साप्ताहिक राशी भविष्य ६ ते १२ जून २०२१

साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

weekly rashi bhavishya 6 to 12 june weekly horoscope in marathi
साप्ताहिक राशी भविष्य ६ ते १२ जून २०२१ 

थोडं पण कामाचं

  • साप्ताहिक राशी भविष्य ६ ते १२ जून २०२१
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आठवडा?
  • काय आहे आपले भविष्य?

साप्ताहिक राशी भविष्य 6 to 12 June 2021: हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today:  वैयक्तिक प्रगतीकडे लक्ष द्या. ठामपणे बोला. आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवाल. थोरांच्या येण्याने सुखावून जाल. कष्टाचे फळ मिळेल. गुंतवणूक लाभाची होईल. करार वाचून सह्या करणे हिताचे. अतिरेक टाळा. शुभ रंग - लाल
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: सहकारी, मित्र यांची उत्तम साथ लाभेल. प्रश्न सुटतील. वाद टाळा. प्रयत्नांना महत्त्व आहे हे लक्षात ठेवा. मोठे निर्णय घेतले जातील पण स्वतःच्या क्षमतेचे भान राखून निर्णय घ्या. तब्येत सांभाळा.  शुभ रंग - पांढरा
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: कायदा पाळा. हितशत्रूंचा पराभव कराल. व्यस्त राहाल. कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे. यश मिळेल. नवे शिकण्याची वृत्ती ठेवा. जबाबदारी स्वीकारुन, पुढाकार घेऊन काम पूर्ण करुन दाखवाल. शुभ रंग - मोरपिशी
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: बोलण्याचा प्रभाव पाडाल. अडचणी आल्या तरी मार्ग काढाल. कायदा पाळा. सावध राहा. नम्र राहा. योग्य वेळेची वाट बघून कृती करणे हिताचे.  शुभ रंग - आकाशी
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: कौतुक होईल. नवी संधी मिळेल. नवी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता. वाद टाळा. मुत्सद्दीपणे वागणे हिताचे. प्रेमात हळवे व्हाल. जोडीदाराचा मान राखाल. हुशारीने परिस्थिती हाताळाल. शुभ रंग - किरमिजी
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: अनुभवींच्या सल्ल्याने कृती करा. कागद वाचून सही करा. कायदा पाळा आणि वाद टाळा. अतिरेक नको. धीराने वाटचाल करणे हिताचे. प्रवास लाभाचा होईल. कोणाचे किती ऐकावे याचे भान राखा आणि प्रसंगी स्पष्ट बोलून विषय संपवा. शुभ रंग - पोपटी
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: खर्च वाढेल. स्वतःला पटेल ते करा. शत्रूवर मात कराल. महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करा. लेखनातून प्रसिद्धी मिळेल. ठामपणा दाखवा. कामाचे व्यवस्थित नियोजन करा. मोठे व्यवहार टाळा. शुभ रंग - आकाशी
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: प्रवासाचा आणि धार्मिक कार्याचा योग आहे. कायदा पाळा. अयोग्य कृती करणे टाळा. महत्त्वाचे निर्णय या आठवड्यात होतील. हुशारीने परिस्थिती हाताळा. नव्या ओळखी होतील. सावध राहा. काळजी घ्या. शुभ रंग - किरमिजी
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: खर्च वाढेल. वाद टाळा आणि शब्द जपून वापरा. नाती हुशारीने सांभाळाल. स्वतःच्या हिताला प्राधान्य देणे लाभाचे ठरेल. जपून बोलणे हिताचे आहे. कायदा पाळा. शुभ रंग - जांभळा
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: सामाजिक कार्याचा योग आहे. कामाचे नियोजन कराल. मित्र, नातलगांना मदत कराल. हुशारीने परिस्थिती हाताळाल. शब्द जपून वापराल. यश मिळेल. मोठ्या गुंवणुकीचे निर्णय घेणे लाभाचे. शुभ रंग - राखाडी
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: व्यस्त राहाल. कायदा पाळणे हिताचे. तब्येत सांभाळा. घरच्यांना वेळ द्याल. हुशारीने परिस्थिती हाताळावी लागेल. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवणे हिताचे. शुभ रंग - काळा
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: व्यवहारी राहाल. परिस्थितीनुसार निर्णय घ्याल. वैयक्तिक प्रगतीला प्राधान्य देणे हिताचे. कठीण काळात मदत मिळेल. अनुभवींचा सल्ला घेऊन मोठे निर्णय घेणे हिताचे राहील. तब्येत सांभाळा.  शुभ रंग - पिवळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी