साप्ताहिक राशी भविष्य २६ डिसेंबर ते १ जानेवारी २०२१-२२

weekly rashi bhavishya 26 December to 1 January 2021-22 weekly horoscope in marathi : साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

 weekly rashi bhavishya 26 December to 1 January 2021-22 weekly horoscope in marathi
साप्ताहिक राशी भविष्य २६ डिसेंबर ते १ जानेवारी २०२१-२२  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • साप्ताहिक राशी भविष्य २६ डिसेंबर ते १ जानेवारी २०२१-२२
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आठवडा?
  • काय आहे आपले भविष्य?

weekly rashi bhavishya 26 December to 1 January 2021-22 weekly horoscope in marathi : साप्ताहिक राशी भविष्य 26 December to 1 January 2021-22 : हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: हुशारीने वागणे लाभाचे. माणसं ओळखून कृती करणे हिताचे. अनुभवींचा सल्ला फायद्याचा ठरेल. वाद टाळणे आवश्यक. आर्थिक नियोजन विचारपूर्वक करणे लाभाचे.  शुभ रंग - नारिंगी
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: भविष्याचे नियोजन हिताचे. चिंता सोडा, कृतीवर भर द्या आणि प्रगती करा. प्रयत्नांतील सातत्याने यशस्वी व्हाल. शब्द, पैसा आणि वेळ यांचे नियोजन लाभाचे.   शुभ रंग - निळा
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: प्रवासाचा योग आहे. खर्च वाढण्याची शक्यता आहे. ओळखीतल्यांसाठी वेळ काढू शकाल. तब्येतीला जपा. नियोजन लाभदायी आहे.  शुभ रंग - पोपटी.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: तब्येत सांभाळणे, व्यायाम करणे, आहारावर नियंत्रण राखणे हिताचे. नियोजनाने प्रगती साधाल. वाद टाळणे लाभाचे. प्रयत्नांत सातत्य राखा. जोडीदाराशी प्रामाणिक राहा.  शुभ रंग - पांढरा
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: तब्येत सांभाळणे आणि आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी प्रामाणिक वर्तन ठेवा. स्वतः खात्री करुन घेतल्यानंतर कृती करा. विसंबून राहणे काही वेळा धोक्याचे ठरू शकते हे लक्षात ठेवा. शुभ रंग - लाल
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: प्रगती होईल. नियोजनावर भर देणे हिताचे. वाद टाळणे लाभाचे. कायदे आणि नियम पाळा.   शुभ रंग - मोरपिशी
  7. तूळ राश‍ी भविष्य /  Libra Horoscope Today: आर्थिक नियोजन करणे तसेच शब्द जपून वापरणे हिताचे. अनुभवींचे मार्गदर्शन घेणे लाभाचे. स्थैर्याला महत्त्व द्या. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा.  शुभ रंग - निळा
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: ओळखीतल्यांच्या सहकार्याने कामं झटपट होतील. अडचणी दूर होतील. नियोजनावर भर देणे तसेच संयमाने वागणे लाभाचे. प्रेमात यशस्वी व्हाल.   शुभ रंग - किरमिजी
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घ्या. आर्थिक नियोजन लाभाचे. वाद टाळा आणि तब्येतीला जपा. क्षमता पाहून कृती करणे लाभाचे. शुभ रंग - पिवळा
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: शब्द, वेळ आणि पैसा यांच्या योग्य नियोजनातून प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल. वाद टाळा. तब्येत जपा. तज्ज्ञांच्या सल्ल्याने मोठे निर्णय घेणे हिताचे.  शुभ रंग - राखाडी
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: ओळखीतल्यांचे सहकार्य लाभेल. प्रवासाचा योग आहे. कामाच्या ठिकाणी आर्थिक नियोजन करणे हिताचे. परस्पर सहकार्य आणि सामंजस्य राखून कामं करणं लाभाचं आहे.   शुभ रंग - जांभळा
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: बुद्धीला पटेल ते करणे हिताचे. नियोजन लाभाचे. शब्द आणि पैशांचा वापर जपून करणे सोयीचे. कायदे पाळा. तब्येत सांभाळा.  शुभ रंग - सोनेरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी