साप्ताहिक राशी भविष्य २२ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर: 'या' राशीच्या व्यक्तींना आठवड्यात चांगले यश मिळेल

साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

Weekly horoscope
साप्ताहिक राशी भविष्य 

थोडं पण कामाचं

  • पाहा साप्ताहिक राशी भविष्य 
  • २२ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबरचं राशी भविष्य 
  • पाहा कोणत्या राशीसाठी हा आठवडा कसा 

साप्ताहिक राशी भविष्य 22 november to 28 november 2020: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी आजचा शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope: या आठवड्यात नोकरीत प्रगती होईल. मंगळवारनंतर व्यवसायात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. या आठवड्यात आपले आरोग्य सुदृढ राहील. मंगळवार किंवा गुरुवारी उडीद दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope: गुरुवार नंतर आपल्या व्यवसायाच्या योजनांना चांगले यश मिळताना दिसेल. संपत्ती मिळण्याच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. मंगळवार किंवा रविवारी साखर दान करा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. या आठवड्याचा शुभ रंग - हिरवा. 
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope: या आठवड्यात नोकरीत संघर्ष करावा लागण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. गुरुवार तुमच्यासाठी शुभ वार आहे. या आठवड्याचा शुभ रंग - हिरवा आणि निळा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope: आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात प्रगती कराल. वाहन चालवताना काळजी घ्या. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होईल. बुधवारी फळांचे दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope: या आठवड्यात रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरूवात होईल. नोकरीत प्रगती करण्याचे मार्ग उपलब्ध होतील. व्यवसायात चांगले यश प्राप्त होईल. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल. मंगळवारी फळांचे दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा आणि पिवळा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope: या आठवड्यात तुम्हाला चांगले यश प्राप्त होईल. अन्नदान केल्याने पुण्य मिळेल. मुलांना शिक्षणात गोडी निर्माण होईल. या आठवड्यात मंगळवार, गुरुवार हे शुभ वार आहेत. या आठवड्याचा शुभ रंग - लाल आणि पांढरा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope: या आठवड्यात तुम्ही आपल्या आत्मविश्वासाने बरीच कामे पूर्ण कराल. व्यवसायाशी संबंधित नवीन कामे सुरू होतील. मित्रांच्या सहकार्याने रखडलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope: नोकरीत संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. मंगळवारनंतर व्यवसायात प्रगती होईल. पूर्वीपेक्षा व्यवसायात अधिक नफा होईल. नोकरीत तुम्हाला दिलेले काम चोखपणे पूर्ण कराल. सूर्याची आराधना करा. रविवार किंवा मंगळवारी गहू दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope: या आठवड्यात आत्मशक्ती आणि यश वाढण्यास मदत होईल. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. बुधवार तुमच्यासाठी नव्या संधी उपलब्ध करुन देईल. आरोग्याची काळजी घ्या. शुक्रवारी अन्न दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा आणि पांढरा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope: या आठवड्यात नोकरीमध्ये कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष करू नका. कामाबद्दल नेहमीच उत्सुक असायला हवे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी निर्माण करुन देईल. आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसांत नोकरी आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. या आठवड्याचा शुभ रंग - निळा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope: या आठवड्यात तुम्हाला यश चांगले मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. घर बांधकामाशी संबंधित मोठी कामे हाती घेतली जातील. व्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्यास सोमवार नंतरचा काळ उत्तम आहे. शुक्रवारी तांदूळ दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - हिरवा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope: या आठवड्यात आपल्या व्यवसायाचा, योजनांचा विस्तार होईल. आठवड्यात असे काही क्षण येतील ज्यामुळे तुम्ही निराश व्हाल. आयुष्यात सकारात्मक बदलांचा प्रस्ताव स्वीकारायला हवा. नोकरीमध्ये यश मिळेल. अन्न दान करा. आठवड्यातील मंगळवार तुमच्यासाठी शुभ दिवस आहे. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी