Yearly 12 Zodiac Hororscope prediction 2023 : वार्षिक राशिभविष्य 2023; वर्ष सर्व 12 राशींसाठी नवीन वर्ष कसे असेल

Yearly 12 Zodiac Hororscope prediction 2023 : गेल्या वर्षभरात अपूर्ण राहिलेली कामे येत्या नवीन वर्षात पूर्ण झाली पाहिजेत, असे सर्वांना वाटते. नवीन वर्ष तुमच्या कारकिर्दीत एक नवीन टप्पा गाठू दे, अशी इच्छा आपण सर्वजण व्यक्त करत असतो. आज आपण पुढील वर्ष कशाप्रकारे असेल हे जाणून घेणार आहोत.

Yearly Horoscope 2023
वार्षिक राशिभविष्य 2023 :सर्व12 राशींसाठी कसे असेल नवं वर्ष   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मंगळ हा जीवनातील पराक्रम आणि उत्साहाचा कारक आहे. मेष राशीत जन्मलेली व्यक्ती सुंदर, आकर्षक आणि कलात्मक असते.
  • वृषभ राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असतात लोकही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होत असतात.
  • मिथुन राशीच्या लोकांचा स्वभाव नेहमी आनंदी आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा असतो.

Horoscope 2023 : नवीन वर्ष 2023 प्रत्येकासाठी नवीन आशा, नवीन स्वप्ने, नवीन उद्दिष्टे आणि आव्हानांना सामोरे जाण्याचे वर्ष असेल. नवीन वर्ष 2023 हे प्रत्येकाच्या आयुष्यात (life) अनेक आशा घेऊन येणारे वर्ष असेल. गेल्या वर्षभरात अपूर्ण राहिलेली कामे येत्या नवीन वर्षात पूर्ण झाली पाहिजेत, असे सर्वांना वाटते. नवीन वर्ष तुमच्या कारकिर्दीत एक नवीन टप्पा गाठू दे, अशी इच्छा आपण सर्वजण व्यक्त करत असतो. आज आपण पुढील वर्ष कशाप्रकारे असेल हे जाणून घेणार आहोत.  ( Yearly Horoscope 2023, New Year for All 12 Zodiac Signs How does the year 2023)

अधिक वाचा  : ग्रीन लाईट थेरपीमुळे जुनं दुखणंही होतं बरं

मेष राशिफल 2023

मेष राशीच्या लोकांचे शरीर दुबळे आणि सामर्थ्यवान असते, मध्यम बांधणी असते.  मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा जीवनातील पराक्रम आणि उत्साहाचा कारक आहे. मेष राशीत जन्मलेली व्यक्ती सुंदर, आकर्षक आणि कलात्मक असते.

कसं कसेल करिअर 

2023 या वर्षी मेष राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने उत्कृष्ट परिणाम मिळतील. दहाव्या घराचा स्वामी शनि जानेवारी महिन्यात कुंभ राशीत प्रवेश करेल, जो करिअर आणि उत्पन्न वाढीच्या बाबतीत काही नवीन उपलब्धी मिळवून देणारा आहे. 

नाते कसे राहील 

यावर्षी तुमच्या पहिल्या आणि सप्तम भावात राहु आणि केतूच्या संक्रमणामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात.तुमच्या जीवनसाथीसोबत काही  मतभेद होऊ शकतात. 

अधिक वाचा  : "40 गाव सोडा... महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही

आर्थिक स्थिति

आर्थिकदृष्ट्या, एप्रिल नंतरचा काळ शुभ परिणाम देईल, या कालावधीत आपण आपल्या आर्थिक जीवनात काही चांगले बदलांची अपेक्षा करू शकता. या दरम्यान तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. परंतु तुम्हाला सुरुवातीच्या काही दिवस जपून व्यवहार करावे लागतील. कारण राहू आपल्या राशीत असतील. 

उपाय 

यावर्षी प्रत्येक मंगळवारी हनुमानजींचे व्रत ठेवा. जर व्रत पाळणे शक्य नसेल तर हनुमानजीची पूजा अवश्य करा.

वृषभ राशी भविष्य 2023 

वृषभ राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असतात लोकही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होत असतात. वृषभ राशीच्या लोकांचे शरीर जोमदार असते, त्यामुळे ते सुंदर दिसतात.

कसे असेल करिअर 

वृषभ राशीसाठी येणारे वर्ष करिअरच्या दृष्टीकोनातून खूप चांगले राहण्याची अपेक्षा आहे, कारण या वर्षाच्या सुरुवातीला शनि तुमच्या राशीच्या दहाव्या घरात असणार आहे.  

अधिक वाचा  : थंडीत चेहरा धुतल्यामुले त्वचा होते ड्राय

कुटुंब 

कौटुंबिक दृष्टिकोनातून वर्ष थोडे प्रतिकूल असेल, कारण वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या कौटुंबिक जीवनात तणाव असू शकतो, हा तणाव विशेषतः एप्रिलपर्यंत राहील. 

आर्थिक स्थिति

आर्थिक दृष्टिकोनातून वर्षाची सुरुवात चांगली होईल. शनि तुमच्यासाठी लाभदायक घरातील मूलत्रिकोण राशीत धनप्राप्तीसाठी नवीन शक्यता निर्माण करेल. परंतु व्यापारी वर्गासाठी मात्र धोक्याची घंटा आहे. व्यापारी वर्गाने मोठी गुंतवणूक टाळावी, नवीन व्यवसाय सुरू केल्यास नुकसान होऊ शकते. 

मिथुन राशिभविष्य 2023 

मिथुन राशीच्या लोकांचा स्वभाव नेहमी आनंदी आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा असतो. तसेच, त्यांच्याकडे विचारमंथन करण्याची आणि इतरांशी पटकन मिसळण्याची कला आहे. 

कसे असेल करिअर 

2023 यावर्षी तुम्हाला करिअरच्या क्षेत्रात अनेक संधी मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगले परिणाम मिळतील, जानेवारीपासून तुमच्या नवव्या घरात शनिचे भ्रमण होईल.  नशिबाने साथ मिळेल आणि जुनी समस्या जी पूर्वीपासून होती ती दूर होईल. व्यापार क्षेत्राशी संबंधित लोकांना या वर्षी मोठ्या नफ्याची अपेक्षा आहे.  

कुटुंब

यावर्षी तुमचे कौटुंबिक जीवन खूप चांगले असेल. खूप आनंददायी आणि आनंदी असेल.  कुटुंबात तुमचा सन्मान राहील. नात्यात गोडवा राहील, आई-वडिलांच्या आरोग्यासोबतच कौटुंबिक वातावरणही आनंददायी राहील.

आर्थिक स्थिति

वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या घरामध्ये शनिदेवाचे संक्रमण होईल, यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल. या स्थितीत तुम्हाला अतिविचार सोडून कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल

कर्क राशीभविष्य 2023

कर्क राशी स्वभावाने ठरतात. हे लोक खूप भावनिक आणि कल्पनाशील असतात.  त्यांच्याकडे भाषा आणि संवाद कौशल्याचे विशेष गुण असतात. 

करिअर 

करिअरच्या दृष्टीने हे वर्ष उत्तम असणार आहे. देव गुरु बृहस्पती भाग्य भावात एप्रिलपर्यंत तुमच्या प्रत्येक कामात मदत करत असल्याचे दिसत आहे. 17 जानेवारीपासून शनीचे संक्रमण तुमच्या राशीतून आठव्या घरात असेल, एकीकडे शनीची धैय्या सुरू होईल आणि दुसरीकडे शनीच्या अष्टम भ्रमणातून तुम्हाला काही नवीन शक्यता प्राप्त होतील. 

कुटुंब

राहू आणि केतू गेल्या काही काळापासून तुमच्या कौटुंबिक जीवनात अशांततेचे वातावरण निर्माण करून आहेत. एप्रिलनंतर गुरुचे संक्रमण मेष राशीत होताच  कौटुंबिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येतील.  

आरोग्य 

यावर्षी तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत काही विशेष लक्ष द्यावे लागेल. 17 जानेवारीपासून सुरू होणारा शनिचा धैया काहीसा मानसिक तणाव देईल. दुस-या भावात शनि राशीमुळे काही कौटुंबिक बाबींमधील वादामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

सिंह राशी भविष्य 2023

सिंह राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व खूप चांगले असते. त्यांचे व्यक्तिमत्व त्यांच्या राशीच्या सिंहाच्या चिन्हासारखे असते. सिंह राशीच्या लोकांच्या स्वभावात नेतृत्वाची गुणवत्ता जन्मजात असते. हे लोक निडर, धैर्यवान आणि दृढनिश्चयी असतात.

करिअर 

2023 हे वर्ष करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असेल. या राशीचा स्वामी शनी, जो 17 जानेवारीपासून तुमच्या सप्तम भावात प्रवेश करेल, तुम्हाला व्यावसायिक व्यवस्थेसाठी नवीन योजना साकारण्यात खूप मदत करेल. एप्रिलनंतर देव गुरु गुरुचे संक्रमण मेष राशीत म्हणजेच तुमच्या भाग्यस्थानात होईल.

कुटुंब 

सिंह राशीच्या लोकांच्या कुटुंबात यावर्षी सुसंवाद असेल तर काही वेळा कुटुंबात समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

आर्थिक स्थिति

आर्थिक बाबतीत हे वर्ष चांगले जाणार आहे, यावर्षी अचानक काही लाभ होण्याची शक्यता आहे. नवव्या घरात गुरू आणि राहूचे संक्रमण अचानक काही आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतात. 

कन्या राशी भविष्य 2023

कन्या ही सर्व राशींमध्ये सर्वात सुंदर राशी मानली जाते आणि ज्याला सौंदर्याची कदर असते.  याचे कारण म्हणजे ही राशी कन्याद्वारे दर्शविली जाते. या राशीच्या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रत्येक काम सुंदरपणे पूर्ण करतात. या राशीची व्यक्ती स्त्री असो वा पुरुष, त्यांना आपल्या मनात एखादी गोष्ट कशी दडपून ठेवायची हे चांगलेच माहीत असते.

कसे असेल करिअर 

वर्षाच्या सुरुवातीला कुंभ राशीतील शनीचे संक्रमण तुमच्या करिअरच्या दृष्टीने चांगले सिद्ध होईल.  स्पर्धेत तुम्हाला विजय मिळेल. व्यापारी वर्गासाठी वर्षाची सुरुवात चांगली होईल आणि तुम्ही पुढे जात राहाल.  राशीतून सप्तम भावात स्थित गुरू तुम्हाला एप्रिलपर्यंत काहीतरी नवीन करण्यासाठी उपयुक्त ठरेल, त्यात तुम्हाला फायदा होईल. 

कुटुंब 

कन्या राशीच्या राशीच्या लोकांसाठी या वर्षी देवगुरु गुरु कौटुंबिक जीवनात तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल, परंतु एप्रिलपर्यंत राशीतून आठव्या भावात एकट्या राहूचे संक्रमणही नातेसंबंधात काही कटुता आणू शकते.

आर्थिक स्थिति

यावर्षी आर्थिक जीवनात काही सुधारणा होण्याची शक्यता आहे, तसेच कन्या राशीच्या लोकांच्या उत्पन्नाची पातळी नेहमीच वाढत राहते. या वर्षी उत्पन्नात काही नवीन वाढ होऊ शकते.

तुळा राशिफल 2023

तूळ राशीचे चिन्ह तराजू आहे. हे जीवनातील संतुलन दर्शवते. तूळ राशीच्या व्यक्तीचा सर्वात मोठा गुण म्हणजे हे लोक कोणत्याही समस्येवर तर्कशुद्ध आणि सोप्या मार्गाने त्वरित उपाय शोधतात. 

कसे असेल करिअर 

यावर्षी तुमची शनीच्या धैय्यापासून सुटका होईल आणि शनि तुमच्यासाठी योगिक ग्रह म्हणून उपयुक्त ठरेल.  राहु आणि केतुचे संक्रमण हे कोणते व्यवसाय न करण्याचा सल्ला देत आहेत. गुरु तुम्हाला कामाच्या ठिकाणी येणार्‍या अडथळ्यांपासून वाचवतील आणि एप्रिलनंतर तुमच्या कामात काहीतरी नवीन करण्याचे संकेतही देतील. 

वृश्चिक राशिफल 2023

या राशीचे स्वामी हे मंगळ आहेत. यामुळे या राशीच्या लोकांच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद दिसत असतो.  हे लोग स्वभावाने उग्र असतात. या लोकांमध्ये धैर्याची कमतरता नसते आणि ते आपल्या धुंदीत राहत असतात.

कसे असेल करिअर 

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच महत्त्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्या. तुमच्या नोकरी बदल करण्याआधी तुम्ही आधी विचार करणं आवश्यक आहे. त्यात 17 जानेवारीपासून शनिची साडेसाती सुरू होणार आहे.

कुटुंब 

कुटुंबैकि दुष्टीकोनातून या वर्षाच्या सुरुवातीपासून शनिचे संक्रमण चौथ्या घरात आहे. यामुळे काही समस्या उद्धभवू शकतील. आईच्या तब्येतमध्ये बिघाड होऊ शकते, त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. 

धनु राशिफल 2023

धनु राशीचे जातक हे विचारांनी खूप स्वतंत्र असतात. बुद्धीमान लोकांकडे हे लगेच आकर्षित होत असतात. या राशीचे लोक मनाने स्वच्छ आणि विश्वासार्ह असतात. हे लोक कामाच्या ठिकाणी चांगले शिक्षक आणि तत्त्वज्ञ असल्याचे सिद्ध करतात. धनु राशीचे लोक भविष्याकडे आशावादी दृष्टीकोनातून पाहत असतात.

करिअर 

वर्षाच्या सुरुवातीलाच शनीच्या साडेसातीतून मुक्ती मिळणे हे शुभ संकेत आहे. नवीन वर्ष नवीन यश, नवीन आशांसाठी ओळखले जाईल.  या वर्षी तुम्हाला कार्यक्षेत्रात भरपूर यश मिळेल, या वर्षी तुम्हाला करिअरच्या अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. 

मकर राशिफल 2023

 मकर राशीचे स्वामी हे शनिदेव आहेत, जे न्याय देवता आहेत आणि त्यांना पाप ग्रह मानले जाते.  मकर राशीचे व्यक्ती खूप मेहनत, एकनिष्ठ आणि शिस्तप्रिय असतात. तसेच हे लोक नीडर म्हणजेच साहसी असतात. 

कसे असेल करिअर 

या वर्षाच्या सुरुवातील साडेसाती ही अंतिम स्थितीत येणार आहे. 17 जानेवारी रोजी शनि जेव्हा कुंभ राशीत प्रवेश करतील. तेव्हा तुमची साडेसाती शेवटच्या टप्प्यात येणार आहे. 

आर्थिक स्थिति

शनि आपल्या दुसऱ्या घरात संक्रमण करतील आणि आर्थिक स्थिती मजबूत करतील. आर्थिक लाभ होईल, मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून लाभ होईल. तुम्ही जमीन खरेदी करून घर बांधण्याचे काम सुरू करू शकता.

कुंभ राशिफल 2023

कुंभ राशीच्या व्यक्तीला कळपात फिरायला कधीच आवडत नाही किंवा सवयही नसते. त्यांना त्यांच्या कामात ढवळाढवळ अजिबात आवडत नाही.  या राशीच्या चिन्हाची एकमात्र नकारात्मक बाजू म्हणजे ते खूप लवकर रागावतात परंतु गटात एक चांगला नेता म्हणून उदयास येत असतात. ते आपल्या भावना सहजासहजी कोणाच्याही समोर मांडत नाहीत.

उपाय

तुमच्या राशीवर शनिदेवाची साडेसातीचा प्रभाव पडतो, त्यामुळे शनिवारी शनि मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडावर नियमितपणे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. 

मीन राशी भविष्य 2023

मीन ही दुहेरी स्वभावाची राशी आहे. मीन राशीचे लोक अनेकदा अस्थिर मनाचे असतात. या राशीच्या लोकांचा स्वभाव कल्पक असतो.  गुरूच्या प्रभावामुळे ते बुद्धिमान आणि विवेकी असतात.  

करिअर

या वर्षी करिअरच्या दृष्टीने सुखद परिणाम मिळण्याची संधी मिळेल. एप्रिलपर्यंत राशीस्वामी देव गुरु तुमच्या राशीत भ्रमण करेल. यासोबतच 17 जानेवारीपासून शनीची सादे सती सुरू होणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी