समुद्र शास्त्र: अशा बोटांच्या मुली असतात खूप लकी, चमकवतात पतीचे भविष्य

आध्यात्म
Updated Aug 19, 2022 | 17:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Lucky Girl: समुद्र शास्त्रानुसार भाग्यशाली मुलींबाबत काही संकेत सांगितले आहेत. अशा लकी मुलींची ओळख त्यांच्या बोटांवरून केली जाऊ शकते. 

fingers
अशा बोटांच्या मुली असतात खूप लकी, चमकवतात पतीचे भविष्य 
थोडं पण कामाचं
  • ज्या मुलींची बोटे गोल आणि लांब असतात त्यांना समुद्रशास्त्रानुसार खूप लकी मानले गेले आहे
  • समुद्रशास्त्रानुसार ज्या मुलींची बोटे छोटी असतात त्या खूप पैसे खर्च करतात.
  • ज्या मुलींची बोटे पुढून पातळ असतात तसेच पोर जाड असतात अशा मुली सुखी वैवाहिक जीवन जगतात.

मुंबई: समुद्रशास्त्रानुसार(palmistry) व्यक्तीच्या शरीराचे विभिन्न अंगाच्या माध्यमातून त्याच्यातील गुण तसेच भविष्याबाबतचे आकलन केले जाते. यावरून जाणून घेता येते की हा मुलगा(boy) अथवा मुलगी(girl) किती लकी आहे तसेच तो मुलगा अथवा मुलगी कसा जोडीदार बनणार ते. समुद्रशास्त्रानुसार मुलींच्या बोटांवरून हे जाणून घेता येते की त्या किती भाग्यवान आहेत तसेच आपल्या पतीसाठी किती लकी आहेत. According to palmistry lucky girls who have this type of fingers 

अधिक वाचा -Ishan Kishan:इशान किशनवर मधमाशीचा हल्ला, Video 

मुलींच्या बोटांवरून जाणून घ्या भाग्य

समुद्रशास्त्रानुसार ज्या मुलींची बोटे छोटी असतात त्या खूप पैसे खर्च करतात. या मुलींना महागड्या गोष्टी खरेदी करण्याचा शौक असतो. त्यांना सजून-धजून राहायला आवडते.मात्र या मुली नाते निभावण्यात अव्वल असतात. या प्रत्येक परिस्थितीत आपल्या पतीची साथ देतात आणि त्याला सपोर्ट करतात. दरम्यान या खूप खुल्या विचारांच्या असल्याने सगळ्यांशीच यांचे पटत नाही. 

ज्या मुलींची बोटे गोल आणि लांब असतात त्यांना समुद्रशास्त्रानुसार खूप लकी मानले गेले आहे. याचा स्वभाव खूप चांगला असतो. त्या कमी बोलून साऱ्यांची मने जिंकतात. या मुली चांगल्या बिझनेसवुमन सिद्ध होतात. तसेच पतीला बिझनेसमध्ये साथ देतात. तसेच त्यांचे नशीब चमकवतात. यांचे पती बिझनेसमध्ये खूप पैसै कमावतात. 

अधिक वाचा - छोट्याशा भांडवलाद्वारे अमूलद्वारे सुरू करा स्वत:चा व्यवसाय

ज्या मुलींची बोटे पुढून पातळ असतात तसेच पोर जाड असतात अशा मुली सुखी वैवाहिक जीवन जगतात. या आपल्या पतीवर खूप प्रेम करतात आणि त्यांची पर्वा करतात. अशा मुली आपल्या पतीसाठी खूप भाग्यवान ठरतात. 

कुंडलीत हा योग असल्यास मिळतो मनपसंत नवरा

असं म्हटलं जातं की ज्या मुलींच्या कुंडलीत लग्न, पंचम, सप्तम आणि एकादश शुभ भावात दृष्ट असतात त्या मुलींना मनासारखा तसेच तिच्यासाठी योग्य असलेला जोडीदार भेटतो. विवाहाच्या दृष्टीने या ग्रहांना विशेष महत्त्व आहे. या प्रकारे जेव्हा मुलींच्या कुंडलीत तीनही ग्रह मजबूत असतात त्यांना योग्य जोडीदार भेटतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी