Video: आजचं राशी भविष्य १६ एप्रिल २०१९: कसा जाईल तुमचा दिवस

भविष्यात काय
Updated Apr 16, 2019 | 22:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

ज्योतिष शास्त्रात एकूण १२ राशी आहेत. प्रत्येक राशीची एक ताकद, कमकुवत बाजू असते. प्रत्येकाचे विशिष्ट गुण, इच्छा तसेच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो.

horoscope daily
डेली राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आयुष्यातील येणारा प्रत्येक दिवस हा वेगळा आणि नवीन अनुभव घेऊन येणारा असतो. एखादा दिवस आयुष्यात चांगले क्षण आणणारा असतो तर काही वेळेस निराशा हाती येते. ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशींचा प्रभाव व्यक्तीच्या आयुष्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकार होत असतो. ज्योतिष शास्त्रात एकूण १२ राशी आहेत. प्रत्येक राशीची एक ताकद, कमकुवत बाजू असते. प्रत्येकाचे विशिष्ट गुण, इच्छा तसेच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. बारा राशींपैकी प्रत्येक राशी कोणत्या ना कोणत्या तत्वाच्या अंतर्गत येते. चार राशीचक्र तत्व आहेत. वायू, अग्नि, पृथ्वी आणि जल या चार तत्वांमध्ये बारा राशी असतात.

  1. जल तत्वाच्या व्यक्ती भावनात्मक आणि अतिसंवेदनशील असतात. यांची बुद्धिमत्ता तीव्र असतो. आपल्या प्रिय व्यक्तींसाठी ते नेहमी उपलब्ध असतात. कर्क, वृश्चिक आणि मीन या राशी जलतत्वाच्या राशी आहेत. 
  1. अग्नि तत्वाच्या व्यक्ती भावूक, गतिमान आणि मनमौजी स्वभावाच्या असतात. यांना लवकर राग येतो. मात्र लगेचच त्या समोरच्या व्यक्तीला माफही करतात. यांच्यामध्ये प्रचंड उर्जा आणि साहसी असतात. शारीरिक रूपाने मजबूत असतात. मेष, सिंह आणि धनू या राशी अग्नि तत्वामध्ये येतात.
  2. पृथ्वी तत्वाच्या व्यक्ती धरतीशी जोडलेल्या असतात. या व्यक्ती रूढीवादी असतात मात्र त्याबरोबरच भावूकही असतात. त्यांना भौतिक सुख आवडते. व्यवहारी आणि इमानदार असतात. कठीण काळाच जवळच्या माणसांना साथ देतात. वृषभ, कन्या आणि मकर या राशी पृथ्वी तत्वात येतात.
  3. वायू तत्वाच्या व्यक्तींना इतरांशी संवाद साधायला तसेच संबंध प्रस्थापित करायला आवडते. या राशीच्या व्यक्ती पटकन मित्र बनवतात तसेच विचारक आणि विश्लेषणात्मक व्यक्ती असतात. यांना वाचनाची खूप आवड असते. सल्ला देणे अशा व्यक्तींना आवडते. मिथुन, तूळ आणि कुंभ या राशी या तत्वामध्ये येतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी