Angarki Sankashti Chaturthi 2022 Date and Time:अंगारकी संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय, तिथी आणि महत्त्व

अंगारकी संकष्टी चतुर्थी ही सर्वात शुभ मानली जाते. अंगारकी संकष्टी चतुर्थी हा सण कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरा केला जातो.

Angarki Sankashti Chaturthi 2022 Date and Time chandraodaya timing
अंगारकी संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय, तिथी आणि महत्त्व 
थोडं पण कामाचं
  • अंगारकी संकष्टी चतुर्थी ही सर्वात शुभ मानली जाते.अंगारकी संकष्टी चतुर्थी हा सण कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरा केला जातो.
  • अंगारकी संकष्टी चतुर्थी ही सर्वात शुभ मानली जाते.अंगारकी संकष्टी चतुर्थी हा सण कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरा केला जातो. अंगारकी हा संस्कृत मूळचा शब्द आहे ज्याचा अर्थ ‘जाळलेल्या कोळशासारखा लाल’ असा होतो.
  • संकष्ट चतुर्थी जी मंगळवारी येतो तेव्हा त्याला 'अंगारकी संकष्ट चतुर्थी' असे म्हणतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी गणू बाप्पाला समर्पित आहे.

मुंबई : अंगारकी संकष्टी चतुर्थी ही सर्वात शुभ मानली जाते.अंगारकी संकष्टी चतुर्थी हा सण कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरा केला जातो. अंगारकी हा संस्कृत मूळचा शब्द आहे ज्याचा अर्थ ‘जाळलेल्या कोळशासारखा लाल’ असा होतो. संकष्ट चतुर्थी जी मंगळवारी येतो तेव्हा त्याला 'अंगारकी संकष्ट चतुर्थी' असे म्हणतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी गणू बाप्पाला समर्पित आहे. 19 एप्रिल रोजी भाविक अंगारकी संकष्टी चतुर्थी 2022 साजरी करणार आहेत. अंगारकी चतुर्थीची तिथी, वेळ आणि महत्त्व जाणून घ्या (Angarki Sankashti Chaturthi 2022 Date and Time chandraodaya timing )

अंगारकी संकष्टी चतुर्थी 2022 तिथी आणि महत्त्व

गणू बाप्पाचे भक्त सकाळी लवकर उठतात आणि गणू बाप्पाला त्यांचे आवडते गोड, मोदक अर्पण करून आणि त्यांची मूर्ती फुलांनी सजवून त्यांची पूजा करतात. अंगारकी संकष्टी चतुर्थीला सूर्योदयापासून कडक उपवास करतात आणि चंद्र दिसल्यावर उपवास सोडतात. या संकष्टीला चंद्रोदय हा ९ वाजून ४५ मिनिटांनी होणार आहे.  काही लोक फक्त फळे, भाज्या आणि वनस्पतींची मुळे म्हणजे कंदमुळे खातात. तसेच अंगारकी चतुर्थीच्या दिवशी  चंद्राला चंदनाची उटी, फुले आणि तांदूळ अर्पण करून त्यांची पूजा केली जाते.

अंगारकी संकष्टी चतुर्थी तिथी 

अंगारकी संकष्टी चतुर्थी 19 एप्रिल रोजी दुपारी 04:39 वाजता सुरू होईल आणि 20 एप्रिल रोजी दुपारी 01:53 वाजता समाप्त होईल.

चंद्रोदय 

अंगारकी संकष्टी चतुर्थीला 19 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे लोक या वेळी उपवास सोडतात. 

अंगारकी संकष्टी चतुर्थी  महत्त्व

अंगारकी चतुर्थीचा उपवास केल्याने आयुष्यातील अनेक समस्या कमी होतात असे मानले जाते,  वैदिक शास्त्रांमध्ये गणपतीला हे प्रथम देवता म्हणजे गणाधिश मानले जातात. लोकांची मान्यता आहे की, गणू बाप्पाचा आशीर्वाद मिळाल्याने मार्गात येणारे सर्व विघ्न दूर होतात.  गणपतीचे आशीर्वाद मिळावा त्यासाठी अथर्वशीर्ष पठण केले जाते. गणपतीच्या पूजेसाठी या दिवशी भजने आणि धार्मिक भजनही गायले जातात. शिवाय उपवास केल्याने मांगलिक दोष दूर होतो आणि इच्छा पूर्ण होतात, असा विश्वास आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी