Pausha Putrada Ekadashi Vrat Kataha: पुत्रदा एकादशी 2023; जाणून घ्या व्रत कथा, शुभ मुहूर्त, पूजा विधी

2023 Pausha Putrada Ekadashi: 2023 या वर्षाच्या जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यातच पुत्रदा एकादशी आहे. या पुत्रदा एकादशीची व्रत कथा, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या....

2023 Pausha Putrada Ekadashi Vrat Katha Shubh Muhurat Puja Time Vidhi in marathi
Pausha Putrada Ekadashi Vrat Kataha: पुत्रदा एकादशी 2023 ; जाणून घ्या व्रत कथा, शुभ मुहूर्त, पूजा विधी (Photo: iStock) 
थोडं पण कामाचं
  • 2 जानेवारी 2023 रोजी पौष पुत्रदा एकादशी
  • जाणून घ्या व्रत कथा, शुभ मुहूर्त आणि इतर माहिती

2023 Pausha Putrada Ekadashi: हिंदू धर्मात सर्व सण उत्सव, उपवासांना एक वेगळे महत्त्व आहे. उपवासांमध्ये एकादशीचा उपवास याला सुद्धा एक खास महत्त्व आहे. एकादशीचे व्रत, उपवास केल्याने सर्व अडचणी, समस्या दूर होतात आणि संसार सुखाचा होतो अशी मान्यता आहे. 2023 या वर्षात 2 जानेवारी रोजी पौष पुत्रदा एकादशी आहे. पुत्रदा एकादशीचे महत्त्व, व्रत कथा नेमकी काय आहे तसेच शुभ मुहूर्त जाणून घ्या... (2023 Pausha Putrada Ekadashi Vrat Katha Shubh Muhurat Puja Time Vidhi in marathi)

पुत्रदा एकादशीची व्रत कथा

एकदा युधिष्ठिरने भगवान श्री कृष्णाला विचारले, हे नाथ, मानवाच्या कल्याणासाठी पौष शुक्ल एकादशीचे नाव, महत्त्व, कथा आणि पूजेची पद्धत सांगा. यावर श्री कृष्णाने उत्तर दिले, पौष शुक्ल एकादशीचे नाव पुत्रदा एकादशी आहे. या व्रतासारखे पुण्याचे असे व्रत दुसरे कुठलेही नाही. हे व्रत केल्याने माणूस लक्ष्मीवान, विद्वान बनतो.

हे पण वाचा : हिवाळ्यात नेमकं किती पाणी प्यायला हवे?

काय आहे पौराणिक कथा?

पौराणिक कथांनुसार, भद्रावती नावाच्या एका नगरीत सुकेतुमान नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या पत्नीचं नाव शैव्य होतं. राजा-राणी यांना मुल-बाळ नसल्याने ते सातत्याने चिंतेत असायचे. आपल्यानंतर आपले सिंहासन कोण सांभाळेल, आपल्या मृत्यू नंतर अंत्यसंस्कार कोण करेल, श्राद्ध कोण करणार अशी चिंता त्यांना सतावत होती. या सर्वांचा विचार करुन राजाची तब्येत ढासळू लागली.

एकदा राजा जंगलाच्या भ्रमंतीवर निघाला आणि तेथील निसर्गाचा आनंद घेऊ लागला. तेथे त्याने पाहिले की, हरीण, मोर आणि इतर प्राणी-पक्षी आपल्या बायको-मुलांसह जीवनाचा आनंद लुटत आहेत. हे पाहिल्यावर तो अधिक व्याकुळ झाला आणि त्याला वाटले की, इतके पुण्य करुन तसेच इतकी विधी, होम वगैरे केल्यानंतरही आपल्याला मुल-बाळ नसल्याने दु:ख सहन करावे लागत आहे.

हे पण वाचा : Happy New Year 2023: नववर्षात व्हाल मालामाल, केवळ करावे लागेल हे काम

त्यावेळी राजाला तहान लागते आणि तो पाण्याच्या शोधात इकडे-तिकडे भटकू लागतो. पाण्याच्या शोधात भटकत असताना त्याची नजर एका सुंदर तलावाच्या शेजारी बांधलेल्या ऋषी मुनींच्या आश्रमावर पडली. राजा तेथे पोहोचला आणि सर्व ऋषींना नमस्कार केला. राजाचा हा स्वभाव पाहून सर्व ऋषी त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला आपली इच्छा व्यक्त करण्यास सांगितले. त्यानंतर राजाने म्हटले, हे देवा, परमेश्वर आणि तुमच्या कृपेने माझ्याकडे सर्व आहे. पण मला मुल-बाळ नाही.

हे ऐकल्यावर ऋषी म्हणाले, आज पुत्रदा एकादशी आहे आणि तुम्ही पूर्ण निष्ठेने आजचं व्रत करा. असे केल्याने तुम्हाला पुत्र रत्न प्राप्त होईल. ऋषींनी हे सांगितल्यावर राजाने त्याचं पालन केलं आणि पूर्ण निष्ठेने एकादशीचं व्रत करुन श्रीहरी पूजन केलं, दान केले. त्यानंतर काही दिवसांनी राणी गर्भवती झाली आणि तिने तेजस्वी, यशस्वी, ओजस्वी बालकाला जन्म दिला.

हे पण वाचा : दररोज खा अंडे पुरुषांना मिळतील जबरदस्त फायदे

पुत्रदा एकादशी पूजा विधी (Putrada Ekadashi Pooja Vidhi in marathi)

पुत्रदा एकादशीला पहाटे उठून अंघोळ करा. नंतर पूजा करण्यासाठी एक चौरंग घ्या. या चौरंगावर पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर विष्णू देवाची मूर्ती किंवा फोटो याची प्रतिष्ठापना करा. विष्णू देवाची फळे, फुले, नारळ, पान-सुपारी, लवंग याने पूजा करा. पूजा झाल्यावर विष्णू देवाची आरती करा. विष्णू देवाला नैवेद्य अर्पण करा. विष्णू देवाला तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्या. 

पुत्रदा एकादशी मुहूर्त (Putrada Ekadashi muhurat)

पौष एकादशीचा आरंभ रविवार 1 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी होणार आहे. या एकादशीचा समारोप सोमवार 2 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी 8 वाजून 24 मिनिटांनी होणार आहे. पुत्रदा एकादशीचे व्रत सोमवार 2 जानेवारी 2023 रोजी करावे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी