LUCK METER 19 January 2022 : ग्रह, अंक आणि रंग आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकतात. आपले दैनंदिन जीवन यामुळे प्रभावीत होते. यामुळे नियोजन करण्याआधी प्रसिद्ध ज्योतिषी डॉ जय मदान यांच्याकडून जाणून घ्या आपले आजचे लकमीटर. आजचा शुभ अंक आणि आजचा शुभ रंग.
मेष - घरातील ज्येष्ठांना वेळ द्या. ज्येष्ठांसोबत वेळ घालवा आणि त्यांच्या अडचणी सोडवा. मोठ्यांच्या आशीर्वादाने भाग्योदय होईल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. अभ्यासात मन एकाग्र होईल. दिवस चांगला आहे. योग्यवेळी मदत मिळेल आणि अडचणी दूर होतील. पण महत्त्वाचे आर्थिक व्यवहार आजच्या दिवशी करणे टाळा.
शुभ रंग - लाल
शुभ अंक - ६
भाग्य मीटर - ६१ टक्के
वृषभ - आळसपणामुळे काही कामं रखडतील. सावध राहा. कोणावरही विसंबून राहणे टाळा. आज कोणालाही पैसे उधार देणे टाळा. वाद टाळणे हिताचे. कागदपत्रांशी संबंधित व्यवहार जपून करा. रागावर नियंत्रण ठेवा. कायदा-नियम यांचे पालन करा.
शुभ रंग - पांढरा
शुभ अंक - ९
भाग्य मीटर - ५५ टक्के
मिथुन - वैयक्तिक कामं पूर्ण करण्यावर भर द्या. कार्यपूर्ती आपल्याला नवा उत्साह मिळवून देईल. सामाजिक आणि धार्मिक कार्य हातून घडू शकेल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक आणि सावधपणे करा. प्रसंगी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. संवाद साधणे थांबवू नका. संवादातून अनेक प्रश्न सुटतील. काही समस्या सोडवण्याचे मार्ग सापडतील. कोणाचेही कॉल दुर्लक्षित करू नका.
शुभ रंग - हिरवा
शुभ अंक - ५
भाग्य मीटर - ६२ टक्के
कर्क - संतुलन महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा. अतिरेक टाळा. कायदा आणि नियमांचे पालन करणे आणि रागाला आवर घालणे हिताचे आहे. कायदेशीर अडचणी दूर होतील किंवा त्यादृष्टीने सकारात्मक घटना घडतील. एखादी दुःखद घटना मन अस्वस्थ करेल. गुणवत्तेला महत्त्व द्या. नेमून दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यावर भर देणे हिताचे.
शुभ रंग - बदामी
शुभ अंक - ६
भाग्य मीटर - ७३ टक्के
सिंह - सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रभावी कार्य कराल. कौतुक होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. प्रवास टाळा. कुटुंबातील अनुभवींचा सल्ला हिताचा ठरेल.
शुभ रंग - जांभळा
शुभ अंक - ४
भाग्य मीटर - ८१ टक्के
कन्या - घराशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे. गैरसमजात राहण्यापेक्षा थेट संवाद साधा आणि प्रश्न सोडवा. शब्द जपून वापरणे आणि रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे. दूरदृष्टीने काम करणे हिताचे. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. तब्येत जपा.
शुभ रंग - हिरवा
शुभ अंक - ३
भाग्य मीटर - ५५ टक्के
तुळ - घरातले वातावरण आनंदी ठेवाल. विनाकारण कोणावरही अंकुश ठेवू नका. कामाच्या नियोजनावर भर देणे आणि वेळेचे योग्यव्यवस्थापन करणे हिताचे. दांपत्य जीवन आनंदी राहील. प्रेमात यशस्वी व्हाल.
शुभ रंग - निळा
शुभ अंक - ५
भाग्य मीटर - ५९ टक्के
वृश्चिक - जुने प्रश्न सुटतील. गोड बोलाल तर यशस्वी व्हाल. वाद टाळणे आणि रागाला आवर घालणे हिताचे नाहीतर दिवसभराच्या कामकाजावर परिणाम होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी टार्गेट पूर्ण केल्याचा आनंद मिळेल.
शुभ रंग - निळा
शुभ अंक - २
भाग्य मीटर - ७५ टक्के
धनु - काही अनपेक्षित घटना घडतील आणि या घटनांचा जीवनावर परिणाम होईल. एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नात आपला सल्ला महत्त्वाचा ठरेल. गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. संवादातून मतभेद दूर करा. घरातल्या व्यक्तीच्या आजारपणामुळे धावपळ होण्याची शक्यता आहे.
शुभ रंग - नारिंगी
शुभ अंक - ७
भाग्य मीटर - ५७ टक्के
मकर - घरातल्यांना जास्त वेळ द्याल. दैनंदिन जीवनात बदल होईल. जवळच्या नात्यांना वेळ द्याल. किरकोळ समस्यांचा थोडा त्रास होईल. थोडी कामं रखडण्याची शक्यता आहे. त्वचेच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा.
शुभ रंग - आकाशी
शुभ अंक - ८
भाग्य मीटर - ५४ टक्के
कुंभ - धार्मिक कार्यात सहभागी होण्याचा योग आहे. कौटुंबिक विषयात बाह्य हस्तक्षेप होणार नाही याची खबरदारी घ्या. घरातले प्रश्न घरात सोडवा. कार्यालयीन कामकाजात आपला प्रभाव दिसेल. काहींसाठी प्रवासाचा योग आहे.
शुभ रंग - चॉकलेटी
शुभ अंक - ४
भाग्य मीटर - ७७ टक्के
मीन - कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी वेळ काढावा लागेल. आत्मविश्वास हवा पण त्याचा अतिरेक टाळा. निर्णय घेणे आणि तो अंमलात आणणे ही प्रक्रिया सावधपणे करा. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. कार्यालयीन कामकाज तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे हिताचे.
शुभ रंग - केशरी
शुभ अंक - ६
भाग्य मीटर - ८१ टक्के