weekly horoscope साप्ताहिक राशी भविष्य ७ ते १३ नोव्हेंबर २०२१

साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

weekly rashi bhavishya 7 to 13 November weekly horoscope in marathi
साप्ताहिक राशी भविष्य ७ ते १३ नोव्हेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
 • साप्ताहिक राशी भविष्य ७ ते १३ नोव्हेंबर २०२१
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आठवडा?
 • काय आहे आपले भविष्य?

साप्ताहिक राशी भविष्य 7 to 13 November 2021: हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा.

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope: या आठवड्यात आपली रखडलेली कामे पूर्ण करण्याकडे तुमचा भर असेल. मित्रांच्या सहकार्याने काम पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील. व्यवसायात आणि नोकरीत चांगली प्रगती होईल. या आठवड्याचा शुभ रंग - निळा.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope: व्यवसायात चांगले यश प्राप्त होईल. नव्या कार्याचा शुभारंभ होईल. श्री गणेशाची पूजा करा. कर्क राशीच्या व्यक्तींकडून आर्थिक मदत मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. बुधवार हा आठवड्यातील शुभ वार आहे. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा आणि लाल.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope: राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना कार्यात यश मिळेल. आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांत चांगली बातमी मिळेल. मंगळवार नवे कार्य सुरू करण्यासाठी शुभ वार आहे. या आठवड्यात मित्रांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. या आठवड्याचा शुभ रंग - हिरवा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope: आरोग्यात सुधारणा होईल. धनलाभ झाल्याने आनंदीत व्हाल. या आठवड्यात नवी प्रॉपर्टी खरेदी करण्याबाबत चर्चा आणि नियोजन कराल. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरीत सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. या आठवड्याचा शुभ रंग - निळा.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope: तुम्ही करत असलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत चांगले यश प्राप्त होईल. व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात नवी वस्तू खरेदी करण्याबाबत नियोजन कराल. या आठवड्यातील शुभ रंग - पिवळा. 
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope: या आठवड्यात व्यावसायिक क्षेत्रात अडचणी निर्माण होण्याती शक्यता आहे. श्री गणेशाची पूजा करा. घरातील कामात पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. आरोग्य निरोगी राहील. वडिलधाऱ्यांचे चरण स्पर्श करुन आशीर्वाद घ्या. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा आणि पिवळा.
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope: मॅनेजमेंटच्या कामात तुम्ही कुशल आहात. नोकरीत यश मिळेल. या आठवड्यात आरोग्य चांगले राहील. मगर राशीच्या व्यक्तींकडून आर्थिक मदत मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. या आठवड्याचा शुभ रंग - निळा.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope: तुम्ही एक यशस्वी व्यावसायक आहात. जोडीदाराच्या सहकार्याने व्यवसायात, नोकरीत चांगले यश मिळेल. या आठवड्यात रखडलेली सरकारी कामे पूर्ण होतील. शुक्रवार आठवड्यातील शुभ दिवस आहे. या आठवड्याचा शुभ रंग - लाल आणि हिरवा.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope: या आठवड्यात तुमच्या मनासारखी कामे होतील. गृहनिर्माण कार्यात व्यस्त राहाल. शैक्षणिक क्षैत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. राजकीय व्यक्तींना कामात यश मिळेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा. 
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope: नव्या योजना सुरू करण्याचे गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ठरवत आहात आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता होईल. आरोग्य निरोगी राहील. वरिष्ठांच्या सहकार्याने कामे पूर्ण होण्यास मदत होईल. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope: या आठवड्यात आपण नव्या कामाची सुरूवात करु शकता. १४ जुलैनंतरचा काळ व्यवसायात फायदेशीर ठरेल. नोकरी बदलण्याची योजना आखाल. गरीबांना अन्न दान करा. मंगळवारी नव्या कार्याची सुरूवात करु शकता. या आठवड्याचा शुभ रंग - निळा.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope: व्यवसायात प्रगती होईल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोतही तयार होतील. धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींचा व्यवसायात चांगला सहयोग मिळेल. या आठवड्यात बुधवार आणि शुक्रवार तुमच्यासाठी खूप चांगला आहे. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी