feeding dog कुत्र्याला खाऊ घालण्याचे फायदे

benefits of feeding dog कुत्रा हा प्राणी भगवान कालभैरव (काळभैरव) यांची स्वारी आहे. तसेच कुत्रा हा शनि (शनी) आणि केतू यांचे प्रतिक समजला जातो. यामुळेच घरात कुत्रा पाळणे, घरातल्या आणि बाहेरच्या कुत्र्याला खाऊ घालणे हे फायदेशीर समजले जाते.

benefits of feeding dog
feeding dog कुत्र्याला खाऊ घालण्याचे फायदे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • feeding dog कुत्र्याला खाऊ घालण्याचे फायदे
  • घरात कुत्रा पाळणे, घरातल्या आणि बाहेरच्या कुत्र्याला खाऊ घालणे हे फायदेशीर समजले जाते
  • कुत्रा हा प्राणी भगवान कालभैरव (काळभैरव) यांची स्वारी तसेच शनि (शनी) आणि केतू यांचे प्रतिक

benefits of feeding dog मुंबईः अनेकजण हल्ली घरी कुत्रा अर्थात श्वान पाळणे पसंत करतात. कुत्रा हा निष्ठावान प्राणी आहे. तो माणसाचा उत्तम साथीदार समजला जातो. कुत्रा हा प्राणी भगवान कालभैरव (काळभैरव) यांची स्वारी आहे. तसेच कुत्रा हा शनि (शनी) आणि केतू यांचे प्रतिक समजला जातो. यामुळेच घरात कुत्रा पाळणे, घरातल्या आणि बाहेरच्या कुत्र्याला खाऊ घालणे हे फायदेशीर समजले जाते.

  1. ज्यांचा धर्म, ज्योतिषशास्त्र, शुभअशुभ यावर विश्वास आहे अशी मंडळी आजही दिवसातून किमान एकदा कुत्र्याला खाऊ घालतात. कुत्र्याला खाऊ घातल्यामुळे अपघाती मृत्यू होण्याचा तसेच अकाली मृत्यू होण्याचा धोका टळतो असे म्हणतात.
  2. कुत्रा हा प्राणी भगवान कालभैरव (काळभैरव) यांची स्वारी आहे. तसेच कुत्रा हा शनि (शनी) आणि केतू यांचे प्रतिक समजला जातो. यामुळेच ज्यांच्या कुंडलीत शनि आणि केतू यांच्यापैकी किमान एक ग्रह प्रभावी आहे त्यांना ग्रहशांतीसाठी दररोज काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला खाऊ घालण्याचा सल्ला अनेक ज्योतिषी देतात. 
  3. जर कुंडलीत कालसर्प दोष आढळला तर घरात कुत्रा पाळणे, घरातल्या आणि बाहेरच्या कुत्र्याला खाऊ घालणे हे फायदेशीर समजले जाते.
  4. पूर्वजांना मोक्ष मिळावा यासाठी तसेच पितरांच्या शांतीसाठी कुत्र्याला खाऊ घालणे हे फायदेशीर समजले जाते.
  5. संतती सुख लाभावे यासाठी दांपत्याने काळा कुत्रा पाळणे तसेच कुत्र्याला खाऊ घालणे हे फायदेशीर समजले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी