Angarki Sankashti Chaturthi Wishes in Marathi: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारे देऊन करा गणू बाप्पाची आराधना 

गणू बाप्पाच्या भक्तांसाठी अंगारकी संकष्टी चतुर्थी खूप महत्त्वाची असते. मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणतात. प्रत्यक्ष भेटून तसेच Messages, Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून एकमेकांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देऊ शकता.

angarki sankashti chaturthi 2022 wishes in marathi- send through messages whatsapp status to celebrate with your family and friends
अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status  |  फोटो सौजन्य: Times Now

Angarki Sankashti Chaturthi 2022 Wishes: गणू बाप्पाच्या भक्तांसाठी अंगारकी संकष्टी चतुर्थी खूप महत्त्वाची असते. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची (Lord Ganesha) आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते. त्यामुळे भाविकही अगदी भक्तीभावाने गणेशाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात. यंदा कोरोनाच्या केसेस कमी झाल्याने लोक मंदिरात जाऊन पूजा अर्चा करतील पण तरीही. त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना सोशल मीडियाद्वारे फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप स्टेटसच्या (WhatsApp Status) माध्यमातून एकमेकांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देऊ शकता.

 मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणतात. प्रत्यक्ष भेटून तसेच Messages, Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून एकमेकांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देऊ शकता.

Agarak chaturthi 2022

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता

विघ्न विनाशक मोरया

संकटी रक्षी शरण तुला मी

गणपती बाप्पा मोरया

अंगारकी संकष्टी चतुर्थी च्या शुभेच्छा

Agarak chaturthi 2022 mesages 1

अंगारकी निमित्त पूर्ण होवो तुमच्या मनोकामना

सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हास लाभो

हिच बाप्पा चरणी प्रार्थनाAgarak chaturthi 2022 mesages 2
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा

गजानना श्री गणराया

आधी वंदू तुज मोरया

मंगलमूर्ती श्री गणराया

आधी वंदू तुज मोरया

अंगारकी संकष्टी चतुर्थी च्या शुभेच्छा

Agarak chaturthi 2022 mesages 3

प्रथम तुला वंदितो गणराया

तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया

तेजस्वी, प्रसन्न अशी तुझी काया

सदैव राहो आम्हावर तुझी प्रेमळ माया

अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा

Agarak chaturthi 2022 mesages 4
एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,

तन्नो दंती प्रचोदयात्

महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,

तन्नो दंती प्रचोदयात्

अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा

हिंदू पुराणात गणेशाच्या संबंधित अध्यायानुसार, गणपतीचा अंगारकी नामक एक भक्त होता. ऋषी भारद्वाराज आणि माता पृथ्वीचा पुत्र अंगारकीने एके दिवशी गणेशाची आराधना सुरु केली. या तापसिने प्रसन्न होऊन श्रीगणेश त्यांच्यासमोर प्रकट झाले व सोबतच एक वर मागण्यास सांगितले. यावेळी अंगारकीने त्यांच्याकडे अशी मागणी केली की, मला तुमच्या नावाशी जोडले जायचे आहे. या मागणीनंतर श्रीगणेशाने अंगारकीला वरदान दिले, ज्यानुसार पुढील काळात जेव्हा जेव्हा चतुर्थी आणि मंगळवार हा योग्य जुळून येईल तेव्हा त्यास अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधले जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी