weekly horoscope : साप्ताहिक राशी भविष्य ५ ते ११ जून २०२२

weekly rashi bhavishya 5 to 11 june 2022 weekly horoscope in marathi : साप्ताहिक राशी भविष्य ५ ते ११ जून २०२२ : हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती

weekly rashi bhavishya 5 to 11 june 2022 weekly horoscope in marathi
weekly horoscope : साप्ताहिक राशी भविष्य ५ ते ११ जून २०२२  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • weekly horoscope : साप्ताहिक राशी भविष्य ५ ते ११ जून २०२२
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आठवडा?
  • काय आहे आपले भविष्य?

weekly rashi bhavishya 5 to 11 june 2022 weekly horoscope in marathi : साप्ताहिक राशी भविष्य ५ ते ११ जून २०२२ : हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा.

धर्म-कर्म-भविष्यभविष्यात कायआध्यात्म

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope: तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात नियोजन करून प्रयत्न करणे हिताचे. अनुभवाचे बोल लाभदायी ठरतील. आपले काम प्रामाणिकपणे करावे यातच फायदा आहे. शब्द जपून वापरणे आणि वाद टाळणे हिताचे. माणसं जोडणे लाभाचे. शुभ रंग : लाल
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope: योग्य व्यक्तीकडे योग्य काम सोपविल्यास यशाची खात्री जास्त आहे. शांतपणे विचार करून केलेले नियोजन फायद्याचे. नेतृत्वगुणांचे कौतुक होईल. वाद टाळणे आणि वास्तवाचे तसेच व्यवहाराचे भान राखणे हिताचे. हुशारीने वागाल तर यशस्वी व्हाल. शुभ रंग : आकाशी
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope: तब्येत जपणे हिताचे. खरे बोला. खोटेपणा टाळा. प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळेल. कायदे आणि नियम पाळा. शुभ रंग : पोपटी
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope: शुभकार्याच्या योग आहे. मिष्टान्न योग आहे. स्वतःची आणि घरच्यांची तब्येत जपा. जोडीदाराला वेळ देणे हिताचे. संवादातून प्रश्न सुटतात हे लक्षात ठेवा पण शब्द जपून वापरा. शुभ रंग : निळा
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope: कागपत्रे वाचल्याशिवाय सही करणे टाळा. संयम महत्त्वाचा. घाई करणे टाळा. प्रामाणिकपणे आणि सातत्याने प्रयत्न केले तर प्रगती होईल. नियोजन हिताचे. दीर्घकालीन नियोजन फायद्याचे. शुभ रंग : नारिंगी
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope: तब्येत जपा. वाद टाळणे आणि शब्द जपून वापरणे हिताचे. कायदे-नियम पाळणे लाभाचे. हुशारीने वागा. वाहन जपून चालवा. शुभ रंग : हिरवा
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope: तब्येत जपणे हिताचे. प्रामाणिकपणे आणि सातत्याने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. सत्याची कास धरणे हिताचे. घरच्यांना वेळ द्या. वेळेचे व्यवस्थित नियोजन करणे लाभाचे.  शुभ रंग : पांढरा
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope: शब्द, वेळ आणि पैसा यांचा जपून वापर करणे तसेच नियोजन करून कामं करणे हिताचे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. क्षमता ओळखून जबाबदारी स्वीकारणे हिताचे. वाद टाळणे लाभाचे. नवी कौशल्य शिकणे फायद्याचे. शुभ रंग : किरमिजी
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope: संयम हिताचा. वाद टाळणे आणि वाहन जपून चालवणे फायद्याचे. तब्येत जपा. तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियोजन करावे. गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ. नियम आणि कायदे पाळणे लाभाचे. शुभ रंग : पिवळा
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope: आर्थिक व्यवहारांमध्ये लेखी नोंदींवर भर देणे हिताचे. वाद टाळणे तसेच कायदे आणि नियम यांचे पालन करणे फायद्याचे. तब्येत जपा. घरच्यांना तसेच जवळच्यांना वेळ द्या, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. हुशारीने परिस्थिती हाताळा.  शुभ रंग : जांभळा
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope: तब्येत जपा. बाहेरचे खाणे टाळा. जवळच्यांसाठी वेळ काढा. संवाद साधून प्रश्न समजून घ्या आणि हुशारीने सोडवा. वाद टाळा. नोकरीच्या ठिकाणी माणसं जपणे हिताचे.  शुभ रंग : काळा
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: घर आणि काम यातील कसरत सांभाळावी लागेल. हुशारीने समतोल राखणे फायद्याचे. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. कष्टांना पर्याय नाही. संवादातून प्रश्न सोडवा पण वाद टाळा.   शुभ रंग : सोनेरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी