Snake in Dream: स्वप्नात पुन्हा-पुन्हा साप दिसण्याचा अर्थ काय? जाणून घ्या हे संकेत शुभ की अशुभ?

आपल्या स्वप्नात दिसणाऱ्या काही गोष्टींचा अर्थ खूप मोठा होत असतो, त्या गोष्टी दिसणं कदाचित वाईट घटना होण्याचे संकेत असतात किंवा चांगली घटना आपल्या आयुष्यात घडणारी असते. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्ने अशीच येत नाहीत. प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो.

Snake in Dream: What does it mean to see a snake again and again in a dream?
Snake in Dream: स्वप्नात पुन्हा-पुन्हा साप दिसण्याचा अर्थ काय?   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • आपल्या स्वप्नात दिसणाऱ्या काही गोष्टींचे अर्थ खूप मोठा होत असतो.
  • स्वप्नात वारंवार साप दिसणे किंवा साप विचित्र हालचाल करताना दिसला तर हे शुभ आणि अशुभ संकेत असतात.
  • स्वप्नशास्त्रानुसार स्वप्ने अशीच येत नाहीत. प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो.

Swapna Shastra: झोपताना (sleeping) प्रत्येकाला स्वप्न पडतात.अनेकदा झोपलेला माणूस त्याच्या स्वप्नात (dream)अनेक गोष्टी पाहतो. कधीकधी आपल्याला चांगली स्वप्ने पडतात, तर त्याच वेळी अशी स्वप्ने असतात जी भीतीमुळे आपले डोळे उघडतात. परंतु रात्रीच्या वेगवेगळ्या प्रहरमध्ये पडलेले स्वप्न हे माणसाला वेगवेगळे फळ देत असतात.  स्वप्नात दिसलेले गोष्टी घटना आपल्या भविष्यावर (future) मोठा प्रभाव पाडत असतात.  प्रत्येक स्वप्नाचा आपल्या नजीकच्या भविष्याशी काही ना काही संबंध असतो. काही स्वप्ने शुभ आणि फलदायी असतात, तर काही स्वप्ने काही अप्रिय असल्याचे सूचित करतात.  (What does it mean to see a snake again and again in a dream? Know these signs are auspicious or inauspicious)

अधिक वाचा  : आयुष्यभर माणसाने या चार गोष्टी सर्वांपासून ठेवाव्यात लपवून

आपल्या स्वप्नात दिसणाऱ्या काही गोष्टींचा अर्थ खूप मोठा होत असतो, त्या गोष्टी दिसणं कदाचित वाईट घटना होण्याचे संकेत असतात किंवा चांगली घटना आपल्या आयुष्यात घडणारी असते. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्ने अशीच येत नाहीत. प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. आपण आपल्या स्वप्नात असंख्य वस्तू पाहत असतो, पण या सर्व वस्तूंमध्ये तुम्हाला साप दिसला तर याचे फार वेगळे संकेत असतात. स्वप्नात वारंवार साप दिसणे किंवा साप विचित्र हालचाल करताना दिसला तर हे शुभ आणि अशुभ संकेत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार सापांशी संबंधित स्वप्ने आणि त्यांच्या स्वप्नाचा अर्थ जाणून घेऊया

स्वप्नात साप मारला तर अर्थ काय

जर तुम्ही स्वप्नात स्वत: सापाला मारण्याचा प्रयत्न करताना पाहिले किंवा स्वप्नात मेलेला साप दिसला तर याचा अर्थ लवकरच तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे संपणार आहेत. 

स्वप्नात सापाचे दात पाहणे

तुमच्या स्वप्नात सापाचे दात पाहण्याचा अर्थ असा आहे की, तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला फसवू शकते, म्हणून सावधगिरी बाळगा, सतर्क व्हा. 

अधिक वाचा  : Viral Video : स्कूल बसमध्ये 11 फुटी अजगर

स्वप्नात सापाची झुंज पाहणे

स्वप्नात सापांना लढताना पाहणे चांगले नाही.  स्वप्नात जर सापांची लढाई तुम्ही पाहिली असेल तर तुम्ही कोणत्या तरी वादात अडकण्याची शक्यता असते.

स्वप्नात वारंवार साप दिसणे 

स्वप्नात वारंवार साप दिसणे हे चांगले नाही. कुंडलीत काल सर्प दोष असण्याचे हे लक्षण आहे. त्यावर लवकरात लवकर तोडगा काढा.

साप आणि मुंगसची लढाई दिसणे 

आपल्याल सर्वांना माहिती आहे, साप आणि मुंगस हे एकमेंकाचे अट्टल शत्रू. जर हे दोघांनी एकमेंकांना पाहिलं त्यांची भांडण झाल्याशिवाय राहत नाही. हे दोन प्राणी आपल्या स्वप्नात दिसले तेही लढाई करताना तर या  स्वप्नाचा अर्थ तुम्हाला काही कारणास्तव कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. 

स्वप्नात पांढरा साप दिसणे 

स्वप्नात पांढरा नाग दिसणे खूप शुभ मानले जाते.  स्वप्नशास्त्रानुसार  तुम्हाला अमाप संपत्ती मिळणार आहे.

स्वप्नात उडणारा साप पाहणे

तुमच्या स्वप्नात साप उडताना दिसणे म्हणजे तुम्ही सावध झाले पाहिजे  काही काळात  तुमचे आर्थिक नुकसान होणार आहे किंवा तुम्ही काही कारणाने आर्थिक संकटाला तुम्ही बळी पडणार आहात, असा या स्वप्नाचा अर्थ होत असतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी