weekly horoscope : साप्ताहिक राशी भविष्य ८ ते १४ मे २०२२

weekly rashi bhavishya 8 to 14 may 2022 weekly horoscope in marathi : साप्ताहिक राशी भविष्य ८ ते १४ मे २०२२ : हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती

weekly rashi bhavishya 8 to 14 may 2022 weekly horoscope in marathi
weekly horoscope : साप्ताहिक राशी भविष्य ८ ते १४ मे २०२२  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • weekly horoscope : साप्ताहिक राशी भविष्य ८ ते १४ मे २०२२
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आठवडा?
 • काय आहे आपले भविष्य?

weekly rashi bhavishya 8 to 14 may 2022 weekly horoscope in marathi : साप्ताहिक राशी भविष्य ८ ते १४ मे २०२२ : हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा.

धर्म-कर्म-भविष्यभविष्यात काय

 1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope: घरच्यांना वेळ द्याल. जोडीदाराचे प्रश्न सोडविण्यावर भर द्याल. स्व कतृत्वावर ठाम विश्वास ठेवा. प्रगती होईल. जबाबदाऱ्या पार पाडाल. वाद टाळणे हिताचे. क्षमता ओळखून नियोजन करण्यावर भर द्या. कोणालाही आश्वासन देताना क्षमतेचे भान ठेवा. मानसिक कणखरपणा वाढविणे हिताचे. शुभ रंग - लाल
 2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope: संमिश्र भावनांचा खेळ दाखविणारा आठवडा. घरच्यांशी आणि जोडीदाराशी चर्चा करून महत्त्वाचे प्रश्न सामंजस्याने सोडविणे हिताचे. वाद टाळणे फायद्याचे. क्षमता ओळखून निर्णय घ्या. संवादातून तिढा सोडविणे योग्य होईल. गैरसमजातून प्रश्न सुटत नाही हे लक्षात ठेवा. जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवणे हिताचे. शुभ रंग - निळा
 3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope: वेळेचे आणि दैनंदिन कामाचे नियोजन करणे हिताचे. आर्थिक नियोजन फायद्याचे. वाद टाळणे लाभाचे. प्रतिस्पर्ध्यांच्या योजनांचा अंदाज घेऊन डावपेच आखण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागेल. संवाद हवा पण विसंवाद आणि वाद नको हे लक्षात ठेवा. शुभ रंग : मोरपिशी
 4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope: विक्षिप्तपणा कमी करा. घरच्यांना वेळ द्याल. भावना आणि वास्तव यात समतोल राखणे फायद्याचे. खात्री करुन घेतल्याशिवाय करार करणे टाळा. प्रसंगी अनुभवींचा सल्ला घ्या. वाद टाळा. हुशारीने परिस्थिती हाताळा. शुभ रंग : आकाशी
 5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope: आत्मविश्वासाने बुद्धिचा सुयोग्य वापर करण्यावर भर देणे हिताचे. वेळेचे आणि कामाचे नियोजन करणे फायद्याचे. संधीचा लाभ घ्या. आर्थिक व्यवहार सावधपणे करा. माणसांची पारख करायला शिकणे फायद्याचे. समोरच्यांचा आदर करा. विवाह योग आहेत. घरच्यांसाठी आणि जोडीदारासाठी वेळ द्याल. शुभ रंग : नारिंगी
 6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope: शैक्षणिक प्रगतीचा योग आहे. योग्य मार्गदर्शन लाभाचे. एकाग्रता आणि चिकाटीच्या जोरावर प्रगती होईल. तब्येत जपा. वाद टाळा. कौटुंबिक प्रश्न सोडविताना योग्य व्यक्तीचा सल्ला महत्त्वाचा हे लक्षात ठेवा. क्षमतेचे भान राखा. प्रवासाचा योग आहे. बाहेर फिरताना काळजी घ्या. कागदपत्रे आणि पैसे जपा. शुभ रंग : पोपटी
 7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope: तज्ज्ञांचा सल्ला हिताचा. कायदा-नियम पाळा. खात्री केल्याशिवाय मोठे निर्णय घेण्याची घाई नको. महत्त्वाचे व्यवहार आणि कागदपत्रे जपा. संयम राखणे, योग्य वेळी पुढाकार घेणे महत्त्वाचे. तब्येत जपा. समोरच्यांचा आदर करणे हिताचे. घरच्यांना आणि जोडीदाराला वेळ द्याल. शुभ रंग : पांढरा
 8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope: तब्येत जपा. आनंदात राहणे महत्त्वाचे. वाद टाळणे आणि संवादातून मार्ग काढणे फायद्याचे. प्रसंगी ज्येष्ठांची मदत घ्यावी. घरच्यांना वेळ द्यावा लागेल. जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. नोकरी व्यवसाय हुशारीने प्रश्न सोडवाल. कष्टांना पर्याय नाही. शिक्षणात सराव महत्त्वाचा. शुभ रंग : किरमिजी
 9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope: आत्मनिर्भर होणे आणि नवे कौशल्य आत्मसात करणे प्रगतीसाठी लाभदायी. तब्येत जपा. नियोजन फायद्याचे. गोड बोलून इतरांवर प्रभाव टाकाल. घरच्यांना वेळ द्याल. हुशारीने प्रश्न सोडविणे फायद्याचे. शुभ रंग - सोनेरी
 10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope: आनंदी राहा आणि घरच्यांना वेळ द्या. आर्थिक प्रश्न हुशारीने सोडवाल. कामाचे तसेच घरच्या जबाबदाऱ्यांचे नियोजन महत्त्वाचे. संवादातून प्रश्न सोडविण्यास मदत होईल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. रागापेक्षा संयम आणि प्रसंगी बाळगलेले मौन फायद्याचे. पेरावे तसे उगवते हे लक्षात ठेवा. शुभ रंग : राखाडी
 11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope: स्वतःवर विश्वास ठेवा. क्षमता ओळखून नियोजन करा. महत्त्वाचे व्यवहार शक्यतो पुढे ढकला. प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा महत्त्वाचा. वेळेचे आणि कामाचे नियोजन हिताचे. संकटात मदत करणाऱ्यांशी ओळख ठेवा. नियोजन, सातत्य आणि कष्टांच्या जोरावर यशस्वी व्हाल. शुभ रंग : निळा
 12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: वाद नको संवाद हवा. हुशारीने प्रश्न सोडविण्यावर भर द्या. स्वतःची प्रतिमा जपा. वेळ आणि कामाचे नियोजन करा. रागावर नियंत्रण ठेवा. संयम हिताचा. समोरच्याचे पूर्ण ऐकून आणि समजून घेऊन मग बोला. गोड बोलून इतरांवर प्रभाव टाकू शकाल. शुभ रंग : पिवळा  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी