Gudi Padwa 2021: गुढीपाडव्याशी संबंधित 11 पौराणिक गोष्टी ज्या ऐकून आपल्यालाही वाटेल आश्चर्य

आध्यात्म
Updated Apr 12, 2021 | 15:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

हिंदू धर्मीयांसाठी चैत्र महिना हा फार खास असतो. चैत्र महिन्याच्या शुक्लपक्षाच्या प्रतिपदेला दक्षिण भारतात युगादी साजरा केला जातो तर महाराष्ट्र आणि गोव्या गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो.

Gudi Padwa
गुढीपाडव्याशी संबंधित 11 पौराणिक गोष्टी ज्या ऐकून आपल्यालाही वाटेल आश्चर्य 

थोडं पण कामाचं

 • जाणून घ्या या सणाशी संबंधित रंजक गोष्टी
 • याच दिवशी रामाने रावणाचा केला होता वध
 • शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सेनेवर मिळवला होता विजय

Gudi Padwa 2021: हिंदू (Hindu) धर्मीयांसाठी चैत्र (Chaitra) महिना हा फार खास असतो. चैत्र महिन्याच्या शुक्लपक्षाच्या प्रतिपदेला दक्षिण भारतात (South India) युगादी (Ugadi) साजरा केला जातो तर महाराष्ट्र (Maharashtra) आणि गोव्यात (Goa) गुढीपाडव्याचा (Gudi Padwa) सण साजरा केला जातो. कर्नाटकाच्या काही भागांमध्ये आणि आंध्र प्रदेशातही (Andhra Pradesh) याला युगादी म्हटले जाते. केरळमध्ये (Kerala) संवत्सर पडवो, काश्मीरमध्ये (Kashmir) नवरेह, मणीपूरमध्ये (Manipur) 'सजिबु नोंगमा पानबा' नावाने हा सण साजरा केला जातो. असे मानले जाते की चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने (Lord Brahma) सृष्टीची निर्मिती (creation of universe) केली होती आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होते ज्यात दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा होते.

जाणून घ्या या सणाशी संबंधित रंजक गोष्टी

 • पौराणिक ग्रथांनुसार पहिल्या युगाच्या रूपात सत्ययुगाचा प्रारंभ गुढीपाडव्याच्या दिवशी झाला होता.
 • महाराष्ट्रात नववर्षारंभ म्हणून हा सण साजरा केला जातो. शेतकरी या दिवशी नव्या पिकाची पूजा करतात.
 • महान गणितज्ञ भास्कराचार्यांच्या म्हणण्यानुसार चैत्र प्रतिपदेलाच दिवस, महिने आणि वर्ष या गणतीला प्रारंभ झाला.
 • चैत्रातील शुक्लपक्षाच्या प्रतिपदेलाच रामाने रावणाचा वध करून दक्षिण भारताला मुक्ती दिली होती, ज्यामुळे महाराष्ट्रात गुढी उभारली जाते.
 • यादिवशी महाराष्ट्र आणि गोव्यात लोक आपापल्या घरांची साफसफाई केल्यानंतर घरांच्या बाहेर रांगोळ्या काढतात. तोरण बांधतात आणि गुढी उभारतात.
 • विशेष पक्वान्न म्हणून पुरणपोळी बनवून घरी आलेल्या पाहुण्यांना दिली जाते.
 • घरात पूजा करून पुढी उभारल्याने घरात नकारात्मक किंवा वाईट शक्ती येत नाहीत आणि घरात, कुटुंबात सुख आणि आनंद येतो अशी लोकांची श्रद्धा आहे.
 • छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सेनेचा पराभव केल्यानंतर गुढीपाडवा पहिल्यांदा साजरा केला होता.
 • यादिवशी महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात कडुलिंबाची पाने खाल्ली जातात जी आरोग्यासाठी चांगली असतात.
 • काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हा सण युगादी, छेती चांद अशा विविध नावांनी स्थानिक परंपरांनुसार साजरा केला जातो.
 • यादिवशी सोने, विद्युत उपकरणे, मालमत्ता, वाहने खरेदी करणे शुभ मानले जाते.

सूचना- या लेखात दिलेली सर्व माहिती ही प्रचलित मान्यतांच्या आधारे दिलेली आहे. याची सत्यता, अचूकता आणि विशिष्ट परिणामांची खात्री देता येत नाही. प्रत्येकाने आपल्या विवेकाने याकडे पाहावे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी