पतीपासून लपवून केले जाते हे व्रत... भारताच्या या राज्यांत आहे प्रसिद्ध

आध्यात्म
Updated Apr 15, 2021 | 13:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

गणगौर पुजा महिलांसाठी महत्त्वाच्या पर्वांपैकी एक आहे. महिला आपल्या नवऱ्यापासून लपवून हे व्रत करतात. तसेच पुजेमधील प्रसादही पतीला दिला जात नाही. 

gangour
पतीपासून लपवून केले जाते हे व्रत... भारताच्या या राज्यांत आहे प्रसिद्ध 

थोडं पण कामाचं

  • गणगौरचे पर्व राजस्थानसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा आणि गुजरात सारख्या उत्तर पश्चिम भागात साजरे केले जाते
  • या दिवशी गणगौर माता म्हणजेच माता पार्वतीची पुजा केली जाते तसेच त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. 
  • पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केले जाते

मुंबई: भारत हा विविधतेचा देश आहे. देशातील अनेक भागांमध्ये विविध प्रकारचे सण तसेच व्रत वैकल्य साजरे केले जातात. असेच एक व्रत आहे जे महिलांसाठी महत्त्वाचे असते जे भारताच्या उत्तर भागांमध्ये साजरे केले जाते. हे आहे गणगौर व्रत. हे व्रत नवऱ्यापासून लपवून केले जात. तसेच गणगौर माता म्हणजेच माता पार्वतीची पुजा केली जाते. ज्यामुळे पतीला दीर्घायुष्य लाभते. दरवर्षी तिथी चैत्र मासाच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हे व्रत असते. गणगौरचा अर्थ गण शिव आणि गौर माता पार्वती असते. 

गणगौर पुजा २०२१ तिथी आणि मुहूर्त

गणगौर पूजा तिथि: - १५ एप्रिल २०२१, गुरुवार

तृतीया तिथि प्रारंभ: - १४ एप्रिल २०२१ (दुपारी १२.४७)

कृपया तिथि समाप्त: - १५ एप्रिल २०२१1 (दुपारी ३.२७)

गणगौर पुजेचे महत्त्व

गणगौर पुजा खासकरन राजस्थान आणि मध्य प्रदेशासह भारताच्या उत्तर प्रांतामध्ये केली जाते. महिला आणि कुमारिंकासाठी ही पुजा महत्त्वाची आहे. पौराणिक कथांनुसार या दिवशी प्रेमाचे जिवंत उदाहरण मानले जाते. कारण शंकर देवांनी माता पार्वतीला आणि माता पार्वतीने संपूर्ण स्त्रियांना सौभाग्यवती होण्याचे वरदान दिले होते. ज्या पत्नी गणगौर व्रत करतात तसेच शंकर आणि माता पार्वतीची पुजा करतात त्यांच्या पतींना दीर्घायुष्य लाभते. ज्या कुमारिका हे व्रत करतात त्यांना त्यांच्या पसंतीचा वर भेटतो. हे पर्व सग १६ दिवस साजरे केले जाते आणि गौर निर्माण करून पुजा केली जाते. 

गणगौरची कहाणी

गणगौर व्रताच्या कथेनुसार एकदा शंकर देव आणि माता पार्वती वनात गेले होते. चालत चालत ते एका घनदाट वनात पोहोचतात. तेव्हा माता पार्वती शंकर देवांना सांगते की मला तहान लागली आहे. तेव्हा शंकर सांगतात की देवी पाहा ज्या दिशेने पक्षी उडत आहेत तिथे नक्कीच पाणी असेल. देवी पार्वती तेथे गेल्या त्या ठिकाणी नदी वाहत होती. देवी पार्वतींनी पाणी पिण्यासाठी पाण्याची ओंजळ भरली तेव्हा त्यांच्या हातात गवत आले. दुसऱ्यांना त्यांनी पाण्याची ओंजळ भरली तेव्हा पळसाची फुले त्यांच्या हातात आली. तिसऱ्यांदा त्यांनी ओंजळ भरली तेव्हा ढोकला नावाचे फळ हातात आले. यावरून देवी पार्वतींच्या मनात अनेक प्रकारचे विचार येऊ लागले. मात्र त्यांच्या लक्षात येत नव्हते. यानंतर भगवान शंकरांनी त्यांना सांगितले की आज चेत्र शुक्ल तिथी आहे. विवाहित महिलांसाठी आजचा दिवस उत्सवाचा दिवस आहे. गौरीला अर्पण केलेले गवताची पेंडी, फूल तसेच अन्य साहित्य नदीतून वाहून येत आहे. यावर देवी पार्वतीने विनंती केली की दोन दिवसांसाठी तुम्ही माझ्या आई-वडिलांचे नगर बनवा. ज्यामुळे साऱ्या स्त्रिया तेथे येऊ गणगौरचे व्रत करतील आणि मी स्वत: त्यांच्या कुंकूवाचे रक्षण करण्याचा आर्शीवाद देईन. शंकर देवाने असे केले. थोड्या वेळात बऱ्याच स्त्रियांचा एक लोंढा तेथे आला तेव्हा पार्वती देवी चिंतेत पडल्या. तेव्हा त्यांनी महादेवांना सांगितले की त्यांनी आधीच वरदान दिले आहे. आता महादेवांनी यासाठी वरदान द्यावे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी