AAPKA LUCK METER 22 january 2022 : प्रत्येक राशीचे २२ जानेवारी २०२२ चे लकमीटर

AAPKA LUCK METER 22 january 2022 Know daily horoscope lucky number color for you today from dr jai madaan : आज शनिवार २२ जानेवारी २०२२. जाणून घ्या आजच्या दिवसाचे प्रत्येक राशीचे लकमीटर. कोणत्या राशीसाठी किती प्रमाणात लाभदायी आहे दिवस. लकमीटर सांगत आहेत डॉ जय मदान.

AAPKA LUCK METER 22 january 2022
प्रत्येक राशीचे २२ जानेवारी २०२२ चे लकमीटर 
थोडं पण कामाचं
  • प्रत्येक राशीचे २२ जानेवारी २०२२ चे लकमीटर
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

AAPKA LUCK METER 22 january 2022 Know daily horoscope lucky number color for you today from dr jai madaan : आज शनिवार २२ जानेवारी २०२२. जाणून घ्या आजच्या दिवसाचे प्रत्येक राशीचे लकमीटर. कोणत्या राशीसाठी किती प्रमाणात लाभदायी आहे दिवस. लकमीटर सांगत आहेत डॉ जय मदान.

मेष - आपल्या गरजांकडे घरच्यांचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे. हवे तसे सहकार्य मिळाले नाही तरी दुःखी न होता ठरवलेले काम शांतपणे करा. तब्येत सांभाळा. एखाद्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटले तरी मनात आले आणि निर्णय घेतला अशी कृती करू नका. शांतपणे दोन-तीन वेळा विचार करा आणि सर्व बाजू तपासूनच अंतिम निर्णय घ्या.
शुभ रंग - पिवळा
शुभ अंक - १
लक मीटर - ६५ टक्के

वृषभ - खर्चावर नियंत्रण ठेवा. इतरांच्या अपेक्षांची पूर्तता करताना स्वतःच्या क्षमतेचे भान ठेवा. चर्चेतून प्रश्न सोडवा. शब्द जपून वापरा आणि अहंकार दूर ठेवा. रागावर नियंत्रण ठेवणे लाभाचे ठरेल. तब्येत सांभाळा.
शुभ रंग - निळा
शुभ अंक - ४
लक मीटर - ६५ टक्के

मिथुन - जबाबदाऱ्या पूर्ण करताना थकून जाल. आवश्यकता भासल्यास थोडी विश्रांती घ्या. तब्येत सांभाळा. आर्थिक लाभाचा योग आहे. नातेसंबंधांत चढउतारांची शक्यता आहे. जोडीदाराशी चर्चा करुन प्रश्न सोडवा.
शुभ रंग - हिरवा
शुभ अंक - ५
लक मीटर - ७१ टक्के

कर्क - एकावेळी एक काम ठरवून आणि व्यवस्थित पूर्ण करण्यावर भर द्या. एकदम दोन दगडांवर पाय ठेवणे टाळा. विचारपूर्वक निर्णय घ्या. तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हरकत नाही पण निर्णय स्वतःच घ्या. एकदा घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा. रागावर नियंत्रण ठेवणे आणि वाद टाळणे हिताचे. शब्द जपून वापरणे लाभदायी ठरेल. चर्चेतून मार्ग निघेल. तब्येत सांभाळा.
शुभ रंग - राखाडी
शुभ अंक - ७
लक मीटर - ४७ टक्के

सिंह - जो-तो स्वार्थ साधण्यासाठी आपल्याशी चांगले वागेल-बोलेल. परिस्थितीचा अंदाज घेऊन वागा. लगेच भुलून जाऊ नका. सावधपणे व्यवहार करा. नव्या जबाबदाऱ्या स्वीकारा आणि विचारपूर्वक काम करा. मनाचा तोल सांभाळा. घरच्यांना वेळ द्याल तर आनंदात राहाल. 
शुभ रंग - लाल
शुभ अंक - ९
लक मीटर - ७३ टक्के

कन्या - कुटुंबातील व्यक्तींना आयत्यावेळी मदत करावी लागेल. आर्थिक व्यवहार सावधपणे करा. दीर्घकालीन गुंतवणूक हिताची. शब्द जपून वापरणे, रागावर नियंत्रण ठेवणे आणि वाद टाळणे हिताचे. ताणतणाव व्यवस्थापन जमले तर दिवस छान जाईल. उच्च शिक्षणाच्या दृष्टीने चांगला दिवस. प्रेमात सावध राहा.
शुभ रंग - जांभळा
शुभ अंक - ३
लक मीटर - ६५ टक्के

तुळ - सावधपणे निर्णय घ्या. भावनांमध्ये अडकू नका. वास्तवाचे भान राखा. काही अपेक्षित घटनांसाठी वेळ लागेल पण यश मिळेल. तब्येत जपा.
शुभ रंग - गुलाबी
शुभ अंक - ४
लक मीटर - ५९ टक्के

वृश्चिक - कामात समाधान मिळेल. दिवस छान जाईल. सहकार्य लाभेल. प्रगती होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक निर्णय विचारपूर्वक घेणे हिताचे. महिलांनी तब्येत सांभाळावी. अनुभवींचा सल्ला लाभाचा हे लक्षात ठेवा.
शुभ रंग - लाल
शुभ अंक - ९
लक मीटर - ६५

धनु - आत्मनिर्भरता लाभदायी. भावनांमध्ये अडकू नका, वास्तवाचे भान राखा. आयुष्यात समतोल राहा. नातेसंबंधांमध्ये सावध राहा. तब्येत जपा. व्यवहारी राहणे हिताचे.
शुभ रंग - पांढरा
शुभ अंक - ८
लक मीटर - ७१ टक्के

मकर - आपल्या निर्णयांचे चांगले वाईट परिणाम कुटुंबातील सदस्यांना सोसावे लागतील याचे भान ठेवा. मनाचे संतुलन सांभाळा. शब्द जपून वापरणे, रागावर नियंत्रण ठेवणे आणि वाद टाळणे हिताचे. स्वतःला सकारात्मक कार्यात गुंतवले तर कौतुक होईल. कलाकारांसाठी चांगला दिवस. नातेसंबंधांत सावध राहा. तब्येत जपा.
शुभ रंग - निळा
शुभ अंक - ४
लक मीटर - ६९ टक्के

कुंभ - अध्यात्माची ओढ असलेल्यांसाठी उत्तम दिवस. विचारपूर्वक निर्णय घेणे हिताचे. मनाचे व्यवस्थापन करू शकलात तर दिवस मजेत जाईल. कलाकारांसाठी उत्तम दिवस आहे. कौतुक होईल. तब्येत जपा.
शुभ रंग - काळा
शुभ अंक - ५
लक मीटर - ६९ टक्के

मीन - आर्थिक व्यवहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि विचारपूर्वक करा. कागदपत्रांवर सही करण्याची घाई नको. कामातील प्रगती लवकर यश किर्ती मिळवून देईल. दांपत्य जीवन आनंदी राहील. ओळखीतल्यांसोबत वेळ मजेत जाईल.
शुभ रंग - मरून
शुभ अंक - ७
लक मीटर - ७४ टक्के

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी