Palm Reading: तुमच्या हातावर सापाचं चिन्ह आहे? जाणून घ्या याचा अर्थ 

भविष्यात काय
Updated May 13, 2019 | 15:15 IST | टाइम्स नाऊ हिंदी

हस्तरेषा शास्त्रानुसार हातावर सापाचं चित्र असणं खूपच महत्वाचं मानलं जातं. प्रत्येक बोटा खाली वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा आणि पर्वत आहेत ज्यावर सापाचं चिन्ह वेगवेगळे परिणाम करतं. जाणून घ्या याच विषयी...

Palm Reading
हातावर सापाच्या आकृतीचा अर्थ काय  |  फोटो सौजन्य: Representative Image

मुंबई: साप हा सामान्यतः भगवान शंकराचं प्रतिक मानलं जातं आणि आपण सापाला दूध अर्पण करून त्याची पूजा देखील करतो. वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की, साप एखाद्या व्यक्तीसाठी शुभ आणि अशुभ सुद्धा असू शकतो. आपल्या हातांवर वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या बनलेल्या असतात. यापैकी एक सापाची आकृती असते. हस्तरेषा शास्त्रानुसार आपल्या हातावर सापाची आकृती असणं खूप महत्वाचं मानलं जातं. प्रत्येक बोटांखाली वेगवेगळ्या पद्धतीच्या रेषा आणि पर्वत असतात. यावर सापाचं चिन्ह असेल तर प्रत्येक बोटासाठी वेगळा प्रभाव पडतो. पाहुया कोणत्या बोटाखाली अशाप्रकारे सर्पाची आकृती असणं शुभ आहे आणि अशुभ आहे, तसंच त्यांचे प्रभाव काय असतात. 

सापाची आकृती केव्हा शुभ असते 

  1.  अंगठ्याखाली शुक्र पर्वत असतो. अंगठ्याखाली असलेल्या या पर्वतावर जर सर्पाकृती असेल तर ते शुभ असतं. याचा अर्थ आहे आपल्याला भोग-विलासाचं साधन प्राप्त होणार आहे. आपलं दाम्पत्य जीवन सुखी असेल आणि आपण शारीरिकरित्या कोणाकडेही आकर्षित होऊ शकता. 
  2.  तर्जनी बोटाखाली गुरु पर्वत असतो. या गुरू पर्वतावर सापाचं चिन्ह असेल तर याचा अर्थ आहे ती व्यक्ती गुणी आणि ज्ञानी आहे. तसंच गुरु पर्वतावर सापाचं मुख बोटाकडे असेल तर तो व्यक्ती अध्यात्माकडे झुकलेला आहे असं समजावं. 
  3. शनि पर्वत मध्यमेच्या खाली असतो आणि विशेष म्हणजे आपली भाग्य रेषा इथंच येऊन समाप्त होते. अशावेळी या जागेवर सापाची आकृती आहे याचा अर्थ या व्यक्तीकडे अपार धनदौलत आहे. 
  4.  कनिष्ठिकेच्या खाली बुध पर्वत असतो. यावर जर सर्प आकृती आहे याचा अर्थ ती व्यक्ती दृढ निश्चयी असते.

सापाची आकृती अशुभ केव्हा असते

  1.  तर्जनी बोटाच्या खाली असलेल्या गुरु पर्वतावर हे सापाचं चिन्ह आहे आणि त्याचे मुख खाली आहे, याचा अर्थ आपल्याला आयुष्यामध्ये कोणत्यातरी अपमानजनक परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. याशिवाय आपल्या कोणत्याही कार्यामध्ये खूप वेळानंतर यश मिळेल.  
  2. मध्यमेखाली शनी पर्वतावर सर्प आकृती दुहेरी असेल तर याचा अर्थ या व्यक्तीची जमापुंजी संपणार आहे किंवा तो आपल्या वाईट सवयीमुळं आपली संपत्ती नष्ट करेल. 
  3. अनामिकेच्या खाली असलेल्या सूर्य पर्वतावर जर सापाचे चिन्ह आहे याचा अर्थ आपले जीवन कठीण आहे आणि आपल्या जीवनामध्ये यश कधीच मिळणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी