साप्ताहिक राशी भविष्य ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट: आठवड्यात 'या' राशीच्या व्यक्तींना मोठा लाभ होईल

साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

Weekly horoscope
साप्ताहिक राशी भविष्य 

थोडं पण कामाचं

  • पाहा साप्ताहिक राशी भविष्य 
  • ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्टचं राशी भविष्य 
  • पाहा कोणत्या राशीसाठी हा आठवडा कसा 

साप्ताहिक राशी भविष्य 9 august to 15 august 2020: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी आजचा शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा? 

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope: मंगळवारनंतर व्यवसायात प्रगती होईल. उत्पन्नाचे नवे स्त्रोतही तयार केले जातील. कर्क आणि मीन राशीच्या व्यक्तींकडून चांगले सहकार्य मिळेल. बुधवार नंतरचा काळ नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी उत्तम असेल. राजकारणी व्यक्तींना या आठवड्यात चांगली वार्ता मिळेल. भगवान हनुमानाची नियमित उपासना करा. अन्न दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा आणि पांढरा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope: या आठड्यात नवे वाहन खरेदीचा विचार कराल. हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम आहे. वरिष्ठांच्या सहकार्याने नोकरी, व्यवसायात चांगला लाभ होईल. गुरुवारनंतर व्यवसायात फायदा होईल. नोकरी बदलण्याचा विचार कराल. या आठवड्याचा शुभ रंग - निळा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope: बऱ्याच दिवसांपासून मनात असलेल्या मंगळवार नंतर पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करतील. गुरुवार हा आठवड्यातील शुभ वार आहे या दिवशी नव्या कार्याची सुरूवात करु शकता. श्री विष्णुसहस्त्रनामाचे वाचन करा. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope: या आठवड्यात व्यवसाय आणि नोकरी सबंधित अनेक मोठे निर्णय घेतले जातील. गुरुवार ते शनिवार या कालावधीत घर बांधणीचा किंवा नवे कार्य सुरू करण्यासाठी उत्तम योग आहे. शिक्षण आणि स्पर्धेत तुम्हाला यश मिळेल. राजकारणात चांगले संबंध निर्माण होतील. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा आणि लाल.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope: आपण विद्वान आणि यशस्वी व्यक्ती आहात. नोकरीची नवी संधी या आठवड्यात तुम्हाला उपलब्ध होईल. सासरच्यांकडून चांगला लाभ होईल. या आठवड्यात रखडलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope: नोकरीत तुम्हाला चांगले यश मिळेल. व्यवसायात मोठा लाभ होईल. मोठ्या भावाची किंवा भावंडाची मदत होईल आणि धनलाभ होईल. बुधवारनंतरचा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे. या आठवड्याचा शुभ रंग - निळा आणि हिरवा. 
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope: नोकरीसंदर्भात मंगळवारपर्यंत ताणतणाव असेल. मित्रांकडून या आठवड्यात चांगले सहकार्य मिळेल आणि त्याचा फायदा नोकरी, व्यवसायात होईल. मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च होईल. या आठवड्याचा शुभ रंग - निळा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope: विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. नवे कार्य सुरू करण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे. मंगळवारनंतर धनलाभ होण्याची शक्यता आहे. या आठवड्याचा शुभ रंग - लाल. 
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope: बुधवारनंतर आर्थिक परिस्थिती सुधारण्यास सुरूवात होईल. धनलाभ होईल आणि त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. सिंह, कर्क राशीच्या व्यक्तींकडून चांगले सहकार्य मिळेल. या आठवड्यात वाहन खरेदी करण्याची योजना आखाल. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope: या आठवड्याचे सुरूवातीचे दोन दिवस तुम्हाला चांगला लाभ मिळवून देतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. नव्या नोकरीचा प्रस्ताव तुमच्यासमोर येईल. भगवान शंकराची पूजा करा. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा आणि हिरवा. 
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope: नोकरीत चांगले यश मिळेल. व्यवसायाच्या संबंधित कोणतेही नवीन कामे सुरू करु शकता. या आठवड्यात रखडलेले एखादे काम मार्गी लागेल. कुंभ आणि कर्क राशीच्या व्यक्तींकडून आर्थिक मदत मिळेल. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा आणि निळा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope: बुधवारनंतर धनलाभ होईल. नोकरीमध्ये फायदा होईल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी नव्या कामाचा शुभारंभ करु शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी