पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अयोध्यामध्ये राम मंदिरासाठी भूमीपूजन तसेच कोनशिलेचे उद्घाटन करणार आहेत. या प्रस्तावित राम मंदिराचे फोटो पहिल्यांदा श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

राम मंदिर तीन वर्षात बनून तयार होणार आहे. या मंदिराची निर्मिती नागर शैलीत होणार आहे.
मंदिराला पाच शिखर असणार आहेत. यातील खांबाची संख्या ३६० असणार आहेत.
मंदिराची उंच १६१ फूट असणार आहे. मंदिर १० एकरमध्ये असणार आहे. याचा संपूर्ण परिसर ५७ एकरमध्ये पसरलेला आहे.
मंदिराच्या कोनशिलेवेळी २ लाखांपेक्षा अधिक वीटा लावण्यात येणार आहेत.
मंदिरात पाच शिखर असणार आहे, गर्भगृह, कुडू मंडप, नृत्यू मंडप आणि रंग मंडप
मंदिरासाठी भूमि पूजन किंवा कोनशिलेचे अनावरणाच्या माध्यमातून राम मंदिर निर्मितीला सुरूवात होणार आहे.
कोनशिलेसाठी उपयोगात देशातील विविध भागातील पवित्र क्षेत्रांची माती अयोध्येला पोहचली आहे.
भूमीपूजन आणि कोनशिला अनावरणामुळे हिंदूंची ५०० वर्षांची प्रतिक्षा समाप्त होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भव्य आणि दिव्य राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे.