साप्ताहिक राशी भविष्य २५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर: पाहा ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा १२ राशींसाठी कसा

साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

Weekly horoscope
साप्ताहिक राशी भविष्य 

थोडं पण कामाचं

  • पाहा साप्ताहिक राशी भविष्य 
  • २५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरचं राशी भविष्य 
  • पाहा कोणत्या राशीसाठी हा आठवडा कसा 

साप्ताहिक राशी भविष्य 25 october to 31 october 2020: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी आजचा शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope: या आठवड्यात संगणक, वस्त्रोद्योग संबंधित व्यवसायात प्रगती होईल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोतही तयार केले जातील. सासरच्या मंडळींचा आधार घेऊ शकता. आरोग्य चांगली राहील. राजकीय क्षेत्रातील व्यक्ती यशश्वी होतील. श्री गणेशाची पूजा करा. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope: हा आठवडा मंगळवारनंतर तुमच्यासाठी अनुकूल आहे. नवीन जमीन किंवा घर खरेदी करु शकता. नोकरीत बुधवार नंतर उत्तम काळ आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. अन्न दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope: व्यवसायातून नफा मिळेल. या आठवड्यात घरात शुभ कार्य होईल. आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे. या आठवड्याचा शुभ रंग - हिरवा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope: व्यवसाच्या संबंधित कामांत या आठवड्यात यश मिळेल. अनेक मोठे निर्णय घ्याल. गुरुवार ते शनिवार या काळात तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त असाल. विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात, स्पर्धेत यशस्वी ठरतील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope: या आठवड्यात तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल. वेळेला महत्व द्या. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. श्री गणेशाची पूजा करा. अन्न दान करा. विद्यार्थी यशस्वी होतील. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope: या आठवड्यात नव्या नोकरीची संधी चालून येईल. व्यवसायात चांगला नफा होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्ती पक्षात आपला प्रभाव अधिक चांगला पाडतील. गुरुवार नंतर व्यवसायात आणखी लाभ होईल. या आठवड्याचा शुभ रंग - निळा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope: मंगळवारपर्यंत थोडा तणाव जाणवेल. मंगळवारनंतर तुम्हाला चांगला लाभ होईल. गुरुवार ते शनिवार पर्यंतचा काळ तुमच्यासाठी लाभदायक आहे. श्री हनुमानाची उपासना करा. मारुतीस्तोत्र पठन करा. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope: बुधवारपासून कामाची भरघोस वाढ होईल. या आठवड्यात पैशांचे आगमन होईल आणि त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. नवीन वाहन खरेदी करु शकता. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope: शनी, चंद्र आणि गुरू यांचे संक्रमण अनुकूल आहे. नोकरी किंवा व्यवसायात रखडलेले पैसे मिळतील. व्यवसायात पैशांची आवक होईल आणि आनंदी व्हाल. राजकारणाचा फायदा होईल. पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - केशरी आणि पांढरा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope: मंगळवारनंतर घर बांधण्याच्या संबंधित काम सुरू करु शकतात. विद्यार्थी यशस्वी होतील. व्यवसायात प्रगती होईल. भगवान शंकराची पूजा करा. तीळ दान करा. नोकरीत प्रगती होईल. मंगळवार ते शुक्रवार पर्यंतचा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. या आठवड्याचा शुभ रंग - निळा आणि पांढरा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope: व्यवसाच्या दृष्टीकोनातून हा आठवडा खूपच यशस्वी आणि लाभदायक होईल. रखडलेले काम मार्गी लागेल. आरोग्याच्या संबंधी समस्या उद्भवू शकतात. या आठवड्याचा शुभ रंग - निळा आणि पिवळा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope: या आठवड्यातील पहिले दोन दिवस नोकरीच्या संबंधित कामात व्यस्त असतील. धनलाभ होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना फायदा होईल. व्यवसायात चांगली प्रगती होईल आणि नफा होईल. श्री विष्णूसहस्त्रनाम दररोज वाचा. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा आणि लाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी