Gita Jayanti : 14 डिसेंबर: आज आहे गीता जयंती; आजच्याच दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला होता धर्म आणि कर्माचा उपदेश

आध्यात्म
भरत जाधव
Updated Dec 14, 2021 | 11:26 IST

Gita Jayanti: हिंदू धर्मा (Hinduism) साठी सर्वात पवित्र दिवस म्हणजे गीता जयंती. मार्गशीर्ष (Margashirsha) महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीलाच अर्जुना (Arjuna) ला श्रीकृष्णा (Sri Krishna) कडून गीतेचे ज्ञान मिळाले.

14th December, Today is Gita Jayanti
आजच्याच दिवशी अर्जुनाला मिळाला होता धर्म आणि कर्माचा उपदेश   |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • आज 14 डिसेंबर रोजी गीता उपदेश सण
  • आजच्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला होता गीता उपदेश
  • महाभारताच्या युद्धावेळी भगवान श्रीकृष्णाने दिलेला गीता उपदेश बर्बरिका, हनुमान आणि संजय यांनीही ऐकला होता.

Gita Jayanti: नवी दिल्ली : हिंदू धर्मा (Hinduism) साठी सर्वात पवित्र दिवस म्हणजे गीता जयंती. मार्गशीर्ष (Margashirsha) महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीलाच अर्जुना (Arjuna) ला श्रीकृष्णा (Sri Krishna) कडून गीतेचे ज्ञान मिळाले. त्यामुळे आज 14 डिसेंबर रोजी हा सण साजरा केला जात आहे. महाभारता (Mahabharat)च्या युद्धात अर्जुनाच्या समोर त्याचे स्वतःचे कुटुंबातील-नातेवाईक होते, त्यावेळी युद्धाचे शस्त्र खाली टाकून दिलेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने गीता उपदेश (Gita Updesh) केला होता. 

गीताचे दुसरे नाव गीतोपनिषद

गीतेमध्ये 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. गीतेचे दुसरे नाव गीतोपनिषद आहे. गीता जयंतीच्या दिवशी गीता वाचणे आणि श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. गीतेची शिकवण आत्मसात केल्याने जीवनातील यशाचा मार्ग प्रशस्त होतो आणि सर्व शंका नष्ट होतात. श्रीमद भागवत गीतेत सर्व समस्यांचे समाधान सांगितले आहे. केवळ अर्जुनच नाही तर बर्बरिका, हनुमान आणि संजय यांनीही भगवान श्रीकृष्णाकडून गीतेचा उपदेश ऐकला होता.

गीता महत्त्वाची का आहे?

  • श्रीमद भागवत गीता वाचल्याने योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते.
  • जर कोणाकडे हा पवित्र ग्रंथ नसेल तर गीता जयंतीच्या दिवशी श्रीमद भागवत गीता घरी आणणे शुभ मानले जाते. 
  • या दिवसापासून गीता पठणाचा विधीही सुरू केला जातो. श्लोक नियमितपणे अर्थासह वाचावेत असा नियम धरावा. 

गीता जयंतीची पूजा पद्धत

  • स्नान वगैरे करून पूजेचे घर स्वच्छ करावे. भिंतीवर भगवान श्रीकृष्णाचे चित्र लावा आणि भगवत गीता त्यांच्या चरणी ठेवा.
  • स्वच्छ वस्त्रे परिधान करून श्रीहरीची पूजा करावी, पिवळी फळे, फुले, धूप-दीप, दुर्वा इत्यादी अर्पण करावीत.  "ऊं गंगे'' मंत्र पठण करा. 
  • पूजा पूर्ण करण्यासाठी शेवटी आरती करा.

या दिवशी काय करावे

  • गीता जयंतीच्या दिवशी शंखाची पूजा करावी. असे मानले जाते की विशेषत: या दिवशी शंख फुंकल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
  • गीता जयंतीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त मिळत असतात.
  • या दिवशी श्रीमद भागवत गीतेचे दर्शन घेतल्याने समस्या आणि नकारात्मकता दूर होते, असा विश्वास आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी