Astrology: या कारणामुळे पूजा विधी आणि शुभ कार्यापासून दूर ठेवला जातो कांदा आणि लसूण 

आध्यात्म
Updated Jun 11, 2022 | 10:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Onion And Garlic In Puja Path | हिंदू धर्मामध्ये पूजेला विशेष महत्त्व आहे. रिद्धी-सिद्धी आणि सौभाग्यासाठी लोक घरी पूजा करतात. लक्षणीय बाब म्हणजे पूजेदरम्यान लसूण आणि कांद्याला पूजेच्या ठिकाणापासून दूर ठेवले जाते हे तुम्ही पाहिले असेलच.

According to astrology onions and garlic are kept away during puja path
... म्हणून पूजेपासून दूर ठेवला जातो कांदा आणि लसूण   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हिंदू धर्मामध्ये पूजेला विशेष महत्त्व आहे.
  • रिद्धी-सिद्धी आणि सौभाग्यासाठी लोक घरी पूजा करतात.
  • पूजेदरम्यान लसूण आणि कांद्याला पूजेच्या ठिकाणापासून दूर ठेवले जाते.

Jyotish Shastra In Puja Paath | मुंबई : हिंदू धर्मामध्ये पूजेला विशेष महत्त्व आहे. रिद्धी-सिद्धी आणि सौभाग्यासाठी लोक घरी पूजा करतात. लक्षणीय बाब म्हणजे पूजेदरम्यान लसूण आणि कांद्याला पूजेच्या ठिकाणापासून दूर ठेवले जाते हे तुम्ही पाहिले असेलच. कांदा आणि लसूण कधीच धार्मिक कार्यात वापरले जात नाही, तसेच लसणाचा कांदा उपवासाच्या जेवणातही वापरला जात नाही. असे करणे हिंदू धर्मात अशुभ मानले जाते. काही लोक नवरात्रीमध्ये नऊ दिवस लसूण आणि कांदा घरात ठेवत नाहीत. हिंदू धर्मानुसार यामागे एक मोठे कारण आहे. (According to astrology onions and garlic are kept away during puja path). 

अधिक वाचा : पाकने वेस्टइंडिजविरूद्ध जिंकली सलग १० वी एकदिवसीय मालिका

हे आहे मुख्य कारण

हिंदू धर्मानुसार जेव्हा समुद्रमंथनातून अमृत बाहेर पडले तेव्हा ते अमृत पिण्यासाठी देव आणि दानवांमध्ये भांडण झाले होते. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनीच्या रूपात दानवांना अमृतपान करण्याच्या उद्देशाने राक्षकांना गोंधळात टाकून मोहिनी रूप धारण करून अमृत वाटायला लागले होते. सर्वप्रथम देवांची अमृत पिण्याची पाळी आली होती. राहू नावाच्या राक्षसाला मोहिनीचा संशय आल्यावर तो वेशभूषा बदलून हळूच देवांच्या पक्तींत जावून बसला. अमृत ​​वाटताना मोहिनी रुपात असलेल्या भगवान विष्णूंना त्या राक्षसाला ओळखताही आले नाही आणि त्यांना राक्षसालाही अमृत पाजले. 

दरम्यान, सूर्यदेव आणि चंद्रदेवांनी त्याला ओळखले. तेव्हाच त्यांनी मोहिनीच्या रूपात अमृत वाटणार्‍या भगवान विष्णूंना राक्षसाच्या या युक्तीची माहिती दिली. भगवान विष्णू क्रोधित झाले आणि त्यांनी सुदर्शन चक्राने राक्षसाचे मस्तक शरीरापासून वेगळे केले. डोके कापल्याबरोबर राक्षसाच्या मुखातून अमृताचे काही थेंब रक्तासह जमिनीवर पडले, ज्यातून कांदा आणि लसूण उत्पन्न झाले होते. कांदा आणि लसूणमध्ये आरोग्याशी निगडित अनेक गुणधर्म असतात. मात्र त्याच्यामध्ये आसुरी गुणधर्मांचा समावेश असल्यामुळे कांदा आणि लसूण पूजेपासून दूर ठेवले जाते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी