weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य : ९ ते १५ जानेवारी २०२२

weekly rashi bhavishya 9 to 15 january 2022 weekly horoscope in marathi : साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

weekly rashi bhavishya 9 to 15 january 2022 weekly horoscope in marathi
साप्ताहिक राशीभविष्य : ९ ते १५ जानेवारी २०२२ 
थोडं पण कामाचं
 • साप्ताहिक राशीभविष्य : ९ ते १५ जानेवारी २०२२
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आठवडा?
 • काय आहे आपले भविष्य?

weekly rashi bhavishya 9 to 15 january 2022 weekly horoscope in marathi । साप्ताहिक राशीभविष्य : ९ ते १५ जानेवारी २०२२ :  हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा?

 1. मेष राशी भविष्य  / Aries Horoscope : या आठवड्यात तब्येत सांभाळा. वाद टाळा. घरासाठी वेळ काढणे हिताचे. आर्थिक नियोजन लाभाचे. शुभ रंगः नारंगी.
 2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope : घरच्यांची काळजी घ्या. पैसे जपून वापरणे हिताचे. गोड बोलाल तर प्रगती कराल. तज्ज्ञांचा सल्ला फायद्याचा ठरेल. शुभ रंग - पांढरा.
 3. मिथुन राशी भविष्य/ Gemini Horoscope : तब्येत सांभाळा. आर्थिक नियोजन करणे आणि जवळच्यांचे मन राखणे हिताचे. घरासाठी वेळ द्या. प्रगती होईल. रंग शुभ - पिवळा.
 4. कर्क राशी भविष्य /  Cancer Horoscope : या आठवड्यात नेतृत्वाची संधी मिळेल. नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या वागतील. वाद टाळून सर्वांना एकत्र करुन कामं करुन घ्यावी लागतील. डोकं थंड ठेवून नियोजन करणे हिताचे. शुभ रंग - निळा.
 5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope : प्रगती होईल. धनलाभाचा योग आहे. अडचणी दूर होतील. हुशारीने वागाल तर प्रगतीची घोडदौड सुरू होईल.  शुभ रंगः लाल.
 6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope : तब्येतीची काळजी घेणे आणि नियोजन करुन काम करणे हिताचे. या आठवड्यात परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. वाद टाळावे लागतील. काही खर्च टाळणे जमणार नाही.  शुभ रंग - नारंगी.
 7. तूळ राशी भविष्य /  Libra Horoscope : सावध राहाल आणि हुशारीने वागाल तर प्रगती कराल. गोड बोलाल तर कामं लवकर पूर्ण होतील. प्रवासाचा आणि मिष्टान्नाचा योग आहे. तब्येत सांभाळा. नियोजन हिताचे. शुभ रंगः निळा. 
 8. वृश्चिक राशी भविष्य  / Scorpio Horoscope : प्रयत्नांती परमेश्वर लाभेल. छोट्या अपयशाने खचू नका. नियोजनात चूक होणार नाही याची काळजी घ्या. नियोजन हिताचे. तब्येतीची काळजी घ्या. घरच्यांना वेय़ळ द्या. वेळेचे नियोजन हिताचे. शुभ रंग - पिवळा.
 9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope : मन स्थिर ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. घरातल्यांसोबत या आठवड्यात काही सुखाचे क्षण लाभतील. नियोजन हिताचे. शुभ रंग - लाल.
 10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope : आरोग्य निरोगी राहील. मित्र-मैत्रीणींची भेट होईल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. मनात संयम ठेवा. शुभ रंग - पिवळा.
 11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope : एखाद्या कामाचे पैसे बऱ्याच दिवसांनंतर आता मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग निर्माण होईल. कामात प्रगती होईल. तब्येतीची काळजी घ्या. शुभ रंग - पांढरा.
 12. मीन राशी भविष्य  / Pisces Horoscope : पैसे देताना सावधानता बाळगा. प्रलंबित काम पूर्ण होईल, धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्य आनंदी असेल.  शुभ रंग - निळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी