Diwali 2020: शेकडो वर्षांनी दिवाळीत होणार ३ ग्रहांची युती, जाणून घ्या कधी आहे कुठले पर्व

कार्तिक महिन्यात साजरा केला जाणारा दिवाळीचा सण सामान्यतः पाच दिवसांचा असतो, मात्र यावेळी नरकचतुर्दशी म्हणजेच छोटी दिवाळी आणि मुख्य दिवाळी एकाच दिवशी साजरी करण्यात येणार आहे.

Diwali 2020
Diwali 2020: शेकडो वर्षांनी दिवाळीत होणार ३ ग्रहांची युती, जाणून घ्या कधी आहे कुठले पर्व  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • यावेळी नरकचतुर्दशी आणि मुख्य दिवाळी एकाच दिवशी
  • यावेळी पाहायला मिळणार ग्रहांचा मोठा खेळ
  • जाणून घ्या दिवाळीच्या सर्व दिवसांचे महत्व

कार्तिक महिन्यात (Kartik month) साजरा केला जाणारा दिवाळीचा सण (Diwali festival) सामान्यतः पाच दिवसांचा (celebrated for 5 days) असतो, मात्र यावेळी नरकचतुर्दशी (Narak Chaturdashi) म्हणजेच छोटी दिवाळी आणि मुख्य दिवाळी (main Diwali) एकाच दिवशी साजरी (same day) करण्यात येणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी (Dhanatrayodashi), १४ नोव्हेंबर रोजी नरकचतुर्दशी आणि दिवाळी (लक्ष्मीपूजन) (Lakshmi Poojan), १५ नोव्हेंबर रोजी पाडवा (Padwa), गोवर्धनपूजा, कालीपूजा, अन्नकूट आणि १६ नोव्हेंबरला भाऊबीज (Bhaubeej), चित्रगुप्त जयंती, यमद्वितीया आणि बळीप्रतिपदा साजरी करण्यात येणार आहे.

यावेळी पाहायला मिळणार ग्रहांचा मोठा खेळ

ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार या दिवाळीत ग्रहांचा मोठा खेळ पाहायला मिळणार आहे. दिवाळीत गुरू ग्रह हा स्वराशी धनु आणि शनि आपल्या स्वराशी मकरमध्ये असतील तर शुक्र ग्रह कन्या राशीत असेल. या तीन ग्रहांची ही स्थाने आपल्या दुर्मिळ संयोगामुळे या दिवाळीचे महात्म्य वाढवतील. असा योग १५२१मध्ये म्हणजेच ४९९ वर्षांपूर्वी आला होता.

जाणून घ्या दिवाळीच्या सर्व दिवसांचे महत्व

यावर्षी १३ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. यादिवशी आरोग्यदेवता धन्वंतरीची पूजा केली जाते. व्यापारी आपल्या दुकानात नवीन वह्या ठेवतात, ज्यात ते नव्याने हिशोब मांडण्यास सुरुवात करतात. यादिवशी नव्या गोष्टींची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच नरकचतुर्दशीला कालीमातेचीही पूजा केली जाते. याच दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून त्याच्या कैदेत असलेल्या १६ हजार मुलींना सोडवल्याची कथा सांगितली जाते. पाडवा १५ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी सर्व सुवासिनी आपल्या पतीला ओवाळतात. शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. यादिवशी सर्व बहिणी आपल्या भावाला ओवाळतात आणि भाऊ बहिणींना भेटवस्तू देतात.

अशाप्रकारे हा चार दिवसांचा दिवाळसण साजरा केला जातो. यावर्षी तर ग्रहांच्या खेळामुळे हा सण अधिकच फलदायी आणि पवित्र असल्याचे म्हटले जात आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी