साप्ताहिक राशी भविष्य 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर: पाहा या आठवड्याचं तुमचं भविष्य 

साप्ताहिक राशी भविष्य 27 September to 3 October 2020: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

Weekly Horoscope
साप्ताहिक राशी भविष्य 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर: 

थोडं पण कामाचं

  • पाहा आपलं साप्ताहिक राशी भविष्य कसं आहे
  • 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरचं साप्ताहिक राशी भविष्य 
  • पाहा हा आठवडा कोणत्या राशीसाठी ठरणार लाभदायक

साप्ताहिक राशी भविष्य 27 September to 3 October 2020: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी आजचा शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा? 

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope: नोकरीमधे सातत्याने होणारी प्रगती तुम्हाला आनंद देईल. राजकीय क्षेत्रात यशस्वी होण्याची वेळ आली आहे. शनिवारी आरोग्याबाबत सतर्क रहावे लागेल. या आठवड्यात आर्थिक प्रगती होईल. या आठवड्याचा शुभ रंग - लाल आणि पिवळा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope: आरोग्य उत्तम असेल. या आठवड्यात नव्या कार्याची सुरुवात करु शकता. मित्रांच्या भेटी-गाठी होतील. नव्या ओळखी होतील आणि त्यामुळे नव्या संधीही प्राप्त होतील.  श्री विष्णू, श्री गणेशाची पूजा करा. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope: नवा उद्योग सुरू करण्यासाठी हालचाल कराल. हा आठवडा तुमच्यासाठी खूपच लाभदायक आणि यश मिळवून देणारा ठरेल. नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. उद्योगात चांगला लाभ होईल. या आठवड्याचा शुभ रंग - लाल, केशरी, पांढरा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope: मंगळवारी गणपती बाप्पाची पूजा करा. व्यवसायात चांगले यश प्राप्त होईल. माध्यम आणि व्यवस्थापन क्षेत्रातील व्यक्ती नोकरी बदलण्याचा विचार करतील. नव्या संधी भविष्यात लाभदायक ठरतील. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा आणि लाल.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope: मित्रांच्या मदतीने रखडलेलं काम पूर्ण होईल. व्यवसात चांगले यश मिळेल आणि मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. गरीबांना अन्न दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - निळा आणि हिरवा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope: मंगळवारी नव्या कार्याची सुरूवात करु शकता.  नोकरी बदलण्याची योजना आखाल. या आठवड्यात आपल्याला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. ३० सप्टेंबरनंतरचा काळ व्यवसायात फायदेशीर ठरेल.गरीबांना अन्न दान करा.  या आठवड्याचा शुभ रंग - निळा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope: नव्या कार्याचा शुभारंभ होईल. श्री गणेशाची पूजा करा. बुधवार हा आठवड्यातील शुभ वार आहे. कर्क राशीच्या व्यक्तींकडून आर्थिक मदत मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात चांगले यश प्राप्त होईल. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा आणि लाल.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope: वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरीत यश मिळेल. मॅनेजमेंटच्या कामात तुम्ही कुशल आहात. या आठवड्यात आरोग्य चांगले राहील. मकर राशीच्या व्यक्तींकडून आर्थिक मदत मिळेल. या आठवड्याचा शुभ रंग - निळा.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope: या आठवड्यात रखडलेली सरकारी कामे पूर्ण होतील. जोडीदाराच्या सहकार्याने व्यवसायात, नोकरीत चांगले यश मिळेल. तुम्ही एक यशस्वी व्यवसायक आहात. शुक्रवार आठवड्यातील शुभ दिवस आहे. या आठवड्याचा शुभ रंग - लाल आणि हिरवा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope: आठवड्याचे पहिले दोन दिवस तुम्हाला लाभदायक ठरतील. दररोज योग आणि ध्यान करत रहा. या आठवड्यात आपल्याला आरोग्याबद्दल खूप जागरूक रहावे लागेल. हा आठवडा तुमच्यासाठी शुभ संधी उपलब्ध करुन देईल. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा आणि पांढरा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope: या आठवड्यात टेक्निकल किंवा मॅनेजमेंट क्षेत्रातील व्यक्तींना नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. या आठवड्यात राजकीय व्यक्तींना लाभ होईल.  मंगळवारी श्रीगणेशाची पूजा करा. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope: नव्या नोकरीची संधी चालून येईल. मंगळवारी तुमच्या कार्याचा विस्तार होईल. मंगळवारनंतर धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. या आठवड्यात सकारात्मक बदल जाणवेल.   या आठवड्याचा शुभ रंग - नारंगी आणि पांढरा.
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी