साप्ताहिक राशी भविष्य 20 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर: पाहा या आठवड्याचं तुमचं भविष्य

साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

Weekly horoscope
साप्ताहिक राशी भविष्य  

थोडं पण कामाचं

  • पाहा आपलं साप्ताहिक राशी भविष्य कसं आहे
  • 20 सप्टेंबर ते 26 सप्टेंबरचं साप्ताहिक राशी भविष्य 
  • पाहा हा आठवडा कोणत्या राशीसाठी ठरणार लाभदायक 

साप्ताहिक राशी भविष्य 20 September to 26 September 2020: या आठवड्यातील कोणता दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी आजचा शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा? 

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope: गरीब आणि गरजूंना अन्न दान करा. सोमवार ते गुरुवारपर्यंतचा काळ व्यवसायात चांगले यश मिळवून देईल. शनिवारी तीळ दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - लाल आणि पांढरा. 
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope: नोकरी, व्यवसायात मित्रांची मोठी साथ मिळेल. मात्र हा आठवडा संघर्षमय असेल.  रखडलेल्या योजना सुरू होतील. विरोधकांवर मात करुन यश मिळवाल. आर्थिक विकास होईल. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा आणि हिरवा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope: धनलाभ होईल आणि त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. बुधवारनंतर आर्थिक परिस्थिती सुधारणा होईल. कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींकडून बरेच सहकार्य मिळेल. या आठवड्यात वाहन खरेदी करण्याची योजना आखाल. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope: नव्या नोकरीचा प्रस्ताव तुमच्यासमोर येईल. या आठवड्याचे सुरूवातीचे दोन दिवस तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. भगवान शंकराची पूजा करा. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा आणि हिरवा. 
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope: मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी नव्या कामाचा शुभारंभ करु शकता. नोकरीमध्ये वरिष्ठ आपलं कौतुक करतील. व्यवसायात मोठी प्रगती होईल.  कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope: वरिष्ठांच्या सहकार्याने नोकरी, व्यवसायात चांगला लाभ होण्याची शक्यता. या आठड्यात नवे वाहन खरेदी करु शकता. हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे. गुरुवारनंतर व्यवसायात फायदा होईल. या आठवड्याचा शुभ रंग - निळा. 
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope: या आठवड्यात नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होतील. बुधवारी आपल्या महत्वाकांक्षी योजनांचा विस्तार होईल. सोमवार आणि मंगळवारी आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. गुरुवारी व्यवसायात चांगले यश मिळेल. या आठवड्यात शुभ रंग - पिवळा. 
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope: मंगळवार नंतरचा काळ तुमच्यासाठी लाभदायक असेल. श्री गणेशाची पूजा करा. या आठवड्यात चांगले यश प्राप्त होईल. सरकारी कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून चांगले सहकार्य मिळेल. या आठवड्याचा शुभ रंग - निळा.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope: आठवड्यातील पहिले तीन दिवस व्यवसायात संघर्ष करावा लागेल. गुरुवारनंतर तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. रविवार आणि सोमवारी आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope: या आठवड्यात तूळ आणि कुंभ राशींच्या व्यक्तींसोबत व्यवहारासंबंधी मोठे करार होऊ शकतात आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या. मंगळवारनंतर व्यवसायाशी संबंधित कोणतीही नवीन कामे सुरू शकता. या आठवड्यात तूळ आणि कुंभ राशींच्या व्यक्तींसोबत व्यवहारासंबंधी मोठे करार होऊ शकतात. या आठवड्याचा शुभ रंग - निळा आणि हिरवा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope: या आठवड्यात आत्मविश्वास वाढेल आणि त्याचा फायदा कामात होईल. रखडलेली आणि प्रलंबित कामे बुधवारपर्यंत मार्गी लागण्याची शक्यता आहे. या आठवड्यात व्यवसायात संघर्ष करावा लागेल. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope: मंगळवार आणि शुक्रवार दरम्यान रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील.  आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या आठवड्यात नोकरदारांना चांगले यश मिळेल. कामातही सुधारणा दिसतील.  या आठवड्यातील शुभ रंग - निळा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी