Akshay Tritiya 2022 Money Tips: हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयाचं खूप महत्त्व असते. हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी सोन्याची काहीतरी वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र त्यासोबतच अक्षय्य तृतीयाच्या दिवशी काहीतरी नवीन वस्तू खरेदी करणे आणि त्यानंतर मंगल कार्यांचं आयोजन करणं देखील खूप शुभ असतं.
दिवाळीप्रमाणेच अक्षय्य तृतीयाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यानं घरात धन धान्याची भरभराट होते तसंच आरोग्य देखील चांगलं राहतं. अक्षय्य तृतीयाच्या निमित्तानं तुम्हांला काही उपाय सांगणार आहोत. जे केल्यानं तुमच्या घरात लक्ष्मी नेहमीच विराजमान राहिल आणि तुम्हांला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या उद्भवणार नाही.
सोनं खरेदी करण्याचं महत्व
वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य्य तृतीया असं म्हणतात. हिंदू धर्मामध्ये या तिथीचं फार महत्त्व आहे. मंगलकार्यांच्या दृष्टीनंही ही तिथी महत्त्वाची मानली जाते. या दिवशी अनेक लोक आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार दान-धर्म करतात आणि पुण्य प्राप्त करून घेतात. यंदा ७ मे रोजी अक्षय्य्य तृतीया आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा संपूर्ण दिवश शुभ असतो. या दिवशी सोनं खरेदी करून घरी आणल्यास व्यक्तीचा भाग्योदय होतो, असं म्हणतात. अक्षय्य्य तृतीयेच्या दिवशी सूर्य सर्वाधिक तेजस्वी असतो, असं म्हटलं जातं. म्हणूनच कदाचित सोन्याची तुलना सूर्यासोबत केली गेली आहे. सोनं शक्ती आणि बलाचं प्रतिक आहे आणि या दिवशी सोनं खरेदी केल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो.