Deep Puja 2020: दीप पूजेच्या शुभेच्छा, WhatsApp Status, Messages एका क्लिकवर 

आध्यात्म
रोहित गोळे
Updated Jul 20, 2020 | 10:10 IST

Deep Puja 2020: आषाढ अमावस्येलाचा दीप अमावस्या असे देखील म्हटले जाते. कारण की, आजच्या दिवशी दिव्याची पूजा केली जाते. यावेळी दिव्याची पूजा करुन तेजाची आराधना केली जाते. 

Deep puja
दीप पूजेच्या शुभेच्छा, WhatsApp Status, Messages एका क्लिकवर  |  फोटो सौजन्य: Getty

मुंबई: आज (२० जुलै २०२०) आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून श्रावण महिना सुरु होणार आहे. त्यामुळे आजच्या दिवशी 'दीप अमावस्या' (Deep Amavasya) साजरी केली जाते. आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला 'आषाढ अमावस्या'  (Ashadhi Amavasya) असे म्हणतात. याच दिवशी दीप पूजन (Deep Puja 2020) देखील केले जाते. त्यामुळे या अमावस्येला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा असा संदेश देणाऱ्या दिव्याचे पूजन केले जाते. त्यामुळे या दिवशी घरात दिवे लावून ही आषाढ अमावस्या साजरी केली जाते. तसेच आपल्या घरातील लहान मुलगा अथवा मुलगी यांनाही ओवाळले जाते. 

काल (१९ जुलै २०२०) मध्यरात्रीपासून म्हणजेच १२ वाजून १० मिनिटांनी आषाढ अमावस्येला सुरुवात झाली. ही अमावस्या आज (२० जुलै २०२०) रात्री ११ वाजेच्या सुमारास संपणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळच्या सुमारास दीप पूजन करता येणार आहे. तिमिरातून तेजाकडे असा संदेश देणारा अशी दिव्याची ओळख आहे. आजच्या प्राप्त परिस्थितीत सगळ्यांनाच अशा प्रतिकात्मक दीप पूजनाची गरज आहे. त्यामुळे आजच्या दीप पूजनातून सर्वांना अंधकारमय परिस्थितीशी लढण्याचा बळ मिळो. दरम्यान, आजची अमावस्या ही सोमवारी आल्याने हिला सोमवती अमावस्या (Somvati Amavasya) देखील म्हणतात. 

सध्याच्या डिजिटल युगात आपल्याकडे प्रत्येक सणांच्या शुभेच्छा देण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. त्यामुळे आता आपल्याला दीप पूजनाच्या देखील शुभेच्छा आपल्या नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून मिळणार आहेत. अशावेळी आपण देखील आपल्या आप्तजनांना Whatsapp, facebook यांच्या माध्यमातून दीप पूजनाच्या शुभेच्छा देऊ शकणार आहात. यासाठी आपण SMS, Images पाठवू शकणार आहात. 

पाहा दीप पूजनाच्या शुभेच्छा, Whatsapp Messages

(फोटो सौजन्य: pixabay)

दिव्या दिव्या दिपत्कार 
कानी कुंडल मोतीहार 

(फोटो सौजन्य: twitter)

दीप अमावस्येच्या शुभेच्छा 

(फोटो सौजन्य: twitter)

दीप सूर्याग्निरूपस्त्वं
तेजस: तेज उत्तमम 
दीप पूजनाच्या शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: twitter)

दीप ज्योती: परब्रम्हा  
दीपज्योतीजनार्दन:|

(फोटो सौजन्य: twitter)

तिमिरातुनी तेजाकडे 
ने दीपदेवा जीवना||

दरम्यान, आषाढ अमावस्या संपताच २१ जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. हा महिना सात्विक समजला जातो. त्यामुळे अनेकजण या संपूर्ण महिन्यात मांसाहार वर्ज्य करुन सात्विक आहार घेणं पसंत करतात. तसेच या महिन्यात अनेक पूजा-विधी देखील पार पाडले जातात. म्हणूनच हिंदू धर्मात या महिन्याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी