Astrology: वैशाख महिन्यात या वस्तूंचे दान केल्याने संपत्तीत होते झपाट्याने वाढ, जाणून घ्या या वस्तू

Vaishakh Month । शास्त्रानुसार वैशाख महिना भगवान विष्णूला समर्पित मानला जातो. विधिनुसार भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच वैशाख महिन्यात काही वस्तूंचे दान केल्याने धन-संपत्ती वाढ होते असा समज आहे. 

Astrology Donating these items in the month of Vaishakh leads to rapid increase in wealth
वैशाख महिन्यात या वस्तूंचे दान केल्याने संपत्तीत होते वाढ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हिंदू धर्मामध्ये वैशाख महिना खूप महत्त्वाचा मानला जातो.
  • वैशाख महिन्यात भगवान विष्णूची आराधना केल्याने भक्तांना सर्व अडचणींपासून मुक्ती मिळते.
  • हा महिना मराठी नवीन वर्षातील दुसरा महिना असतो.

Vaishakh Month । मुंबई : हिंदू धर्मामध्ये वैशाख महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. वैशाख महिन्यात भगवान विष्णूची आराधना केल्याने भक्तांना सर्व अडचणींपासून मुक्ती मिळते. असे मानले जाते. वैशाख महिना हा भगवान विष्णूला समर्पित असल्यामुळे माधव मास म्हणूनही ओळखला जातो. धर्मग्रंथानुसार या महिन्यात दानधर्माचे मोठे महत्त्व आहे. हा महिना मराठी नवीन वर्षातील दुसरा महिना असतो. या महिन्याच्या सुरूवातीपासूनच वातावरणात उष्णता वाढलेली पाहायला मिळते. चला तर मग जाणून घेऊया की शुभ लाभ मिळण्यासाठी वैशाख महिन्यात कोणत्या गोष्टींचे दान केल्याने आणि कोणती कामे केल्यास मनोकामना पूर्ण होतात. (Astrology Donating these items in the month of Vaishakh leads to rapid increase in wealth). 

अधिक वाचा : चहलची हॅट्रिक अय्यरवर पडली भारी

१) शास्त्रानुसार म्हटले जाते की, वैशाखच्या महिन्यात कोणत्याही गरजूला व्यक्तीला खरबूज किंवा इतर कोणतेही फळ, पंखा, अन्न, पाणी देणे शुभ आहे. तसेच तुम्ही कोणत्याही मंदिरात, सार्वजनिक ठिकाणी किंवा बागेत मातीचे भांडे दान करू शकता. अशा प्रकारचे दान तुमच्या जीवनात आनंदासह इतर शुभ लाभ घेऊन येतात. 

२) घरामध्ये किंवा मंदिरात तुळशीचे रोप लावणे आणि संपूर्ण वैशाख महिन्यात तुळशीच्या पानांनी भगवान विष्णूची पूजा करणे खूप फलदायी मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने व्यक्तीची कार्यक्षेत्रात प्रगती होते, तसेच कुटुंबात सुख-समृद्धी वाढते. तसेच शास्त्रानुसार वैशाख महिना भगवान विष्णूला समर्पित मानला जातो. विधिनुसार भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच वैशाख महिन्यात काही वस्तूंचे दान केल्याने धन-संपत्ती वाढ होते असा समज आहे. 


३) शास्त्रानुसार, वैशाख महिन्यात जप, तपश्चर्या, हवन इत्यादी केल्याने माणसाच्या सर्व समस्या दूर होतात. वैशाख महिन्यात सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून भगवान विष्णूची खरी भक्तिभावाने पूजा केल्यास त्यांचा विशेष आशिर्वाद मिळतो असा समज आहे.  शास्त्रानुसार संपूर्ण वैशाख महिनाभर भगवान विष्णूची आराधना केल्याने अश्वमेध यज्ञासारखे पुण्य मिळते आणि व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी