Astro Tips: सरकारी नोकरी मिळविण्यासाठी अचूक व सोपे उपाय, बंद पडलेला व्यापारही दणक्यात होईल सुरू

आध्यात्म
Updated Jul 09, 2019 | 21:16 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

नोकरी किंवा व्यवसाय काहीच नसेल तर त्यानं माणसाच्या आयुष्यात भांडण, संकट निर्माण होतात. पैशामुळे अनेक संबंध जोडले जातात तर त्यामुळेच अनेक संबंध बिघडतात. जाणून घ्या नोकरी मिळविण्यासाठी काही विशेष उपाय...

Sarkari naukri pane ke upay totke
सरकारी नोकरी मिळविण्यासाठी उपाय 

थोडं पण कामाचं

  • नोकरी वाचविण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार खास उपाय
  • व्यवसायातही मिळेल या उपायांनी यश
  • शुद्ध मनानं केलेले उपाय ठरतील यशस्वी

Astro Tips: अनेक वेळा चांगली पदवी असून सुद्धा चांगली नोकरी मिळत नाही. तर कधी-कधी कितीही शिक्षण असलं तरी नोकरीच मिळत नाही. काही लोकांचं नशीब त्यांना साथ देत नाही अशा लोकांना नोकरी मिळाली तरी त्यांची नोकरी कोणत्या ना कोणत्या कारणानं सुटून जाते. तर काही जण पैसा लावून सुद्धा आपला व्यवसाय गमावून बसतात. याचा परिणाम म्हणजे बेरोजगारी कायम राहते. बेरोजगारी म्हणजे एखाद्या शिक्षेसारखीच असते. ही परिस्थिती अशी असते जेव्हा एक व्यक्ती तन, मन, धनानं निराश झालेला असतो.

अनेकदा नात्यांमध्ये बेरोजगारीमुळे दुरावा उत्पन्न होतो. कारण यामागे सर्वात मोठं कारण पैसा हा असतो. पैसा न कमवणाऱ्याला घरातील लोकं सुद्धा जास्त काळ सहन करू शकत नाही. म्हणून अशावेळी गरज असते ती आपलं कतृत्व आणि ज्ञान शाबूत ठेवण्याची. यासाठी ज्योतिषशास्त्रातील काही उपाय आपल्याला मदत करू शकतात. हे उपाय असे आहेत जे आपल्याला नोकरी मिळवून देण्यासाठी आणि व्यवसायात यश देण्यासाठी मदत करतील.

नोकरी वाचविण्यासाठी माशांना खावू घाला दाणे

जवळपास ३०० ग्राम काळी उडदाची डाळ घ्या आणि त्याचं पीठ दळून आणा. आता हे पीठ मळून घ्या. मग त्याला फसफसू द्या (फर्मेंटेशन होऊ द्या). आता या मळलेल्या पीठाची पोळी लाटा. पोळी कमी आचेवर गॅसवर भाजून घ्या, अशाप्रकारे भाजा जेणेकरून नंतर त्याचे गोळे बनवता येईल. जेव्हा पोळी हलकीशी शेकली जाईल तेव्हा त्या पोळीमधील एक तृतीयांश भाग तोडून तो काळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवा. उरलेल्या पोळीचे १०१ गोळे बनवा. आता आपण नदी किंवा तलावावर जावून तिथं असलेल्या माशांना ते गोळे खावू घाला. तिथं माशांना पूर्ण गोळे खावू घातल्यानंतर उरलेली पोळी प्रवाहात सोडून द्या. लक्षात ठेवा जिथं मासे असतील तिथेच पोळी टाका. असं आपल्याला ४० दिवस सतत करावं लागेल.

बंद कुलूप घरी घेऊन या

बाजारात जावून एक बंद कुलूप घेऊन या. मात्र हे कुलूप घरी आणल्यानंतर उघडून चेक करू नये. कुलूप बंदच पाहिजे. आता घरी आणून आपण अशा ठिकाणी हे कुलूप ठेवा जी आपली स्टोर रूम असेल.

शमिपत्र (शमीची पानं) सोबत ठेवावीत

जेव्हा पण आपण घराबाहेर नोकरी शोधण्यासाठी किंवा इंटरव्यूसाठी जात असाल तर आपल्यासोबत शमिपत्र घेऊन जावे. हे आपल्या ग्रहांना अनुकूल ठेवत वाईट ग्रहांचा प्रभाव संपवण्याचं काम करतं. लक्षात ठेवा आपल्या पॉकिटमध्ये किंवा रूमालात शरीराला स्पर्श होईल, असे शमिपत्र ठेवावेत.

लाल रूमाल अवश्य सोबत ठेवावा

नोकरीच्या मुलाखतीसाठी आपण जात असाल तर आपण लाल रंगाचे कपडे घालावे किंवा लाल रूमाल तरी सोबत ठेवावा. हा ऊर्जेचा संकेत आहे आणि जेव्हा लाल रंग सोबत असतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला सुद्धा आपल्यामधील ऊर्जा जाणवते.

या मंत्राचा जप करत घराबाहेर पडा

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

लक्षात ठेवा आपल्या मनात शुद्ध भाव असेल तर या उपायांचा आपल्याला नक्की फायदा होईल. फक्त एक वेळा एकच उपाय करा. एकावेळी अनेक उपाय करू नये.

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Astro Tips: सरकारी नोकरी मिळविण्यासाठी अचूक व सोपे उपाय, बंद पडलेला व्यापारही दणक्यात होईल सुरू Description: नोकरी किंवा व्यवसाय काहीच नसेल तर त्यानं माणसाच्या आयुष्यात भांडण, संकट निर्माण होतात. पैशामुळे अनेक संबंध जोडले जातात तर त्यामुळेच अनेक संबंध बिघडतात. जाणून घ्या नोकरी मिळविण्यासाठी काही विशेष उपाय...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola