Angarki Sankashti Chaturthi 2023 Chandrodaya Time: वर्षातील पहिली अंगारकी, जाणून घ्या तुमच्या शहरात चंद्रोदयाची वेळ किती?

Moon rise time Angarki Sankasthi Chaturthi : अंगारकी संकष्ट चतुर्थीला एक वेगळे महत्त्व असते. भाविक मनोभावे पूजा करुन उपवास सुद्धा करतात. जाणून घ्या अंगारकीच्या दिवशी कोणत्या शहरात चंद्रोदयाची वेळ नेमकी काय आहे.

Angarki Sankasth chaturthi 2023 chandroday time in mumbai thane pune nagpur aurangabad nashik read in marathi
Angarki Sankashti Chaturthi 2023 Chandrodaya Time: वर्षातील पहिली अंगारकी, जाणून घ्या तुमच्या शहरात चंद्रोदयाची वेळ किती? 
थोडं पण कामाचं
  • 10 जानेवारी रोजी यंदाच्या वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी
  • जाणून घ्या तुमच्या शहरात अंगारकीच्या दिवशी चंद्रोदयाची नेमकी वेळ काय आहे

Moon rise time today: 2023 या वर्षातील पहिली अंगारकी मंगळवारी (10 जानेवारी 2023) आहे. अंगारकीच्या दिवशी भाविक श्री गणेशाची मनोभावे पूजा करुन उपवास सुद्धा करतात. श्री गणेशाला नैवेद्य दाखवतात आणि चंद्रोदयानंतर भोजन करुन उपवास सोडतात. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारक चतुर्थी असे म्हणतात. या दिवशी मंगळ ग्रहाची पूजा आणि उपाय करणे सुद्धा अति शुभ मानले जाते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीतील मंगळ अशुभ आहे त्यांनी या दिवशी विशेष पूजा करावी. (Moon Rise Time Angarki Sankasth chaturthi 2023 chandroday time in mumbai thane pune nagpur aurangabad nashik read in marathi)

पंचांगानुसार, अंगारक संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री 09 वाजून 11 मिनिटांनी आहे. मात्र, प्रत्येक शहरात चंद्रोदयाच्या वेळेत थोडा-थोडा फरक असतो. रात्री चंद्रोदय झाल्यावर पूजा करा आणि अर्ध्य द्यावे. यानंतर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घ्या. जाणून घ्या महाराष्ट्रातील कोणत्या शहरात चंद्रोदयाची वेळ नेमकी किती आहे.

हे पण वाचा : तुमच्या राशीच्या व्यक्तीची बुद्धी किती तल्लख? वाचा

Moon Rise Time in Pune, Mumbai and other cities of Maharashtra

शहराचे नाव (Maharashtra Important Cities) चंद्रोदयाची वेळ (Moon Rise Time in Maharashtra's various Cities)
मुंबई 09.11
ठाणे 09.09
पुणे 09.07
रत्नागिरी 09.11
कोल्हापूर 09.08
सातारा 09.07
नाशिक  09.05
अहमदनगर 09.02
धुळे 09.00
जळगाव 08.56
वर्धा 08.44
यवतमाळ 08.47
बीड 08.58
सांगली 09.06
सावंतवाडी 09.10
सोलापूर 08.59
नागपूर 08.41
अमरावती 08.47
अकोला 08.51
औरंगाबाद 08.59
भुसावळ 08.56
परभणी 08.54
बुलढाणा 08.55
मालवण 09.12
बेळगाव 09.08

अंगारक संकष्ट चतुर्थीला या मंत्रांचा करा जप (Chant these Mantra on Angarki Sankasth Chaturthi) 

ओम सुमुखाय नम:

हे सुंदर चेहऱ्याच्या गणपती बाप्ता, आमच्या चेहऱ्यावर अशीच खरी भक्ती आणि सौंदर्य कायम रहो.

हे पण वाचा : अलिबागच्या आसपास फिरण्यासारखी प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाणे

ओम दुर्मुखाय नम:

हे परमेश्वरा, आसुरी प्रवृत्ती असलेल्या दानावांपासून आमचे रक्षण कर.

हे पण वाचा : शिळ्या चपाती, भाकरीपासून बनवा हे स्वादिष्ट पदार्थ

ओम मोदाय नम:

गणपती बाप्पा तू नेहमीच सुखी राहतो. त्याचे स्मरण करणारेही सुखी होवोत.

ओम प्रमोदय नम: 

हे गणपती बाप्पा आम्हाला आशीर्वाद दे आणि सुखी ठेव.

ओम अविघ्नाय नम:

हे गणपती बाप्पा आमच्या शुभ कार्यात येणारे सर्व अडथळे दूर कर.

ओम विघ्नकारत्र्येय नम:

हे गणपती बाप्पा सर्व विघ्न, संकटे दूर कर.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी