Angarki Sankashti Chaturthi 2023 : गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी, 10 जानेवारीला अंगारकी संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी, चंद्रोदय वेळ

angarki sankashti chaturthi : अंगारकी चतुर्थी हे हिंदू धर्मातील एक तिथी व्रत आहे. ज्यावेळी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते त्यावेळी त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते.

angarki sankashti chaturthi on tuesday 10 january 2023
Angarki Sankashti Chaturthi 2023 : अंगारकी संकष्टी चतुर्थी महत्त्व आणि पूजा विधी, चंद्रोदय वेळ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी, 10 जानेवारीला अंगारकी संकष्टी चतुर्थी
 • जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी, चंद्रोदय वेळ
 • अंगारक संकष्ट चतुर्थी : मंगळवार 10 जानेवारी 2023, चंद्रोदय : रात्री 09 : 11

Angarki sankashti chaturthi on tuesday 10 january 2023 puja vidhi and chandrodaya timing : अंगारकी चतुर्थी हे हिंदू धर्मातील एक तिथी व्रत आहे. ज्यावेळी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते त्यावेळी त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. आता मंगळवार 10 जानेवारी 2023 रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी (अंगारकी संकष्टी चतुर्थी / अंगारकी / अंगारकी संकष्टी) आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पहाटे आंघोळ करून घरी गणपतीची पूजा करतात नंतर देवळात जाऊन गणपतीचे दर्शन घेतात. गणेश चतुर्थीचे तसेच अंगारकी चतुर्थीचे व्रत करणारे गणपतीचे भक्त या दिवशी दिवसभर उपवास करतात आणि रात्री भोजन करतात. भोजनात समाविष्ट असलेल्या उकडीच्या मोदकांचा गणपतीला नैवेद्य दाखवतात. 

अंगारक संकष्ट चतुर्थी (अंगारकी संकष्टी चतुर्थी / अंगारकी / अंगारकी संकष्टी) : मंगळवार 10 जानेवारी 2023, चंद्रोदय : रात्री 09 : 11 

मुद्गल पुराण आणि गणेश पुराणातील कथा

अंगारक (मंगळ) या भारद्वाज ऋषींच्या पुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला होता की तुझे नाव "अंगारक" हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय, असे मानले जाते. गणेशाने मंगळाला वर दिला की, तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल. हा वर दिला त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केले. या मूर्तीला 'मंगलमूर्ती" असे नाव मिळाले.

या मंत्राचा करा जप

गजाननं भूतगणादि सेवितं
कपित्थ जम्बूफलसार भक्षितम्
उमासुतं शोक विनाशकारणं
नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् ॥  

या मंत्राचा जप केल्यास गणपती बाप्पाची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते.

IND vs SL : सूर्यकुमार यादव चमकला, भारताने T20 सीरिज जिंकली, पहिली वन डे मंगळवारी

Sunday Mega Block | हुश्श…! या मार्गावरील मुंबईकरांना दिलासा, जाणून घ्या कुठे आहे मेगाब्लॉक

Accident : आमदार योगेश कदमांच्या कारला भीषण अपघात; घातपाताचा संशय, घटनेनंतर कदमांनी दिली प्रतिक्रिया

काय टाळावे?

 1. मांसाहार टाळावा. दारू, धुम्रपान अशी शरीराला घातक असलेली व्यसने टाळावी. 
 2. कोणाशी वाद घालू नये, हाणामारी टाळावी.
 3. अपशब्दांचा वापर टाळावा. कोणालाही दुखवू नये. प्राण्यांना दुखवू नये.
 4. राग, लोभ या दुर्गुणांचा त्याग करण्यासाठी संकल्प करावा आणि त्यावर अंमल करावा.

अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत पूजा विधी (Angarki Sankashti Chaturthi puja vidhi)

 1. सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्नान करावे.
 2. यानंतर श्रीगणेशाचे ध्यान करा आणि त्यांच्यासमोर व्रत करण्याचा संकल्प करा.
 3. दिवसभर उपवास करावा.
 4. दिवसभर उपवास करावा. दूध, फलाहार असा हलका आहार घ्यावा.
 5. स्नानानंतर गणेशाची पूजा करावी.
 6. गणेशाच्या मूर्तीला पाणी, रोली, अक्षत, दुर्वा, लाडू, पान, अगरबत्ती अर्पण करावं.
 7. पूजा करण्यासाठी जास्वंदाची फुले आणि दुर्वा यांचा वापर करावा. 
 8. गणरायाच्या मंत्रांचा जप करावा.
 9. प्रसन्न मनाने गणपतीची पूजा करताना अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणावे.
 10. संध्याकाळी चंद्र उदयानंतर पूजा करावी.
 11. संध्याकाळच्या पूजेनंतर अन्न ग्रहण करावं.
 12. ढगांमुळे चंद्र दिसत नसेल तर पंचगानुसार चंद्रोदयावेळी पूजा करावी.
 13. संध्याकाळच्या पूजेसाठी गणेशाची मूर्ती स्थापित करावी.
 14. गणपतीची धूप, दिवा, उदबत्ती, फुलांनी पूजा करावी.
 15. प्रसादात केळी, नारळ ठेवावं.
 16. तसेच गणेशाला आवडत्या मोदकाचा नैवेदय दाखवावा.
 17. या दिवशी गूळ व तिळाचे मोदक बनवले जातात.
 18. गणेश मंत्र जप करताना काही मिनिटे ध्यान करावं आणि कथा ऐकावी.
 19. गणपतीची आरती करावी व प्रार्थना करावी.
 20. यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन त्याची पूजा करावी.
 21. चंद्राला फुले व चंदन अर्पित करावं.
 22. चंद्राच्या दिशेने अक्षता अर्पित कराव्या.
 23. पूजा संपल्यानंतर प्रत्येकाला प्रसाद वाटप करुन अन्न ग्रहण करावं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी