Spider Plant: तुम्ही अनेक लोकांच्या घरात लहान पण अतिशय सुंदर दिसणारा स्पायडर प्लांट (spider plant) अनेकदा पाहिला असेल. विज्ञान (Science) देखील मानते की, ही वनस्पती (plant) एअर प्युरिफायरप्रमाणे काम करते. ही वनस्पती केवळ वास्तूमध्येच (Vastu) नव्हे तर ज्योतिष शास्त्र (Astrology) आणि फेंगशुईमध्येही (Feng Shui) भाग्यवान आणि शुभ मानली जाते. (amazing benefits of spider plant know right direction to plant)
आपले घर सुंदर बनवण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टींनी घर सजवतात. घर सजवण्यासाठी अनेक जण खऱ्याखुऱ्या वनस्पतीचा वापर देखील करतात. खरं म्हटलं तर झाडे घरातील वातावरण शुद्ध ठेवतात. वास्तुशास्त्रात असेही म्हटले आहे की, झाडांमुळे घरचे वातावरणच केवळ शुद्ध होत नाही तर ते घरातील सदस्यांमध्ये आनंदही आणतात. वास्तूनुसार अशी काही झाडे आहेत जी घरात लावल्याने सुख-समृद्धी मिळते आणि या झाडांची योग्य देखभाल केल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. यापैकी एक वनस्पती म्हणजे स्पायडर प्लांट.
अधिक वाचा: Mangalagaur 2022: श्रावणातील या चार तारखा मंगळागौर पूजनासाठी महत्त्वाच्या
या दिशेला लावा स्पायडर प्लांट
घरात वस्तू ठेवण्याच्या दिशेचे विस्तृत वर्णन वास्तुशास्त्रात आढळते. स्पायडर प्लांट ठेवण्याबाबत वास्तुशास्त्रात सांगितले आहे की, घराची उत्तर, पूर्व, ईशान्य किंवा उत्तर-पश्चिम दिशा ही रोपे ठेवण्यासाठी सर्वोत्तम आहे. वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये रोपे लावण्यासाठी या दिशा उत्तम आणि चांगल्या आहेत.
जर तुम्हाला हा प्लांट तुमच्या ऑफिस किंवा बिझनेसच्या ठिकाणी ठेवायचा असेल तर तुम्ही हे प्लांट तुमच्या कामाच्या ठिकाणी डेस्कवर ठेवू शकता.
स्पायडर प्लांट नेमका कुठे ठेवायचा?
घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवण्यासाठी स्पायडर प्लांट घरात योग्य ठिकाणी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार ही वनस्पती तुम्ही घराच्या दिवाणखान्यात, स्वयंपाकघरात, बाल्कनीत किंवा अभ्यासाच्या खोलीत देखील ठेवू शकता.
काही नियम जरुर पाळा
वास्तुशास्त्रात सांगितले आहे की, जर तुम्ही तुमच्या घरात स्पायडर प्लांट ठेवला असेल तर त्याला सुकू देऊ नका, जर हे रोप सुकले किंवा इतर कोणत्याही समस्येमुळे मरत असेल तर ते काढून टाका आणि लगेच नवीन रोप लावा. याशिवाय घराच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला स्पायडर प्लांट ठेवल्यास अशुभ परिणाम मिळू शकतात. म्हणून ही वनस्पती त्या दिशेला शक्यतो ठेवू नये.