Basweshwar Jayanti 2022: जाणून घ्या- कोण आहेत भगवान बसवेश्वर, ज्यांच्यापुढे सर्व नेते होतात नतमस्तक

आध्यात्म
भरत जाधव
Updated May 03, 2022 | 12:47 IST

आज लिंगायत (Lingayat) समाजाचे (society) तत्वज्ञ (Philosopher) व समाजसुधारक (social reformer) बसवेश्वर भगवान (Lord Basaveshwar) यांची जयंती आहे. यानिमित्ताने अनेक नेते त्यांची जयंती साजरी करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. लिंगायत (Lingayat ) धर्माचे धर्मगुरु (Dharmaguru), विश्वगुरु महात्मा अर्थात बसवेश्वर (Basweshwar ​) यांचा जन्मदिन वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला (Akshay Tritiya) झाला अशी धारणा आहे. 

Who is Lord Basaveshwar
जाणून घ्या- कोण आहेत भगवान बसवेश्वर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा करतात.
  • भगवान बसवेश्वर हे हिंदू धर्मातील जातिव्यवस्था आणि इतर वाईट गोष्टींविरुद्ध लढणारे व्यक्ती म्हणून ओळखले जातात.
  • संत बसवेश्वरांचा जन्म इ.स. ११३१ मध्ये बागेवाडी (कर्नाटकच्या संयुक्त विजापूर जिल्ह्यात स्थित) येथे झाला

नवी दिल्ली :  आज लिंगायत (Lingayat) समाजाचे (society) तत्वज्ञ (Philosopher) व समाजसुधारक (social reformer) बसवेश्वर भगवान (Lord Basaveshwar) यांची जयंती आहे. यानिमित्ताने अनेक नेते त्यांची जयंती साजरी करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. लिंगायत (Lingayat ) धर्माचे धर्मगुरु (Dharmaguru), विश्वगुरु महात्मा अर्थात बसवेश्वर (Basweshwar ​) यांचा जन्मदिन वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला (Akshay Tritiya) झाला अशी धारणा आहे. 

लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. त्यामुळे त्याचे अनुयायी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा करतात. आज आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. कोण होते  बसवेश्वर आणि समाजात पसरलेल्या वाईट गोष्टी कमी करण्यात त्यांचे काय योगदान आहे ते जाणून घेऊया.
भगवान बसवेश्वर हे हिंदू धर्मातील जातिव्यवस्था आणि इतर वाईट गोष्टींविरुद्ध लढणारे व्यक्ती म्हणून ओळखले जातात.  त्यांना विश्वगुरू, भक्ती भंडारी आणि बसव असेही म्हणतात. लिंग, जात, सामाजिक दर्जा यांचा विचार न करता सर्व लोकांना समान संधी देण्याचा त्यांनी विचार मांडला आहे. ते निराकार ईश्वराच्या संकल्पनेचे समर्थक आहेत.

संत बसवेश्वरांचा जन्म इ.स. ११३१ मध्ये बागेवाडी (कर्नाटकच्या संयुक्त विजापूर जिल्ह्यात स्थित) येथे झाला. उपनयन सोहळ्यानंतर वयाच्या ८ व्या त्यांनी अंगात घातलेलं जानवे तोडून टाकले होते. त्या काळात त्यांनी अनेक पदांवर आपल्या सेवाही दिल्या होत्या. समाजात गरीब-श्रीमंत आणि जातीच्या आधारावर भेदभाव केला जात होता. त्याविरोधात त्यांनी आवाज उठवला.बसवेश्वर हे असेच एक संत होते, ज्यांनी ८०० वर्षांपूर्वी महिलांवरील अत्याचार संपवण्यासाठी लढा दिला. बसवेश्वर हे महादेवाचे उपासक होते. त्यांनी मठ, मंदिरांमध्ये पसरलेल्या दुष्कृत्ये, अंधश्रद्धा आणि कर्मकांड, श्रीमंतांच्या सत्तेला आव्हान दिले. ते एक संत होते ज्यांच्या नावाने कन्नड साहित्याचा संपूर्ण कालखंड ओळखला जातो.

Read Also : ओळख करत शिक्षकाने शिक्षिकेवर केला बलात्कार

बसवेश्वर स्वतः ब्राह्मण कुटुंबात जन्मले. त्यांनी ब्राह्मणांच्या वर्चस्ववादी व्यवस्थेला विरोध केला. त्यांनी जन्माधारित व्यवस्थेऐवजी कर्म आधारित व्यवस्थेला विरोध केला. म्हणजे जो ज्या कुळात जन्मायला आला त्याला तेच काम करावं लागेल अशा विचारांना त्यांनी विरोध केला. जन्माधारित व्यवस्थेऐवजी कर्मावर आधारित व्यवस्थेवर त्यांचा विश्वास होता. दुष्कृत्ये दूर करण्यासाठी त्यांनी या नव्या संप्रदायाची स्थापना केली, त्याला लिंगायत असे नाव देण्यात आले. आम्ही तुम्हाला सांगतो की लिंगायत पूर्वी फक्त हिंदू वैदिक धर्माचे पालन करत होते. 

Read Also : अक्षय तृतीयेला खरेदी करा फक्त 1 रुपयात सोने...पाहा कसे

लिंगायत समाजाची गणना कर्नाटकातील पुढारलेल्या जातींमध्ये केली जाते. कर्नाटकमध्ये १८ टक्के लोकसंख्या लिंगायत समाजाची आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या जवळपासच्या राज्यांमध्येही लिंगायत लोकसंख्या लक्षणीय आहे. लिंगायत पंथाचे लोक ना वेद मानत नाही आणि मूर्तीपूजाही मानत नाही. लिंगायत हिंदू भगवान शिवाची पूजा करत नाहीत तर देवाला उचित असणाऱ्या आकाराच्या "इष्टलिंग" ची पूजा लिंगायत समाज करत असतो. इष्टलिंग हे अंड्याच्या आकाराचे बॉलचे आकार आहे, ते त्यांच्या शरीरावर धाग्याने बांधतात. लिंगायत या इष्टलिंगाला आंतरिक चैतन्याचे प्रतीक मानतात. इष्टलिंग हे निराकार ईश्वराची मानवाच्या किंवा प्राण्यांच्या रूपात कल्पना न करता जगाच्या आकारात निर्माण झाले आहे. लिंगायतांचाही पुनर्जन्मावर विश्वास नाही. लिंगायतांचे असे मत आहे की जीवन एकच आहे आणि ते आपल्या कृतीने आपले जीवन स्वर्ग आणि नरक बनवू असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी