Angarki Sankashti Chaturthi 2021 : अंगारकी संकष्टी चतुर्थी महत्त्व आणि पूजा विधी, चंद्रोदय वेळ

Angarki Sankashti Chaturthi pooja vidhi and chandrodaya timing : प्रत्येक महिन्यात दोनवेळा चतुर्थी योग असतात. दोन्ही चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहेत. शुक्ल पक्षावर पडणार्‍या चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला ‘संकष्टी चतुर्थी’ म्हणतात.

angarki sankashti chaturthi 2021 november pooja vidhi and chandrodaya timing
अंगारकी संकष्टी चतुर्थी महत्त्व आणि पूजा विधी, चंद्रोदय वेळ  
थोडं पण कामाचं
 • प्रत्येक महिन्यात दोनवेळा चतुर्थी योग असतात. दोन्ही चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहेत.
 • शुक्ल पक्षावर पडणार्‍या चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला ‘संकष्टी चतुर्थी’ म्हणतात.
 • जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला ‘अंगारकी चतुर्थी’ म्हणून ओळखले जाते. म्हणून, या दिवसाला ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’ असे म्हणतात.

मुंबई : प्रत्येक महिन्यात दोनवेळा चतुर्थी योग असतात. दोन्ही चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहेत. शुक्ल पक्षावर पडणार्‍या चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला ‘संकष्टी चतुर्थी’ म्हणतात. जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला ‘अंगारकी चतुर्थी’ म्हणून ओळखले जाते. म्हणून, या दिवसाला ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’ असे म्हणतात. (angarki sankashti chaturthi 2021 november pooja vidhi and chandrodaya timing)


अंगारकी चतुर्थीचे महत्त्व

गणपती बाप्पाचा एक भक्त होता अंगारकी. अंगारकी हा ऋषि भारद्वाज आणि पृथ्वीचा मुलगा होता. त्याने गणपतीची आराधना सुरु केली. अखंड तपश्चर्येनंतर गणपती बाप्पा त्याला प्रसन्न झाले आणि वर मागण्यास सांगितला. यावेळी अंगारकीने आपले नाव देवाच्या नावाशी जोडले जावे असे सांगितले. यावर गणपतीने त्याला वरदान दिले की जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी येईल तेव्हा त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे संबोधले जाईल. 

चंद्रोदय (Angarki Sankashti Chaturthi chandrodaya timing)

आज म्हणजे  २३ नोव्हेंबर रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे.  या दिवशी चंद्रोदय रात्री ९.०६ मिनिटांनी आहे. चंद्रांचे दर्शन घेतल्यानंतर उपवास सोडला जातो.

या मंत्राचा करा जप

गजाननं भूतगणादि सेवितं
कपित्थ जम्बूफलसार भक्षितम्
उमासुतं शोक विनाशकारणं
नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् ॥  

या मंत्राचा जप केल्यास गणपती बाप्पाची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते.

अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत पूजा विधी (Angarki Sankashti Chaturthi pooja vidhi)

 1. सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्नान करावे.
 2. यानंतर श्रीगणेशाचे ध्यान करा आणि त्यांच्यासमोर व्रत करण्याचा संकल्प करा.
 3. दिवसभर उपवास करावा.
 4. स्नानानंतर गणेशाची पूजा करावी.
 5. गणेशाच्या मूर्तीला पाणी, रोली, अक्षत, दुर्वा, लाडू, पान, अगरबत्ती अर्पण करावं.
 6. गणरायाच्या मंत्रांचा जप करावा.
 7. संध्याकाळी चंद्र उदयानंतर पूजा करावी.
 8. संध्याकाळच्या पूजेनंतर अन्न ग्रहण करावं.
 9. ढगांमुळे चंद्र दिसत नसेल तर पंचगानुसार चंद्रोदयावेळी पूजा करावी.
 10. संध्याकाळच्या पूजेसाठी गणेशाची मूर्ती स्थापित करावी.
 11. गणपतीची धूप, दिवा, उदबत्ती, फुलांनी पूजा करावी.
 12. प्रसादात केळी, नारळ ठेवावं.
 13. तसेच गणेशाला आवडत्या मोदकाचा नैवेदय दाखवावा.
 14. या दिवशी गूळ व तिळाचे मोदक बनवले जातात.
 15. गणेश मंत्र जप करताना काही मिनिटे ध्यान करावं आणि कथा ऐकावी.
 16. गणपतीची आरती करावी व प्रार्थना करावी.
 17. यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन त्याची पूजा करावी.
 18. चंद्राला फुले व चंदन अर्पित करावं.
 19. चंद्राच्या दिशेने अक्षता अर्पित कराव्या.
 20. पूजा संपल्यानंतर प्रत्येकाला प्रसाद वाटप करुन अन्न ग्रहण करावं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी