वय वाढतंय आणि अजून लग्न होत नाही मग नारळ हे फळ तुमचा प्रश्न सोडवेल

As you grow older and do not get married yet, coconut will solve your problem : वय वाढतंय, लग्नाची इच्छा आहे पण अद्याप लग्न होत नाही. मग नारळ हे फळ तुमचा प्रश्न सोडवेल.

As you grow older and do not get married yet, coconut will solve your problem
वय वाढतंय आणि अजून लग्न होत नाही मग नारळ हे फळ तुमचा प्रश्न सोडवेल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • वय वाढतंय आणि अजून लग्न होत नाही मग नारळ हे फळ तुमचा प्रश्न सोडवेल
  • नारळ केसांचे आरोग्य जपणे, त्वचेचे आरोग्य जपणे, पोटाचे विकार यांच्यासाठी लाभदायी
  • नारळ ग्रहशांतीसाठी, कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी लाभदायी

As you grow older and do not get married yet, coconut will solve your problem : वय वाढतंय, लग्नाची इच्छा आहे पण अद्याप लग्न होत नाही. मग नारळ हे फळ तुमचा प्रश्न सोडवेल. नारळ हे फळ आतापर्यंत केसांचे आरोग्य जपणे, त्वचेचे आरोग्य जपणे, पोटाचे विकार यांच्यासाठी लाभदायी असल्याचे आपण ऐकले असेल. पण हाच नारळ लग्नातील अडथळे, अडचणी दूर करण्यास मदत करेल. ग्रहदशा, ग्रहदोष, कुंडलीतील दोष दूर करण्यासाठीही नारळ लाभदायी आहे.

  1. शनि पीडेचा त्रास होत असेल तर शनि महाराजांच्या मंदिरात अथवा हनुमान मंदिरात जाऊन एक नारळ अर्पण करा. 
  2. केतूची महादशा सुरू असल्यास गणपती मंदिरात जाऊन शहाळे अर्थात हिरवा नारळ देवाला अर्पण करा. 
  3. राहू, केतू, शनि यापैकी किमान एक किंवा जास्त ग्रहांचा त्रास होत असल्यास एक नारळ काळ्या कापडात गुंडाळा. त्याच काळ्या कापडात जव, काळे तीळ आणि उडदाची डाळ तसेच एक लोखंडी खिळा एकत्र करुन त्याची पिशवी पण बांधा. हे सर्व वाहत्या पाण्यात सोडून द्या. 
  4. आर्थिक अडचणी असल्यास पाच नारळांच्या शेंड्या एका लाल धाग्याने बांधा. हे तोरण शिव मंदिरात दरवाजावर लावा. 
  5. लग्न होत नसल्यास दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन दोन नारळ अर्पण करा आणि कापूर आरती मनोभावे करा. मंदिरात जाताना दोन पैकी एक नारळ हा लाल चुनरीत (लाल ओढणी) बांधून तो दुर्गा मातेला अर्पण करा. मंदिरात आणखी एक नारळ सोबत न्या. हा नारळ फोडा आणि त्यातील खोबरे प्रसाद म्हणून खा. देवीची कापराने मनोभावे आरती करा. 

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी