Akshaya Tritiya 2022: ५० वर्षानंतर अक्षय तृतीयेला ग्रहांचा महासंयोग, करून घ्या ही कामे

आध्यात्म
Updated Apr 22, 2022 | 12:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Akshaya Tritiya 2022: यावेळेस अक्षय्य ततृतीयेला ३० वर्षानंतर नक्षत्रांचा खूप चांगला शुभ संयोग आणि ५० वर्षानंतर ग्रहांचा महासंयोग बनत आहे. या दिवशी कोणतेही काम करण्यासाठी विशेष मुहूर्ताची गरज नाही. 

akshay tritiya
५० वर्षानंतर असे काहीतरी घडतेय अक्षय्य तृतीयेच्या दिवशी 
थोडं पण कामाचं
  • यावेळेस अक्षय्य तृतीया मंगल रोहिणी नक्षत्राच्या शोभन योगमध्ये साजरी केली जात आहे.
  • असे शुभ योग अक्षय्य तृतीयेला ३० वर्षानंतर येत आहेत.
  • ५० वर्षानंतर या दिवशी ग्रहांची स्थितीही खास असणार आहे.

मुंबई: वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय़्य तृतीया(akshat tritiya) म्हणतात. अक्षय्य म्हणजे ज्याला क्षय नाही असा. हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला अतिशय शुभ मानले गेले आहे. या दिवशी लग्न-विवाह(marriage), गृह प्रवेश, नवे घर-गाडी खरेदी करण्यासाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो. म्हणजेच या दिवशी कोणत्याही मुहूर्ताशिवाय(muhurt) पूर्ण दिवसभरात कधीही शुभ कामे करता येतात. यावेळस ३ मेला अक्षय्य तृतीया साजरी केली जात आहे. यंदाची अक्षय्य तृतीया खास आहे. यावेळेस अक्षय्य तृतीयेला विशेष संयोग बनत आहेत जे शुभ आहेत. After 50 years this happens on akshay tritiya

अधिक वाचा - कारला लागलेल्या आगीत ३ मुलांसह ५ जणांचा होरपळून मृत्यू

५० वर्षानंतर महासंयोग

यावेळेस अक्षय्य तृतीया मंगल रोहिणी नक्षत्राच्या शोभन योगमध्ये साजरी केली जात आहे. असे शुभ योग अक्षय्य तृतीयेला ३० वर्षानंतर येत आहेत.तर ५० वर्षानंतर या दिवशी ग्रहांची स्थितीही खास असणार आहे. अक्षय्य तृतीयेला चंद्रमा आपली उच्च राशी वृषभमध्ये आणि शुक्र आपली उच्च राशी मीनमध्ये असणार आहे. याशिवाय शनी आपली राशी कुंभमध्ये आणि देवगुरू गुरू आपलीच राशीमीनमध्ये असणार आहे. म्हणजेच ४ ग्रहांची अशी अनुकूल स्थिती असणे खूप खास आणि शुभ आहे. 

अक्षय्य तृतीयेला जरूर करा दान

ग्रह-नक्षत्रांची अशी शुभ स्थिती असताना या दिवशी दान करणे अतिशय फलदायी आहेत. सोबत आयुष्याच्या विविध क्षेत्रात शुभ फळे मिळतील. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेल्या कलशावर फळे ठेवून दान करणे शुभ मानले जाते. यासाठी २ कलश दान केले पाहिजेत. एक कलश पित्रांच्या नावाने आणि दुसरा भगवान विष्णूच्या नावाने दान केले पाहिजे. असेकेल्याने पितृ आणि भगवान विष्णू दोघेही प्रसन्न होतात. तसेच घरात सुखशांती राहते. 

अधिक वाचा - आंतरराष्ट्रीय घटक आणि मागणी यांच्या हिंदोळ्यावर सोने-चांदी

हा आहे अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त

३ मे २०२२, मंगळवारी सकाळी ५.१९ वाजल्यापासून तृतीया तिथी सुरू होईल आणि ४ मे सकाळी ७.३३ वाजेपर्यंत राहील. रोहिणी नक्षत्र सकाळी १२.३४ वाजल्यापासून ४ मे दुपारी ३.१८ वाजेपर्यंत राहील. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी