Astrology News In Marathi | मुंबई : हिंदू शास्त्रामध्ये दान करणे हे पूजेसारखे असल्याचे सांगितले आहे. माणसाला दान केलेल्याचे फळ अनेक जन्म मिळते असे म्हणतात. पण हिंदू धर्मग्रंथांमध्ये दान करण्याच्या वेळेलाही खूप महत्त्व आहे. योग्य वेळी आणि योग्य मार्गाने केलेले दान अत्यंत फलदायी असले तरी सूर्यास्तानंतर केलेले दान लाभाऐवजी नुकसानच करू शकते. चला तर मग जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणत्या वस्तूंचे दान करू नये. (Astrology Donating these items after sunset is inauspicious).
बहुतांश वेळा देव-दर्शनासाठी अथवा कोणत्याही तीर्थक्षेत्राला भेट द्यायला गेलेले भाविक वेळेचे भान न बाळगता गोष्टी दान करत असतात. मंदिराच्या बाहेर बसलेल्यांना अथवा गरजूंना ते चांगल्या हेतूने दान करत असतात मात्र सूर्यास्ताच्या नंतर दही, पैसे किंवा दूध अशा गोष्टी दान केल्याने त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात.
अधिक वाचा : गायब असणारे किरीट सोमय्या व्हिडिओतून आले समोर
ज्योतिषशास्त्रात सूर्यास्तानंतर दही दान करणे अजिबात शुभ मानले जात नाही. कारण दही दान केल्याने शुक्र ग्रह बलवान होतो, त्यामुळे सुख-समृद्धीत कमी येते. त्यामुळे सूर्यास्तानंतर दही दान केल्यास सुख-समृद्धी कमी होऊ शकते.
आर्थिक स्थिती मजबूत ठेवायची असेल तर सूर्यास्तानंतर पैसा किंवा कांदा-लसूण कोणालाही दान करू नये. कारण यामुळे धनाची देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. आणि तुम्हाला पैशाची कमतरता भासू शकते. त्यामुळे देवी लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी सूर्यास्तानंतर कधीही पैसा किंवा कांदा-लसूण दान करू नये.
ज्योतिषशास्त्रात दूध दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पण सूर्यास्तानंतर दूध दान केल्याने तुमच्याबाबतीत अशुभ गोष्टी घडू शकतात. कारण दुधाचा संबंध सूर्य आणि चंद्र या दोघांशीही आहे. यासोबतच दान केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा आशिर्वाद मिळू शकतो. पण जर एखाद्या व्यक्तीने सूर्यास्तानंतर एखाद्या गरजू व्यक्तीला दूध दान केले तर ते त्याच्यासाठी शुभ नाही. त्याचा जीवनावर विपरीत परिणामही होऊ शकतो.