Vivah Muhurat : आज 4 नोव्हेंबरनंतर सुरू होतील मंगल कार्य, जाणून घ्या कधी वाजवता येणार लग्नाचा बँण्ड, कधीपर्यंत आहेत विवाह मुहूर्त

आध्यात्म
भरत जाधव
Updated Nov 04, 2022 | 09:36 IST

Vivah Muhurat 2022: देव उथनी एकादशी शुक्रवार 4 नोव्हेंबर 2022 रोजी आहे. या दिवसापासून मांगलिक कामे सुरू होतील. नोव्हेंबर ते मार्च 2023 पर्यंत लग्नाची वेळ जाणून घेऊया

Vivah Muhurat: Auspicious work will start today after November 4
Vivah Muhurat : आज 4 नोव्हेंबरनंतर सुरू होतील मंगल कार्य  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहणे आवश्यक असते.
  • नोव्हेंबरपासून लग्नाचा हंगाम सुरू होत आहे. या वर्षी नोव्हेंबर ते पुढच्या वर्षी मार्चपर्यंत लग्नाचे बार उधळता येणार
  • लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे.

Vivah Muhurat 2022: जुलै महिन्यातील देवशयनी एकादशीपासून श्री हरी विष्णू चार महिने योगनिद्रात जातात. त्यानंतर देवुतानी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचा निद्राकाळ संपतो आणि या दिवसापासून विवाह आणि इतर शुभ कार्ये सुरू होतात. ज्योतिषाचार्य पंडित सुरेश श्रीमाळी यांनी सांगितले की यावेळी देव उठनी एकादशी आज शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 रोजी आहे. (Auspicious work will start today , know till when are the marriage muhurtas )

अधिक वाचा  : बिकिनी परिधान करुन 43 वर्षीय अभिनेत्रीने पाण्यात लावली आग

कधी वाजणार लग्नाचा बँण्ड 

ज्योतिष शास्त्रानुसार उठनी एकादशीपासून भगवान विष्णू आपल्या घोर निद्रेतून उठून परत पदभार ग्रहण करतात. या दिवशी द्वादशी तिथी संध्याकाळी होत आहे ज्यामध्ये तुळशी विवाह केला जातो. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहणे आवश्यक असते. विवाह, मुंडण, जनेऊ, ग्रहप्रवेश यांसारखी मगंल कामे ग्रह-नक्षत्रांच्या संयोगाने तयार होणाऱ्या शुभ योगातच होतात. कारण असे म्हटले जाते की शुभ मुहूर्तावर केलेली  शुभ कार्ये कोणत्याही बाधाशिवाय पूर्ण होतात. लग्नासाठीही शुभ मुहूर्त खूप महत्त्वाचे आहे. ज्योतिषाने सांगितले की, नोव्हेंबरपासून लग्नाचा हंगाम सुरू होत आहे. या वर्षी नोव्हेंबर ते पुढच्या वर्षी मार्चपर्यंत लग्नाचे बार उधळता येणार आहेत. 

देव उठनी एकादशीला लग्नाचा मुहूर्त

ज्योतिषाचार्य पंडित सुरेश श्रीमाळी यांनी सांगितले की, देव उठनी एकादशी 4 नोव्हेंबरला आहे, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार या काळात सूर्याची स्थिती लग्नासाठी योग्य नाही. जज्योतिषांच्या मते या काळात वृश्चिक राशीत सूर्य नसल्यामुळे देवतेच्या उठल्यानंतरही लग्नासाठी मुहूर्त नाही.

अधिक वाचा  : 'या' गोष्टीला चिडून हल्लेखोरानं इमरान खानवर झाडली गोळी

नोव्हेंबर 2022 ते मार्च 2023 दरम्यान शादी मुहूर्त  (Vivah Muhurat November 2022 to March 2023)

नोव्हेंबर 2022 विवाह मुहूर्त - 21, 24, 25, 27 नोव्हेंबर
डिसेंबर 2022 विवाह मुहूर्त - 2, 7, 8, 9, 14 डिसेंबर
जानेवारी 2023 लग्नाचा मुहूर्त - 15, 18, 25, 26, 27, 30, 31 जानेवारी 2023
फेब्रुवारी 2023 लग्नाचा मुहूर्त - 6, 7, 9, 10, 12, 13, 14, 22, 23, 28 फेब्रुवारी 2023
मार्च 2023 लग्नाचा मुहूर्त - 6, 9, 11 आणि 13 मार्च 2023.

तुळशी विवाह

जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचण येत असेल, नाते सुरळीत होत नसेल किंवा लग्न पुन्हा पुन्हा तुटत असेल, तर तुळशीविवाह करणे फायदेशीर ठरेल. ज्या जोडप्यांना मुलीचे सुख मिळत नाही, त्यांनाही आयुष्यात एकदा तुळशीविवाह केल्याचे पुण्य मिळते, असे मानले जाते. इतकंच नाही तर  लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. तुळशी विवाह संध्याकाळी केला जातो. तुळशीच्या मडक्यावर उसाचा मंडप करून लाल ओढणी, गोड पदार्थ तुळशीला अर्पण करावा. यानंतर शालिग्रामजींना भांड्यात ठेवून विधी सुरू केला जातो. या दरम्यान विवाहाचे सर्व नियम पाळले पाहिजेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी