Panchak: 13 सप्टेंबर पर्यंत असणार आहे पंचक, या काळात करू नका 'या' चुका, अन्यथा होईल गंभीर परिणाम

शुक्रवार ९ सप्टेंबर पासून पंचक सुरू झाला आहे. हा पंचक १३ सप्टेंबर मंगळवारपर्यंत राहणार आहे. शास्त्रानुसार या काळात खरेदी करणे, शुभ आणि मंगल कार्ये करायचे नसतात. धार्मिक मान्यतानुसार पंचक काळात जर कुणाचा मृत्यू झाला तर तो आपल्या कुटुंबातील पाच इतर सदस्यांनाही घेऊन जातो. म्हणून पंचक काळात काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जर कुठलाही हलगर्जीपणा केल्यास त्याच्या गंभीर चुका भोगाव्या लागतील. जाणून घेऊया पंचक काळात कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे.

panchak duration
पंचक काळ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शुक्रवार ९ सप्टेंबर पासून पंचक सुरू झाला आहे.
  • हा पंचक १३ सप्टेंबर मंगळवारपर्यंत राहणार आहे.
  • शास्त्रानुसार या काळात खरेदी करणे, शुभ आणि मंगल कार्ये करायचे नसतात.

Panchak: शुक्रवार ९ सप्टेंबर पासून पंचक (Panchak) सुरू झाला आहे. हा पंचक १३ सप्टेंबर मंगळवारपर्यंत राहणार आहे. शास्त्रानुसार या काळात खरेदी करणे, शुभ आणि मंगल कार्ये करायचे नसतात. धार्मिक मान्यतानुसार पंचक काळात जर कुणाचा मृत्यू झाला तर तो आपल्या कुटुंबातील पाच इतर सदस्यांनाही घेऊन जातो. म्हणून पंचक काळात काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जर कुठलाही हलगर्जीपणा केल्यास त्याच्या गंभीर चुका भोगाव्या लागतील. जाणून घेऊया पंचक काळात कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे. (avoid mistake in panchak period hindu religion read in marathi) 

अधिक वाचा : Vastu Shastra: शुभ संकेत देतो हा किडा, घरात दिसताच समजून जा होईल पैशांचा वर्षाव

पंचकचे पाच प्रकार असतात. दिवसांच्या नावावर पंचक ठरतं. यावेळी शुक्रवारी पंचक सुरू झाला आहे. त्यामुळे या पंचकला चोर पंचक म्हटले जाते. रविवारी सुरू होणार्‍या पंचकला ‘रोग पंचक’ म्हटले जाते. सोमवारी सुरू होणार्‍या पंचकला 'राज पंचक', मंगळवारी सुरू होणार्‍या पंचकला 'अग्नी पंचक' आणि शनीवारी सुरू होणार्‍या पंचकला 'मृत्यू पंचक' म्हटले जाते. बुधवारी आणि गुरूवारी सुरू होणार्‍या पंचकला पाच मूलभूत नियम सोडल्यास सर्व कार्य कारण्याची मुभा आहे. 

अधिक वाचा : Shardiya Navratri 2022: शारदीय नवरात्रीत महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे पठण


पंचक काळात टाळा या पाच चुका

  1. पंचक काळात लाकडं गोळा करणं तसेच लाकडं विकत घेऊन घरात आणणे निषिद्ध आहे. 
  2. या पाच काळात घराचे छप्पर बनवणे किंवा दुरुस्ती करण्यास मनाई आहे. 
  3. या काळात मृतदेहावर अग्निईसंस्कार करण्यास बंदी आहे. 
  4. पंचक काळात खाट बनवणे निषिद्ध मानले आहे. 
  5. पंचक काळात दक्षिण दिशेला प्रवास करण्यास मनाई आहे, कारण ही दिशा यमराजाची दिशा मानली जाते.  

अधिक वाचा : Indira Ekadashi 2022: इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने पितरांना होते स्वर्गप्राप्ती, जाणून घ्या तिथी आणि महत्त्व 

पंचकची वेळ

हिंदू पंचागानुसार पंचाकची वेळ  पंचक शुक्रवार, 9 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजून 39 मिनिट ते मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी सकाळी  6 वाजून  36 मिनट पर्यंत असणार आहे.  या काळात कुठलेही शुभ कार्य करू नये. 

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी