Vitthal Rukmini Darshan 2021 Live : पाहा विठ्ठल रुख्मिणी लाइव्ह दर्शन 

vitthal rukmini darshan live । यंदाही दर्शन ऑनलाइनच्या माध्यमातून डोळेभरून आपल्या विठूरायची ते सावळे रूप पाहता येणार आहे. यासाठी विठ्ठल-रुख्मिणी संस्थानाने ऑनलाइन दर्शनाची सुविधा केली आहे.

Ashadhi Ekadashi 2021 vitthal rukmini darshan live from pandharpur
पाहा विठ्ठल रुख्मिणी Live दर्शन   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • कोरोना संकटामुळे यंदाही वारकऱ्यांना पंढरपूरची वारी करणे शक्य झाले नाही
 • भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी www.vitthalrukminimandir.org  या संकेतस्थळाच्या  माध्यमातून श्री.विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, महापूजा, शेजआरती, धूप आरती आदी  नित्योपोचार पाहता येणार आहे.
 • गेल्या वर्षापासून आषाढी एकादशीलाही पंढरपुरात जसा दरवर्षी भक्तीचा मळा फुलतो तसा यंदाही फुलणार नाही.

पंढरपूर :  कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी वारकऱ्यांना पंढरपूरची वारी करणे शक्य झाले नाही. अनेक वारकरी मनातल्या मनात म्हणत असतील की वारी चुकू नेदी हरी.... तरीही प्रत्यक्ष यंदा पांडुरंगाच्या भेटीला जाणे शक्य नाही. यंदा महाराष्ट्रातील विविध भागातून संताच्या सोबतीला पालखीसोहळ्याच्या माध्यमातून पंढरपूरला भाविकांना जाणे शक्य झाले नाही. यंदाही  पायी पालखी सोहळे रद्द झाले आहे. 

संताच्या पालख्यांचे प्रातिनिधीक प्रस्थान करून रस्ते मार्गे शिवनेरीतून पालख्या वाखरीत आणण्यात आल्या.  येत्या आषाढी एकादशीलाही पंढरपुरात जसा दरवर्षी भक्तीचा मळा फुलतो तसा फुलणार नाही. त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल रुख्मिणी संस्थानाने विठ्ठल माऊलीच्या दर्शनाची ऑनलाइन सुविधा वारकऱयांसाठी केली आहे. आता या सुविधेच्या माध्यमातून भाविक आपल्या मोबाईलच्या माध्यमातून लाडक्या विठूरायचे दर्शन घेऊ शकणार आहेत. 

यंदाचे दर्शन याची देही याची डोळा नसले तरी ऑनलाइनच्या माध्यमातून डोळेभरून आपल्या विठूरायची ते सावळे रूप पाहता येणार आहे. यासाठी विठ्ठल-रुख्मिणी संस्थानाने विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातून ऑनलाइन दर्शनाची सुविधा केली आहे. 

श्री विठ्ठल-रुख्मिणीचे मंदिर  भाविकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी बंद आहे. या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सर्व  नित्योपोचार नित्य नियमाने सुरु आहेत. भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी www.vitthalrukminimandir.org  या संकेतस्थळाच्या  माध्यमातून श्री.विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, महापूजा, शेजआरती, धूप आरती आदी  नित्योपोचार पाहता येणार आहे.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी इथे क्लिक करा 

रुक्मिणीच्या दर्शनासाठी इथे क्लिक करा 

यावेळी विठ्ठलाची आरतीही ऑनलाइन पाहण्याची सुविधा मिळणार आहे.  यासाठी आपल्याला श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम जाणून घेतला पाहिजे. 

*श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम*

 1. पहाटे ४.०० वाजता श्रींचा नामदेव पायरी दरवाजा उघडणे
 2. पहाटे ४.०० ते ५.०० वाजता श्रीविठ्ठल रूक्मिणीचा काकडा व नित्य पूजा
 3. सकाळी ५.०० भाविकांना दर्शन सुरू
 4. सकाळी १०.४५ ते ११.०० वाजता महानैवेद्य
 5. दुपारी ४.४० ते ५.०० वाजता पोषाख
 6. सायं ६.४५ ते ७.०० धुपारती दिनमानाप्रमाणे

श्रींचे नित्योपचार - पहाटे ब्रह्ममुहूर्तावर श्रीपांडुरंगाचे नित्योपचार सुरू होतात.

 1. श्रीविठ्ठल रूक्मिणीचा काकडा, नित्यपूजा पहाटे ४.०० वाजता ते ५.००
 2. महानैवेद्य-सकाळी १०.४५ ते ११.००
 3. पोषाख- दुपारी ४.४० ते ५.००
 4. धुपारती- सायं ६.४५ ते ७.०० दिनमानाप्रमाणे
 5. शेजारती-रात्रौ १२.०० ते १.०० वाजता
 6. निद्रा -रात्रौ १.०० ते ४.०० वाजता

काही सण,उत्सव, यात्रा, एकादशी यावेळी नित्योपचारांमध्ये बदल असतो.

* दर्शन वेळ *

 1. सकाळी ६.०० ते ११.०० (सकाळी १०.४५ ते ११.०० महानैवेद्याकरिता दर्शन बंद)
 2. सकाळी ११.१५ ते दु. ४.३० ( दुपारी ४.४० ते ५.०० श्रींचे पोषाखाकरिता दर्शन बंद)
 3. सायंकाळी ५.०० ते ११.१५ ( रात्रौ १.०० ते ४.०० वाजता मंदिराचा नामदेव पायरी दरवाजा बंद)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी