मुंबई: वास्तुशास्त्रात(vastu shastra) दिशा तसेच त्यांच्या उत्तम वापराबद्दल सगळेच सांगितलेले असते. इतकंच नव्हे तर वास्तुशास्त्रात काही महत्त्वाच्या गोष्टींच्या योग्य वापराबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले आहे. उदाहरण म्हणून किचनमध्ये उपयोगी येणारी भांडी, इलेक्ट्रॉनिक आयटम्स. साधारण प्रत्येक भारतीय घरांच्या किचनमध्ये(kitchen) चपाती बनवण्याचा तवा असत. या तव्याचा(pan) कसा उपयोग केला पाहिजे आणि त्याला योग्य पद्धतीने कसे ठेवले पाहिजे याबाबत जाणून घेणे गरजेचे असते. नाहीतर मोठे नुकसान सोसावे लागू शकते. why not to pour water on hot pan know the reason
अधिक वाचा - भारतीय टपाल विभागात ३८,९२६ जागांसाठी भरती
घरात अनेक मोठी माणसे काही गोष्टींसाठी मनाई करत असतात. या गोष्टी अनेक शतकांपासून चालत आल्या आहेत. यातीलच एक बाब म्हणजे गरम तव्यावर पाणी टाकणे. गरम तव्यावर कधीही पाणी टाकू नये. हे तुम्ही अनेक जणांकडून ऐकले असेल. मात्र त्यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?
वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने त्याचा येणारा आवाज छन हा चांगला नसतो. यामुळे घरात नकारात्मक वातावरण तयार होते. घरातील सदस्याला यामुळे आजार होऊ शकतो.
असंही म्हटलं जातं की गरम तव्यावर पाणी टाकल्याने मुसळधार पाऊस पडतो. असा पाऊस विध्वंसेचे कारण बनू शकतो. यासाठी वडीलधारी मंडळी असे न करण्यास सांगतात.
तव्याचा संबंध राहुशी जोडलेला असतो. यासाठी तव्याची योग्य ती साफ-सफाई न केल्यास मोठ्या समस्येचे कारण बनू शकते. वास्तुशास्त्रानुसार तवा किचनमध्ये अशा ठिकाणी ठेवला पाहिजे जो बाहेरच्या व्यक्तीला दिसणार नाही.
तवा नेहमी लेटून ठेवावा. उभा करून ठेवणे योग्य नाही.
अधिक वाचा - जाणून घ्या- कोण आहेत भगवान बसवेश्वर
तवा कधीही खराब अवस्थेत ठेवू नये. याचा उपयोग केल्यानंतर नेहमी स्वच्छ करून ठेवा. नाहीतर हे कंगालीचे कारण बनू शकते.
जेव्हाही तुम्ही चपाती करण्यास सुरूवात कराल तेव्हा तव्यावर थोडे मीठ शिंपडा. असे केल्याने घरात धन-धान्याची कमतरता राहत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास असे केल्याने तव्यावरील किटाणू नष्ट होतातआणि यावर बनलेल्या चपात्या खाऊन आजारी पडायला होत नाही.
(या लेखात दिलेली कोणतीही माहिती किंवा गणनेच्या सत्यतेचा आणि अचूकतेचा दावा केलेला नाही. वेगवेगळी माध्यमे, ज्योतिषी, पंचांग, प्रवचने, मान्यता (श्रद्धा) आणि धर्मग्रंथांमधून संग्रहित करून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येते. याचा उद्देश केवळ माहिती देण्याचा आहे. टाईम्स नाऊ याच्याशी सहमत असेलच असे नाही.)