Kalbhairav Aarti : कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवाला प्रसन्न करण्यासाठी म्हणा ही आरती

aarti to please Kalabhairava on Kalashtami : महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार यंदा कालाष्टमी चैत्र कृष्ण अष्टमीच्या दिवशी अर्थात गुरुवार 13 एप्रिल 2023 रोजी आहे. कालाष्टमीला महादेवाचे अर्थात भगवान शिव यांचे रौद्र रूप असलेल्या काळभैरवाची अर्थात कालभैरवाची पूजा करतात.

Kalbhairav Aarti
कालाष्टमीला काळभैरवाला प्रसन्न करण्यासाठी म्हणा ही आरती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कालाष्टमीला काळभैरवाला प्रसन्न करण्यासाठी म्हणा ही आरती
  • कालाष्टमी म्हणजे काय?
  • कालाष्टमीच्या दिवशी अशी करा काळभैरवाची पूजा

Kalashtami April 2023, Kalbhairav Aarti : महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार यंदा कालाष्टमी चैत्र कृष्ण अष्टमीच्या दिवशी अर्थात गुरुवार 13 एप्रिल 2023 रोजी आहे. कालाष्टमीला महादेवाचे अर्थात भगवान शिव यांचे रौद्र रूप असलेल्या काळभैरवाची अर्थात कालभैरवाची पूजा करतात. शनी आणि राहूच्या दशेपासून मुक्ती मिळवण्यासाठी ही पूजा अतिशय महत्त्वाची असल्याचे सांगतात.

Kalashtami : कालाष्टमी म्हणजे काय?

कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी अर्थात अष्टमीला असते. अष्टमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. ही पौर्णिमेनंतरच्या आणि अमावस्येनंतरच्या साधारणपणे आठव्या दिवशी असते. पौर्णिमेनंतरची अष्टमी ही वद्य अष्टमी असते, त्या अष्टमीला कालाष्टमी हे नाव आहे. महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार यंदा कालाष्टमी चैत्र कृष्ण अष्टमीच्या दिवशी अर्थात गुरुवार 13 एप्रिल 2023 रोजी आहे.

Kalbhairav Puja Vidhi : कालाष्टमीच्या दिवशी अशी करा काळभैरवाची पूजा

कालाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि धूतवस्त्र परिधान करावे अथवा सोवळे नेसावे. यानंतर कालभैरवाची मूर्ती शुभ ठिकाणी स्थापित करावी. त्यानंतर गंगाजल अथवा आपल्या भागातील नदीचे पाणी शिंपडून ते स्थान शुद्ध करुन घ्या. आता कालभैरवाच्या मूर्तीला फुले, नारळ, इमरती, पान आदी वाहून मनोभावे विधीवत पूजा करा. जा करतांना आपला चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला राहील याची काळजी घ्या. भगवान कालभैरवासमोर धूप दीप लावा. भैरव मंत्रांचा 108 वेळा जप करा. आरती करुन पूजा संपन्न करा.

काही जण कालभैरवाची रात्री पूजा करतात. ही पूजा निशिता पूजा म्हणून ओळखली जाते. यंदा मंगळवार 12 एप्रिल 2023 रोजी रात्री 12 नंतर म्हणजेच बुधवार 13 एप्रिल 2023 रोजी मध्यरात्री निशिता पूजा करता येईल. ही पूजा बुधवार 13 एप्रिल 2023 रोजी रात्री 12 वाजून 44 मिनिटांपर्यंत म्हणजेच नव्या दिवसाच्या पहिल्या 44 मिनिटांत करणे हिताचे. 

Kalbhairav Meditation Mantra : पूजेचा ध्यानमंत्र

"अष्टकालं महाकालं भैरवाष्टगणान्वितम्।
चंद्रमासहितं शुक्‍ल मृत्युंजय नमोऽस्तु ते ॥"

कालभैरवाला प्रसन्न करण्यासाठी 'अष्टकालं....' हा पूजेचा ध्यानमंत्र म्हणा. 

Kalbhairav Aarti : काळभैरव आरती किंवा कालभैरव आरती

आरती ओवाळू भावें, श्री काळभैरावाला ||
दिनदयाळा भक्तवत्सला, प्रसन्न हो मजला ||
देवा, प्रसन्न हो मजला || धृ ||

धन्य तुझा अवतार जागी, या रौद्ररुपधारी |
उग्र भयंकर भव्य मुर्ति, परि भक्तांसी तारी |
काशीक्षेत्री वास तुझा, तू तिथला अधिकार |
तुझिया नामस्मरणे, पळती पिशाच्चादि भारी ||
पळती पिशाच्चादि भारी || आरती .....|| १ ||

उपासकां वरदायक होसी, ऐसी तव कीर्ती |
क्षुद्र जीव मी अपराधांना, माझ्या नच गणती |
क्षमा करावी, कृपा असावी, सदैव मजवरती |
मिलींदमाधव म्हणे देवा, घडो तुझी भक्ती ||
देवा घडो तुझी भक्ती || आरती .... || २ ||

Kalbhairav Mantra : काळभैरव मंत्र किंवा कालभैरव मंत्र

ओम कालभैरवाय नम:। ओम ह्रीं बं बटुकाय आपदुद्धारणाय कुरूकुरू बटुकाय ह्रीं। ओम भ्रं कालभैरवाय फट्। जय भैरव देवा, प्रभु जय भैंरव देवा।

Kalbhairav Ashtak : काळभैरव अष्टक किंवा कालभैरव अष्टक

देवराजसेव्यमानपावनांघ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् ।
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ १॥

भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् ।
कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ २॥

शूलटंकपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् ।
भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ३॥

भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम् ।
विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥ ४॥

धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशनं कर्मपाशमोचकं सुशर्मधायकं विभुम् ।
स्वर्णवर्णशेषपाशशोभितांगमण्डलं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ५॥

रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरंजनम् ।
मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ६॥

अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसंततिं दृष्टिपात्तनष्टपापजालमुग्रशासनम् ।
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ७॥

भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम् ।
नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ८॥

॥ फल श्रुति॥

कालभैरवाष्टकं पठंति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम् ।
शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिं नरा ध्रुवम् ॥

॥इति कालभैरवाष्टकम् संपूर्णम् ॥

  1. कालाष्टमीला 21 बेलपानांवर लाल किंवा पांढऱ्या चंदनाने ओम नमः शिवाय असे लिहावे आणि ती बेलपाने शिवलिंगावर अर्पण कराव. संध्याकाळी कालभैरवाष्टकाचे पठण करावे. कालभैरवासमोर तेलाचा दिवा लावावा. भगवान भैरवाचे वाहन मानल्या जाणाऱ्या काळ्या कुत्र्याला खाऊ घालावे. ब्राह्मणांना आणि गरजूंना यथाशक्ति दान करावे.
  2. कालभैरवाला प्रसन्न केले तर अडचणी दूर होण्यास मदत होते. शनी आणि राहूच्या दशेपासून मुक्ती मिळवण्यास मदत होते. संकटे दूर होण्यास मदत होते. मनोभाव पूजा करणाऱ्याची अनावश्यक भीती कमी होण्यास मदत होते. आत्मविश्वास वाढतो. नकारात्मकता कमी होऊन सकारात्मकता वाढू लागते. 
  3. कालभैरवाची पूजा करणाऱ्याने वाईट वागणे, खोटे बोलणे, कायदा नियम यांचे उल्लंघन या सर्व चुकीच्या गोष्टी करणे टाळावे.

आपण निरोगी असल्याची गॅरेंटी देणारे 10 संकेत

दुपारच्या जेवणानंतर झोप काढण्याचे फायदे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी