Angarki Sankashti Chaturthi 2021 Wishes in Marathi: अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा Messages शेअर करा

Angarki Sankashti Chaturthi 2021 Wishes Marathi : सर्वांचा आवडता देव म्हणजे गणपती. अनेक जण गणेशाची वर्षभर आराधना करत असतात. चतुर्थी, संकष्टी चतुर्थीला अनेकांचे उपवास असतात. यानिमित Messages, Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा द्या.

angarki sankashti chaturthi 2021 wishes in marathi send through messages whatsapp status to celebrate with your family and friends
अंगारक संकट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज २३ नोव्हेंबर रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग जुळू आला आहे. 
  • अंगारकी चतुर्थी म्हटलं की गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसतो.
  • अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची (Lord Ganesha) आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते.

Angarki Sankashti Chaturthi 2021 Wishes Marathi : अंगारकी चतुर्थी म्हटलं की गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसतो. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची (Lord Ganesha) आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते. त्यामुळे भाविकही अगदी भक्तीभावाने गणेशाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात. यंदा कोरोनाचे सावट असल्याने खबरदारी म्हणून आपण बाहेर मंदिरात जाण्यापेक्षा घरातील देवापुढे नतमस्तक व्हावे. त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना सोशल मिडियाद्वारे फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप स्टेटसच्या (WhatsApp Status) माध्यमातून एकमेकांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देऊ शकता. 

जी संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. 

सर्वांचा आवडता देव म्हणजे गणपती. अनेक जण गणेशाची वर्षभर आराधना करत असतात. चतुर्थी, संकष्टी चतुर्थीला अनेकांचे उपवास असतात.  तर काही जण Messages, Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून एकमेकांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देतात.  आज २३ नोव्हेंबर रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग जुळू आला आहे. 

Angarki Sankashti Chaturthi Wishes in Marathi

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता

विघ्न विनाशक मोरया

संकटी रक्षी शरण तुला मी

गणपती बाप्पा मोरया

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

Angarki Sankashti Chaturthi Wishes in Marathi 1
अंगारकी निमित्त पूर्ण होवो तुमच्या मनोकामना

सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हास लाभो

हिच बाप्पा चरणी प्रार्थना

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा

Angarki Sankashti Chaturthi Wishes in Marathi 2

गजानना श्री गणराया

आधी वंदू तुज मोरया

मंगलमूर्ती श्री गणराया

आधी वंदू तुज मोरया

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

Angarki Sankashti Chaturthi Wishes in Marathi 3

प्रथम तुला वंदितो गणराया

तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया

तेजस्वी, प्रसन्न अशी तुझी काया

सदैव राहो आम्हावर तुझी प्रेमळ माया

अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा

Angarki Sankashti Chaturthi Wishes in Marathi 4

एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,

तन्नो दंती प्रचोदयात्

महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,

तन्नो दंती प्रचोदयात्

अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा


हिंदू पुराणात गणेशाच्या संबंधित अध्यायानुसार, गणपतीचा अंगारकी नामक एक भक्त होता. ऋषी भारद्वाज आणि माता पृथ्वीचा पुत्र अंगारकीने एके दिवशी गणेशाची आराधना सुरु केली. या तपस्येने प्रसन्न होऊन श्रीगणेश त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि सोबतच एक वर मागण्यास सांगितले. यावेळी अंगारकीने त्यांच्याकडे अशी मागणी केली की, मला तुमच्या नावाशी जोडले जायचे आहे. या मागणीनंतर श्रीगणेशाने अंगारकीला वरदान दिले, ज्यानुसार पुढील काळात जेव्हा जेव्हा चतुर्थी आणि मंगळवार हा योग्य जुळून येईल तेव्हा त्यास अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधले जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी