. या आठवड्याचा शुभ रंग - हिरवा आणि पांढरा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope: बाहेरील खाद्य-पदार्थ खाणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी शुभ संधी प्राप्त करुन देईल. अन्न दान करा. या आठवड्यातील बुधवार ते शनिवार या कालावधीत पैशांची गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ आहे. या आठवड्याचा शुभ रंग - निळा आणि हिरवा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope: या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल. व्यवसायात लाभ होईल. गुरुवारपर्यंतचा कालावधी चांगले यश मिळवून देईल. मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. अन्नदान करा. आरोग्य चांगले राहील. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा आणि लाल.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope: नोकरीत यश प्राप्त होईल. बुधवारनंतर नोकरी, व्यवसायात चांगली प्रगती होईल. व्यापारातही चांगाल फायदा होईल. या आठवड्यात रखडलेले काम पूर्ण होईल. श्रीगणेशाची पूजा करा. या आठवड्याचा शुभ रंग - लाल.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope: मंगळवार ते शुक्रवारपर्यंतचा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. या काळात तुम्हाला दिलेली जबाबदारी आणि कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे. हा आठवडा व्यापार वाढीसाठी खूपच फायदेशीर आहे. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope: या आठवड्यात सोमवार ते गुरुवारचा कालावधी तुमच्यासाठी शुभ आहे. मंगळवारी घरात धार्मिक कार्य होईल. रखडलेल्या योजना मार्गी लागतील. शुक्रवारनंतरचा काळ तुमच्यासाठी नव्या संधी उपलब्ध करुन देईल. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा आणि हिरवा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope: बुधवारपर्यंत व्यवसायाच्या संबंधित कामे पूर्ण होतील.शुक्रवारपर्यंत नोकरीत प्रगती होण्याचे मार्ग उपलब्ध होतील. आरोग्य सुदृढ राहील. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा आणि लाल.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope: या आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसांत नवीन कार्याचा शुभारंभ करु शकता. व्यवसायात चांगली प्रगती होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्य निरोगी राहील. विद्यार्थ्यांना यश प्राप्त होईल. या आठवड्याचा शुभ रंग - निळा आणि केशरी.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope: राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगले यश मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात संघर्ष करावा लागू शकतो. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार करता येतील. श्रीगणेशाची पूजा करा. या आठवड्याचा शुभ रंग - निळा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope: या आठवड्यात नोकरीत प्रगती होईल. रखडलेल्या योजना मार्गी लागतील. मंगळवारनंतरचा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. मंगळवार आणि शुक्रवारी गहू, तांदूळ दान करा. वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope: या आठवड्यात पहिल्या दोन दिवसांत नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीबाबत नव्या संधी उपलब्ध होतील. या आठवड्यात गुरुवार ते शनिवारचा काळ गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा आणि लाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी