नवी दिल्ली: हिंदू धर्मात (Hinduism) प्रत्येक देवी- देवतांना विशेष महत्त्व आहे. लोकं आपल्या घरातल्या देवघरात पूजा- पाठ आणि प्रार्थना (worship) करण्यासाठी वेगवेगळ्या देवी-देवतांची मूर्ती घरात विराजमान करतात, जेणेकरून घरात सुख शांति समुद्धी टिकून राहावी. वास्तुशास्त्रानुसार मंदिरात मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा आणि जागेला विशेष महत्त्व असतं. घरात चुकीच्या दिशेला देवाची मूर्ती ठेवल्यास नकारात्मक ऊर्जेचा पसार होतो. यासोबतच पूजा देखील अधूरी मानली जाते. आज जाणून घेऊया वास्तुनूसार घरात देवी-देवतांची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवली पाहिजे. (Direction Of Goddess Lakshmi)
गणपती बाप्पाची मूर्ती या दिशेला ठेवा
हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्य करत असताना सर्वात आधी श्री गणेशाची पूजा केली जाते. घरातल्या देवघरात श्री गणेशाची मूर्ती आवर्जून विराजमान केलेली असते. वास्तुशास्त्रानुसार, गणपतीची मूर्ती देवघरात नेहमी उत्तर पूर्व दिशामध्ये ठेवणं शुभ मानलं जातं. याव्यतिरिक्त तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती मंदिरात ठेवली असल्यास गणेशाला सिंदूर लावणं चांगलं मानलं जातं.
लक्ष्मी मातेची मूर्ती उजवीकडे ठेवा
गणपतीसोबत देवी लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती ठेवली जाते. जर तुमच्या देवघरात देवीची मूर्ती ठेवली असेल तर वास्तुनूसार तिची जागा गणपतीच्या उजव्या बाजूला ठेवावी. काही जण देवी लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती गणपतीसोबत डाव्या बाजूला ठेवतात. मात्र माता लक्ष्मी ही गणेशाची आई आहे. त्यामुळे ते फक्त उजव्या बाजूला ठेवावी.
या दिशेला ठेवा शिवलिंग
काही लोकं घरातल्या देवघरात शिवलिंग ही ठेवतात. अशात शिवलिंग योग्य दिशेला ठेवण्याचं ज्ञान होणं खूप गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार शिवलिंगचा मुख उत्तर दिशेला ठेवावं. असं केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते.