Astrology: मंगळवारच्या दिवशी हे काम करणे टाळा; जीवनात येतात वाईट संकटे

आध्यात्म
Updated May 10, 2022 | 09:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mangalwar Che Upay | आज मंगळवार आहे. हा दिवस भगवान बजरंग बली म्हणजेच हनुमानजींना समर्पित मानला जातो. या दिवशी लोक श्रद्धेने मंदिरात जातात आणि बजरंगबलीची पूजा करतात. तसेच अशी काही कामे आहेत, जी या दिवशी नित्यनियमाने केली जात नाहीत.

Avoid doing this on Tuesday, Bad things happen in life
मंगळवारच्या दिवशी हे काम करणे टाळा; जीवनात येतात वाईट संकटे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज मंगळवारचा दिवस बजरंग बली म्हणजेच हनुमानजींना समर्पित मानला जातो.
  • या दिवशी लोक श्रद्धेने मंदिरात जातात आणि बजरंगबलीची पूजा करतात.
  • मंगळवारी दाढी करणे किंवा केस कापणे टाळावे.

Mangalwar Che Upay | मुंबई : आज मंगळवार (Mangalwar) आहे. हा दिवस भगवान बजरंग बली म्हणजेच हनुमानजींना समर्पित मानला जातो. या दिवशी लोक श्रद्धेने मंदिरात जातात आणि बजरंगबलीची पूजा करतात. तसेच अशी काही कामे आहेत, जी या दिवशी नित्यनियमाने केली जात नाहीत. चला तर म जाणून घेऊया कोणती अशी कामे आहेत जी मगंळवारच्या दिवशी केल्याने त्याचे अशुभ परिणाम होतात. (Avoid doing this on Tuesday, Bad things happen in life). 

अधिक वाचा : फोटोत लपलेल्या मुलीचे नाव ओळखताना भल्याभल्यांना फुटला घाम

मंगळवारी केस कापू नये

मंगळवारी दाढी करणे किंवा केस कापणे टाळावे. या दिवशी असे करणे शुभ मानले जात नाही. असे केल्याने व्यक्तीवर अनेक संकटे येतात आणि चांगले चालले काम अडचणीत येऊ शकते. त्यामुळे मंगळवारी ही कामे टाळली तर बरे होईल.

तुम्ही जर मांसाहारी असाल किंवा अधूनमधून मांसाहार खात असाल तर मंगळवारी स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि चुकूनही मांसाहार करू नका. असे जर नाही केले तर तुम्हाला मंगळवारी केलेल्या पूजेचे कोणतेही फळ मिळणार नाही. यासोबतच हा दिवस तुमच्यासाठी अशुभ ठरेल. 

नवीन घर घरेदी करणे या दिवशी टाळा 

हनुमानजींना भूमीपुत्र मानले जाते. त्यामुळे मंगळवारी नवीन घर खरेदी करू नका किंवा नवीन घर बांधण्यासाठी भूमीपूजन करू नका. असे केल्याने अनेक आजार घरात शिरतात आणि कुटुंबात आर्थिक संकटही सुरू होते. त्याचा संपूर्ण कुटुंबावर वाईट परिणाम होत असतो. 

लक्षणीय बाब म्हणजे मंगळवारी लोखंडी वस्तू किंवा काळ्या रंगाचे कपडे खरेदी करणे टाळा. असे करणे अशुभ मानले जाते. त्याऐवजी मंगळवारी केशरी किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करा. बजरंग बलीला लाल रंग खूप आवडतो त्यामुळे या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान केल्याने मंगल दोषाचा प्रभाव कमी होतो.

अलंकाराची कोणतीही वस्तू खरेदी करू नका

भगवान हनुमानाजींच्या दिवशी म्हणजे मंगळवारी कोणीही अलंकाराची वस्तू किंवा काचेची वस्तू खरेदी करू नये. असे केल्याने पती-पत्नीमध्ये भांडणे सुरू होतात, असे मानले जाते. यासोबतच घरातील पैशांचीही हानी होते.

या वस्तूंचे करा दान 

ज्योतिषशास्त्राकडे बारकाईने पाहिले तर, मंगळवारच्या दिवशी तांबे, केशर, गहू, लाल चंदन, लाल गुलाब, सिंदूर, मध, लाल फुले, मसूर, लाल कणेर, लाल तिखट आणि लाल दगड दान करू शकता. या दिवशी तुम्ही लाल फळे आणि लाल रंगाचे कपडे दान करू शकता. या वस्तूंचे दान केल्याने तुम्हाला पुण्य लाभते आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी