Amavasya 2022 Date Time, do this important work for the peace of ancestors: महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या हिंदू पंचागानुसार गुरुवार 22 डिसेंबर 2022 आणि शुक्रवार 23 डिसेंबर 2022 रोजी मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या आहे. ही 2022 या वर्षातील शेवटची अमावस्या आहे. या अमावस्येला पहाटे आंघोळ करतात, सूर्याला अर्ध्य देतात. नंतर घरातल्या देवांची पूजा करतात. यानंतर पितरांचे श्राद्ध केले जाते. पितरांना मुक्ती मिळावी यासाठी हा विधी केला जातो. अमावस्येच्या दिवशी यथाशक्ती दान करून पुण्यसंचय केला जातो.
पंचागानुसार गुरुवार 22 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी अमावस्या या तिथीचा प्रारंभ होत आहे. शुक्रवार 23 डिसेंबर रोजी दर्शवेळा अमावस्या आहे. अमावस्या या तिथीची समाप्ती दुपारी 3 वाजून 47 मिनिटांनी होईल. यामुळे अमावस्येशी संबंधित धार्मिक विधी शुक्रवार 23 डिसेंबर 2022 रोजी तिथी समाप्तीच्या आधी पूर्ण करणे योग्य होईल. अमावस्येचा प्रारंभ गुरुवारी संध्याकाळी होत असल्यामुळे तिथीशी संबंधित विधी शुक्रवार 23 डिसेंबर रोजी केले जातील.
गुरुवार 22 डिसेंबर 2022
सूर्योदयाची वेळ : सकाळी 7 वाजून 7 मिनिटे
शुक्रवार 23 डिसेंबर 2022
दर्शवेळा अमावस्या
सूर्योदयाची वेळ : सकाळी 7 वाजून 7 मिनिटे